ओळख व मैत्री कोणाशी असावी वा कोणाशी नसावी. व त्याची मर्यादा.
२४.८.२०२३ ओळख व मैत्री कोणाशी असावी वा कोणाशी नसावी.
वाचकमंडळी हो. मी आज याबाबतचा माझा दोन वर्षापूर्वीचा (२३.८ .२१) लेख- ब्लॉग तुमच्या समोर ठेवणार आहे. कृपया हा वाचून व आपल्या मुलांमुलीं व नातवंडाना वाचून दाखवावा. तरूण वाचक वर्गाने,आपल्या मित्र मैत्रिणीत यावर चर्चा करावी. ही कळकळीची विंनती. हे तुमच्या हितासाठीच आहे.मी आज एक गोष्ट सांगणार अाहे. सत्य घटना आहे. पण त्या आधी हे वाचा.
असंगाचा संग धरणे।
निरावलंबी वास करणे ।
निःशब्दासि अनुवादणे।
कोणे परी । ।
हा आहे, दासबोधातला दशक ७ वा समास ७.
नाव दिलेय , “साधनप्रतिष्ठा निरूपण.
साधन म्हणजे आपल्या जीवनाचे व जिविकेचे साधन- उद्दिष्ट. तेच जर ठरवले नसेल, तर आला दिवस , गेला दिवस. असलेच निष्क्रिय जगणे.
निरावलंबी वास व असंगाशी संग.
तुम्ही crime patrol बघता का? नसेल तर बघा जरूर. त्यातील विभागांना नावे ही समर्पल दिलेत. ” सतर्क” सावधानता.- जागरूकता आणि ” दस्तक”- अर्थात् मी गेल्या आठवड्यात हे सांगितले होतेच. दस्तक म्हणजे दारावरची ठकठक. ती जाणून घ्या. दुर्लक्ष करू नका. त्या घटना जशा घडतात, त्या समजून घ्या व स्वतःच्या बाबतीत घडू नये, हा प्रयत्न करा.
एक सधन परिवार. मोजके सभासद. पती. पत्नी एकच मुलगा. हुशार अभ्यासू. १०वीच्या परिक्षेत ९६% मार्क. साहाजिक सुप्रसिध्द कॉलेजमध्ये, सायन्सला admission. Studious मुलांनाच प्रवेश देणार्या क्लासमध्ये जात असे. ११वी व १२वी च्या पहिल्या term ला ही उत्कृष्ट मार्कस्. दिवाळीत कॉलेजची राजस्थानला सहल गेली. कॉलेजमध्ये जरी हा मुलगा सगळ्यांच्या, कौतुकाचा विषय असला, तरी ८वी पासून, संपूर्ण वेळ शाळा- क्लास व अभ्यासात जात असल्याने, त्याला मित्रमडळी कमीच होती. त्यामुळे त्या ट्रिपमध्ये, जे गट झाले, त्यात तो जरा मिसळू शकला नाही. तिकडे असे काही झाले कि, तेथील लोकल मुले ह्या कॉलेजच्या संपर्कात ( जाणून बुजून) आली व ते तेथील प्रदेशाची समग्र माहिती सांगत. गटाने मजा करणारे, तितकासा interest घेत नव्हती. हा studious. त्यांच्यासोबत जास्त असे. तुम्ही म्हणाल, चांगले आहे ना? तसाच विचार बरोबर असलेल्या कॉलजच्या प्रोफेसरांनी केला असावा. पण परक्याच्या किती नजीक जावयाचे, हा विचार स्वतःच करायचा असतो. त्यासाठी अभ्यास एके अभ्यास न करायला लावता, समाजात, वावरायला शिकवावे व समोरील व्यक्तींना समजून व जाणून घेता आले पाहिजे. कोणालाही social media वरील स्वतः ची ID/ profile देऊ नये. हे लक्षात न घेता, या आपल्या मुलाने , त्यांना ही सर्व माहिती- मोबाईल नंबर- पत्ता दिला. हाच असंगाशी संग prove झाला. पुढे ती मुले १२वीची परिक्षा संपताच मुंबईत आली व ह्याच्याशी संपर्क केला. ह्याने घरात काहीच सांगितले नव्हते. सहलीवरून आल्यावर. बस. छान झाली. एवढेच. सत्य हे होते. ते drug peddler होते. म्हणजे मादक नशिल्या पदार्थ मुंबईत आणत. त्यांच्या येण्याची tips पोलिस खात्याला मिळाली होती. ती दोघे, ह्याच्या बुलेटवरून आळीपाळीने फिरत. दोनदा ह्याच्यामुळे ती सुटली. अन् एकदा ह्याला मध्ये बसवून ट्रिबल सीट जाताना पोलिसांनी पकडले व बॅगेत ड्रग सापडले. दोन्हीकडून firing झाले अन् दुर्दैवाने हा मारला गेला. व paddler ठरला. म्हणून या social media पेक्षा असली व अस्सली मित्र असावेत.
आता वळू या रामदास स्वामींच्या समासाकडे. त्यांनी संपूर्ण देशात भ्रमण केले. त्यामुळे कोणावर विश्वास किती मर्यादेपर्यंत ठेवावा, हे ते नेमके सांगू शकले. हा सल्ला, अनंत काळापर्यंत व कोणत्याही परिस्थितीत लागू पडतो. पटतेय नं?
तर पालकांनो, सावध. मुलांनो BE ALERT.
Comments
Post a Comment