चाणक्य नीतिचा व सध्या चालू असलेल्या सायबर गुन्ह्यांचा संबंध.

 २७.८.२०२३. चाणक्य नीतिचा व सध्या चालू असलेल्या सायबर गुन्ह्याचा दाट संबंध.

माझ्या चाणाक्ष वाचक हो, विचार कराल व नीट वाचन कराल, तर तुमच्याच हे लक्षात येईल. सायबर गुन्हे, हे गुन्हेगारांच्या स्वार्थीपणामुळेच होत नसतात. तर सामान्यांच्या लालचेच्या व लोभाच्या वर्तनामुळे होतात. नाही पटत. बघा, पुढील प्राण्याला व पक्ष्याला, चाणक्यजी का गुरू मानतात, ते वाचा. मग म्हणाल, अरेच्चा! खरेच की. तर बघा.
पुढील गुरू आहेत, कुत्रा व कावळा. हो, अगदी सत्य आहे.त्या आधी, आपण ज्या अप्रिय विषयावर चर्चा करीत होतो, त्याविषयी, थोडे पण योग्य भाष्य. जसे आपण या गाढव व कुत्रा यांच्या उल्लेख, निकामी जनांसाठी करतो. त्याच प्रमाणे, एक मोठ्ठी चूक करतो. त्या तसल्या अत्याचारांना वा बलात्कारांना, पाशवी किंवा पशुतुल्य वर्तन, संबोधतो. पण सत्य हे आहे कि, कोठचाही प्राणी पक्षी अशी जबरदस्ती करत नाहीत. आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण बळाचा उपयोग करीत नाहीत. त्यांच्यात नर – पुरूषी -अहंकार नसतोच. तो असतो, माणसांच्यात. तेव्हा , ” ह्या असल्या निर्दयी प्रकाराला, ” मानुषी” च म्हणायला पाहिजे. असो.
बहुवाशी अल्पसंतुष्ट: सु निद्रो लघुचेतन: ।
स्वामीभक्तश्च शुरश्च षधेत श्वानतो: गुना: ।।२१ ।।
कुत्रा.
चाणक्य असे सांगतात, तसे तर आपला ही अनुभव आहे की कुत्र्याच्या, स्वामीभक्तीची तोड नाही. असे म्हणतात, तो भुकेच्या वर एकही घास खात नाही. हे खरे असल्यास आपण माणसांनी, बुफे च्या वेळी आपल्या capacity चा पूर्ण अंदाज असून, ही प्लेट भरून घेणे, म्हणजे😀😬😁.
या प्राण्याप्रमाणेच मर्यादा राखणे आवश्यक आहे नं.
आणि यांचा महत्वाचा गुण म्हणजे किती ही झोपेत असले तरी सावध असतात. जरा खूट् झाले तरी कान टवकारलेच समजा.
धीटाई शौर्य हे तर त्याच्यांत असतेच. तेव्हा कुत्र्यापासून सावधानता व ईमानदारी आपण घेतलीच पाहिजे , हे पटतेय ना? जर आपण हे गुण आत्मसात केले, तर social media वरील, मोहाला व लोभाला बळी पडणार नाही.
आचार्य चाणक्य जे राजकारण अर्थकारण समजून सांगतात. तेव्हा ते असे ही, म्हणतात कि, हे गुण अंगिकारण्यात फायदेच फायदे अ‍ाहेत.
कावळा.
गूढंच मैथुन धाष्ट्यं काले काले च संग्रहम्।
अप्रमत्तमविश्वास पंच शिक्षेच्च वायदात् ।।२०।।
कावळा- आचार्य चाणक्यांनी कोणाला गुरू मानावे, ते सांगितले आहे. प्रथमदर्शनी हे विधान अर्थहीन वाटले, तरी खोलवर विचार केल्यास निश्चित पटले असेल. हे, मनात बिंबवले, तर आजचे गुन्हेकारण नक्की समजून येईल. श्री साईबाबांनी, सांगितलेला विचार
“”श्रध्दा व सबुरी””
लक्षात येईल. एकदा देशप्रेम व देशहितावर एकाग्र मन व लक्ष केले तर, कशानेही ते दोन्ही विचलीत होत नसतात.आता कोणी म्हणेल कावळ्या कडून काय शिकायचे. हं. तर चाणक्य काय सांगतात, ते बघा.
१. धीटपणा. त्याला जे अन्न पाहिजे असते, त्यावर तो फटकन झडप घालतो.
२. ती कशी तर सावधपणे. लगेच मागे जाण्याच्या तयारीने.
३. हा जो गुण आहे, तो वाचायला विचित्र वाटेल, छी, हे काय हे! पण आजकाल जे आपण बागेत, समुद्रावर , सिनेमातून तरूणांचे वर्तन बघतो, ते पाहाता हा कावळ्याचा गुणधर्म घेणे, जरूरी अाहे, हे दिसून येते. ते कधी ही दोघे एकत्र उघड्यावर, येताना, दिसत नाहीत.
४.वेळोवेळी संग्रह करणे. आपण सर्वांनी, लहानपणी “चिऊ व काऊची गोष्ट ऐकलेय. पण प्रत्यक्षात, ते उलटे आहे. कावळे अन्नसंग्रह करतात. उलट चिमणीच. ~. असो.
५. शेवटचा गुण म्हणजे, कोणावरही विश्वास न ठेवणे. कोणी मारणारच नाही. आपोआप मिळेल, या भरोशावर न राहणे. फक्त इथे विश्वास न ठेवणे व संशय घेणे. या बाबी एक नाहीत. याचा विचार पुन्हा कधीतरी
करू. कारण आपल्या आणखीन् एक गुरूजींची ओळख राहिलेय. शिवाय लहानपणी वाचन करून, जे पंचतंत्र विसरून गेलो आहोत, ते ही स्मरण करावयाचेय, बरे का? ते जर समजून उमजून घेतले तर, फसवणूक प्रकार आपल्यापासुिन दूर राहील. कसे ते गुपित उद्या सांगते. This is not only for reading, but for thinking over these topics Is it clear, my dear readers. The secret is waiting for you. तो कल आईगा और दिलसे पढियेगा। and follow and share to whom you love and care.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू