योग्य माहिती व योग्य निर्णय केल्यास फसगत होत नाही.

 २.९ .२०२३.


योग्य माहिती व नियोजन केल्यास फसगत होत नाही.
काल आपण बघितले, फसवणूक करणारे चारी बाजूला असतात. खरे तर, ज्या बुध्दिवंत लोकांना, वेळेवर योग्य शिक्षण व सुसंस्कार दिले जात नाहीत, त्यांचे डोके असे चालते. रग्गड पैसा मिळवण्यासाठी, ते मग अहिंसात्मक गुन्हे करतात. म्हणून अशा पटरीवरून घसरलेल्या, पिढीला वेळीच सन्मार्ग दाखवण्याचे कार्य करू शकतो, आपण जेष्ठ व श्रेष्ठ नागरिक. महिला मंडळे व संध्याकाळी पार्कात बसून वेळ घालवणारे पुरूष एकत्रित येऊन, लहान, ५ ते १५ वर्षाच्या drop out मुलांना जमवून हे कार्य निश्चित करू शकतील. पण लक्षात कोण घेतो? घरीच बसून मालिकेतील परिवाराची चिंता करण्यापेक्षा, परिसरातील, even educated मुलांची, स्पर्धा खेळ घेऊन काहीजणांचे तरी एकत्रिकरण करू शकतात. त्यानिमित्ताने आपण ही ज्ञानी होऊ शकतो.
आपण जर ज्ञानाच्या प्रकाशात राहिलो, तर आपली सावली आपला सदैव साथ देते. पण जर आपणच अज्ञानाच्या अंधारात गेलो, तर तीही आपली साथ सोडते. मी मालाडला एक संस्था चालवत असे. तेथील डोकेबाज महिलांनी, मुलामुलींना engage ठेवण्यासाठी एक कल्पना लढवली होती. आम्ही मी व माझी मैत्रिण पांढरपेशा जीवन जगत होतो. कायद्याच्या नजरेतून त्या मुलामुलींकडे बघत असू. त्यातील लहान मुले-मुली ८ ते१४ वयाची शाळे व्यतिरिक्त वेळात, पिना व टिकल्या पॅकेटमध्ये बसवण्याचे काम करत. आम्ही पालकांना बोलावून, हे लेक्चर दिले बालकामगार वगैरे. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतले. मग आम्ही हुरूप येऊन, हे बंद करा, सांगितले. पण एक महिला , दोन मुलींची ( वय १२ व १४) आई बोलली,
” मॅडम, आमचा एक प्रॉब्लेम आहे. आम्ही सर्व जणी घरकामासाठी घरोघर जातो. सकाळी निघून ४.५ वाजेपर्यंत घरी पोहोचतो. ह्या मुलींवर लक्ष ठेवायला कोणी नसते, तेव्हा, जर त्यांनी इतकी पॅकेटे पुरी केली , तर त्या घरीच बसल्या, हे कळते. व एकत्र असल्यामुळे, कोणी, इतक्या मुलींना, एकटे गाठून गडबड करणार नाही हो. हा मुद्दा व त्यांचा- योग्य उपाय – आम्हाला कल्पनेत ही सुचला नाही. मग आमचे ज्ञान वाढले. व आम्ही स्थानिक शिक्षिका तयार करून, आपोआप, पालकांच्या गैरहजेरीत बेबी सिटर तयार केल्या. हे सहज घडले. तुम्ही पण योग्य रितीने असे काही निश्चित करू शकाल. इच्छा तेथे मार्ग. Then start something and become, ” SOMEBODY” for these generation” and share these blogs everyday to engage everybody in between your nearest and dearest.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू