आत्मसंरक्षणावर बोलू काही. आपला मूळ विषय- सोशल मिडियाचे जाळे.
१.९ .२०२३ आत्मसंरक्षणावरच बोलू काही. आपला मूळ विषय- सोशल मिडिया.
माझ्या प्रिय सजग व सावधान असलेल्या वाचक स्वजन हो, शिर्षकावरून तुमच्या लक्षात आलेच असेल, मी जी ब्लॉगला सुरूवात केली, ती social media तील फसवणूक व फसगत यासाठी. काय, दोन्ही शब्द एकच आहेत, अं हं! दोन्ही एकसारखे दिसले तरी जरा फरक आहे. फसवणूक करणारा, अपराधी असतो व आपणांची होते, ती फसगत. ती ही का होते तर, समर्थ रामदास स्वामींच्या शब्दात, “जो दुसर्यावरी विसंबिला, त्याचा कार्यभाग बुडाला.” मला प्रत्येक वेळी त्यांचे संपूर्ण नाव लिहावे लागते, कारण फक्त समर्थ म्हटले कि, आम जनांना दुसरेच आठवतात. असो. मला कोणाच्या श्रध्देविषयी भाष्य करायचे नाही. पण त्यांनी तिनशे वर्षापूर्वी लिहिलेल्या दासबोधातील उपदेश आजच्या ह्या डिजिटल युगात ही FIT बसतो.
बघा आता. आजच्या एका मान्यवर पेपरातील – तीन- बातम्या- ह्यात, समोरच्या अनोळखी माणसावर अनाठायी भरोसा ठेवणे, किती मुर्खपणाचे व भयानक ठरले.
पहिली बातमी- एका घरात आई वडिल व ५ वर्षाची मुलगी रहात होते. तेथेच त्या माणसाचा एक मित्र त्यांच्या सोबत, त्याच घरात रहात होता. का, god knows. एक दिवस ती मुलगी चॉकलेटच्या मोहाने, त्या अंकल सोबत गेली. ती परत आलीच नाही. मग शोध सुरू. पोलिस यंत्रणा कामाला लागली. ती एक अजाण पोरं! पण पालकांना त्याची नजर -चलबिचल कधीच कळली नाही. असो. पण जेव्हा मोठी सुशिक्षित माणसे, social media वरील चॉकलेटच्या मोहात पडतात, तेव्हा काय बोलायचे? मग आहेच, पोलिस दिमतीला. हे घ्या दुसरे उदाहरण. एक अगदी IT Engineer शादीशुदा आपल्या आईवडील व बायको बरोबर राहणारा. जेव्हा, फेसबुकवर आलेल्या, एका महिलेच्या friend request ला स्विकारतो. chat करतो. मोबाईल नंबर देतो. त्यातून गप्पा सुरू होतात. मग या कर्माला काय म्हणावं? अरे गुजगोष्टीच करायच्या, तर स्वतःच्या बायकोशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करा. पण आम्ही शहाणे नं! आई- वडिलांशी बोला, ~ ह्या अशा सोशल मिडियावर मैत्री करणार्यांनो, तुमच्या बायकोने ही एकटे पडल्याने अशी मैत्री केली, तर? बरे हा प्रकार इथेच थांबला असेल का, नाही. मोठेपणापायी, त्या मैत्रिणीची पैशाची मागणी ही पुरी करत राहिला. अरे बाबानो, त्याच पैशात, आईवडिलांना साडी – शर्ट पण्ट आणले असते, तर ते किती खूश झाले असते! बायकोला एखादा दागिना घेतला असता तर ~~. हा मिडियावरील मोठ्यांच्या चॉकलेटचाच प्रकार ना? त्या highly qualification वाल्या मुर्खाने, त्या मैत्रिणीवर ४ लाख दहा हजार उधळले. त्यानंतर जागा होऊन, पोलिसांकडे धावला. या फसवणूकीला खर्या अर्थाने जबाबदार कोण सांगा बरे? मग आहेच, पोलिस खाते दिमतीला! पण जरा सावध राहून आपल्याच घरातील मंडळींशी मैत्रीचे संबंध ठेवा नं! घरात हसरे वातावरण निर्माण करणे, आपल्याच हातात असते. तसेच आजूबाजूच्या परिचित व्यक्तींशी मैत्री व सहकार्याची भावना ठेवा. नक्कीच फायदेशीर ठरेल. मोबाईलमध्येच घुसून राहू नका. फेसबुकमधील मैत्री मुर्खपणाचीच ठरते. ह्याचे आणखीन् एक उदाहरण.
नवी मुंबईतील एका अल्पवयीन मुलीचे. या माध्यमातून मैत्री. नेहमीच येतो मग पावसाळा” या वाक्यप्रचारानुसार, अल्पवयीन मुलींना , “फूस लावणे, अखंड चालूच असते. पण मुली असल्या मैत्रीच्या फंदात का पडतात, मोबाईलच्या अधीन जातात, ह्याकडे पालकांनी लक्ष पुरवणे, गरजेचे आहे. मी नेहमीच म्हणते. पालक सिरियलच्या नादात अन् मुली, घरात असलेल्या wifi च्या availability चा गैरफायदा घेत laptop किंवा पालकांनी कौतुकांनी दिलेल्या महागड्या फोनच्या आभासी दुनियात, अल्पवयातच मैत्री करतात. त्या मित्रांना भेटतात. त्यानंतर, ” फूस” हा प्रकार होतो. तर सावधान शुभ घटना सावधान। तर माझ्या वाचकानो, आपल्या घरीच नव्हे तर आसपास जरा लक्ष ठेवा. जेष्ट नागरिक हो, आठवतेय, आपल्या लहानपणी, शेजारी हक्काने आपल्याला रागवत., तसेच वातावरण निर्माण करा. share this blog to your friends and colleagues to stop this cyber crime. See you tomorrow .
Comments
Post a Comment