आत्मसंरक्षण स्वतःच करा. हाच नियम social media वरही लागू आहे.
३१.८ .२०२३. आत्मसंरक्षण स्वतःच करा.हसच मार्ग social media वरही लागू आहे.
सुविचारी व सुजाण वाचकहो, या माझ्या BLOG मध्ये. आपले स्वागत आहे, काल आपण रक्षाबंधनाचे महत्व पाहिले. पण असे आहे कि, प्रत्येक वेळी व प्रत्येक जागी, प्रत्येकीचे बंधू physically कसे असू शकतील. अन् आज कालच्या जमान्यात महिला काय घरीच बसून असतात का? तेव्हा प्रत्येकीने, तसेच प्रत्येकाने , हो, संकटे काय फक्त मुलींनाच येतात? मुले ही तितकीच अडचणीत सापडू शकतात. तेव्हा हर एक व्यक्तीने आत्मनिर्भर होणे, गरजेचे आहे. प्रथमतः परिस्थितीची जाणिव नीट असणे, आवश्यक माना. कोठे कसे संकट येऊ शकेल, ह्याचा अंदाज घ्या. बहुधा overconfidence ,हेच संकटाला निमंत्रण असते.आता पुढील लेखन मन लावून वाचा.
वरवर पाहता हे विषयांतर वाटेल. पण मी बरोबर track वर आहे.
राजस्व म्हणजे राज्याची आय. येणारी funding. करस्वरूपी जमा होणारी संपत्ती. आता राम म्हणजे आपल्या मनात जमा होणारे, सुविचार ( फळ्यावरील वा शालेय जीवनात फक्त, वहीत लिहून रद्दीत गेलेल नव्हे, तर) जीवनात पदोपदी आचरणात आणलेले सुविचार व संस्कार.’रा’जस्व ‘म’नातील. . मूळात मानस शास्त्र हे, या “राम” संकल्पनेवर आधारित आहे. “राम” चा एक गर्भितार्थ, मी आपल्या अाधीच्या सत्रात (२०२१) विशद केला आहे. तो आठवत असेलच. पण नव्या वाचकांसाठी परत सांगते,
संस्कृत भाषेत, एकेक अक्षराचे शब्द व अर्थ आहेत.
श्री राम।
‘रा’ शक्तिरिती विख्याता: ।
‘म’ शिव: परिकिर्तित: ।
शिवशक्त्यात्मकं बीजं ।
राम, राम इति गीयते ।
“रा’ म्हणज शक्ती आणि ‘ म’ म्हणजे शिव
शिव शक्ती एकत्र म्हणजे शक्ति असणे क्षमता.
म्हणून आपण म्हणतो, रामबाण उपाय.
राजघराण्यात जन्मलेल्या प्रथम सुपुत्राचे नाव ठेवताना, त्याकाळी मातापित्याने, हा विचार करूनच हे, “राम” हे नाव ठेवले असणार ना? तर हे दोन अर्थ मी सांगितले आहेत. पटले तर, राम (आत्म क्षमता) वा राम ( राजस्व मनातील- सुविचारांची साठवण) हे विधान लक्षात घ्या.
मनातील चांगल्या कल्पना, पुढील परिस्थितीचा अंदाज हेच संकटाला दोन हात करण्याचे साधन होय. मी आता याचे सत्य उदाहरण सांगते. सुधा गोखले या लेखिकेने, आपल्या Black is beuty या आपल्या, आत्मकथनपर पुस्तकात, आपबिती लिहिली आहे. त्या अापल्या पतीच्या भेटीकरिता नायजेरियाला गेल्या होत्या. विमान प्रवास दोन टप्पात करायचा होता. जिथे विमान बदलायचै होते. तेथे रात्री त्यांना, एका छोट्या विमानतळावर, रात्र काढावी लागली. मनात भय दाटले. आपल्या नेहमीच्या सवयीने रामाचे नाव तोंडावर आले. अन् अचानक त्या सुनसान जागी, समोर दोन, निग्रो आले. त्यांचा ईरादा काही ठिक नव्हता. त्या साहाजिक, घाबरल्या. मागे मागे जात एका उघड्या खिडकी जवळ पोहोचल्या. अन् काय त्यांची आत्मक्षमता जागी झाली त्या शुध्द मराठीत ओरडल्या, ” तुम्हाला आया बहिणी नाहीत का?परदेशी बाईचे रक्षण करायचे , तर हे काय चाललेय? पुढे याल, तर मी या खिडकीतून उडी मारीन. खरे ते ती खिडकी काचबंद होती. पण काय चमत्कार! त्यांना भाषा कळली नाही, ह्यांचा चंडिका अवतार पाहून, ते मागे फिरले. यालाच राम- आत्मनिर्भरता म्हणतात. रक्षणाला स्वयंसिध्द व्हा. विचार करा. व blog share करून इतरांना ही शक्तिमान बनवा. शक्ती वर युक्तीने मात करा.
Comments
Post a Comment