सायबर गुन्हगारांच्या विविध गुन्हेपध्दती

  प्रिय  वाचक मंडळी, आपण सावध रहावे, या साठी अनेक रित्या, मी सायबर गुन्हेगारांच्या नवनवीन कृप्त्या, तुमच्या समोर आणत आहे. ते सर्व बुध्दीमान आहेत. त्यांच्या प्रज्ञेला वेळीच मार्ग व योग्य यश न मिळाल्याने, ते वाकड्या मार्गाला, लिलया, आपलेसे करीत आहेत. अाजच्या technology ची समग्र माहीती करून घेऊन, त्यायोगे, स्वतःला intelligent समजणार्‍या, so called , बहुदा, जेष्ट व श्रेष्ट(?) नागरिकांना , " उल्लू" बनवत आहेत. शुक्र २७ ऑक्टो च्या महा. टाईम्स मधील ही बातमी बघा. आजकाल एक fad झालेय. , आम्ही काही पेपर घेत नाही. काय करायच्यात बातम्या.  पण जरा दुनियेची जाणिव होते.  असो.

       " वृध्द दाम्पत्याची चार कोटीची फसवणूक."

     थोडक्यात घडले असे कि, दक्षिण मुंबईतील, एका महिलेला, अनोळखी व्यक्तीने फोन केला व  मी पीएफ कार्यालयातून बोलतोय, सांगितले, खात्री न करताच, त्याच्या सुचना follow केल्या गेल्या.  तो म्हणे, तुमच्या पतीच्या, पूर्वीच्या मालकाने, PF a/c मध्ये चार लाख गुंतवले, असून २० वर्षाने, त्याचे १२ कोटी मिळणार आहेत. 

  पण त्याने पतीचे नाव,पत्ता, कंपनीचे नाव बरोबर सांगतले, म्हणून, म्हणे  विश्वास बसला. व TDS GST INCOME TAX साठी मागणी करीत, त्या दोघांच्या बँक खात्यातून तब्बल, चार कोटी ३५ लाख इतकी रक्कम वसूल केली.  आता बघा, सुशिक्षित कसे " भोट" असतात. commen sense म्हणजे,  एक तर PF ऑफिस, हा फोन त्या पतीला, employee ला करणार कि त्याच्या बायकोचा नंबर शोधून फोन करणार.  खरे तर,  याबाबत, officially letter पाठवले जाईल ना? copy forwarded to company असे. पण म्हणतात ना, लोभापुढे अक्कल गहाण ठेवणारे, जोपर्यंत या जगात आहेत. तोवर, " हे गुन्हे" घडणारच.  simple action म्हणजे कंपनीला वा पीएफ ऑफिसला भेटणे किंवा निदान त्यांचा फोन नंबर शोधून विचारणा करणे. स्वतःला शारीरिक कारणाने, प्रवास जमत नसेल, तर एखाद्या नातलगाची वा परिचिताची वा शेजार्‍याची मदत घेणे. पण ego  आड येतो ना? मी कित्येक म्हातारी जोडपी पाहिलेय, कि त्यांची, शेजारी 

  ये-जाच नाही. आठवत का, एका श्रेष्ट कलाकाराचा मृत्यु.  त्याच पेपरातील दुसरी घटना.  जवानाचा मुखवटा घालत फसवणूक, याबाबत तीन बातम्या सांगितल्यात. त्या उद्या लिहिते. तत्पूर्वी, सुरक्षित राहण्यासाठी ज्या सुचना दिल्या आहेत, त्या वाचा. व विचार करा.

  १.सैन्यातील जवान कधीही, स्वतः चे ID card, मिडियावर पाठवत नाही.

  २. जी रक्कम पाठवाल , त्याच्या दुप्पट परत मिळेल, अशी सैन्याची पध्दत नाही.(पुन्हा इथे, मोहात् बलयसि) 

  ३. online sale- purchase व शादी friendship यात सर्वाधिक फसवणूक होते. म्हणून अशा संबंधात, एकटेच भेट न घेता दोन्ही पालकांची भेट योग्य आहे. २.४ नातलग/ वा शेजारी चौकशी करूनच  पुढे जावे.

  ४. ओळखीशिवाय कोणालाही पैसे पाठवू नये. 

  ५. आपण विक्रीसाठी, वस्तु ठेवल्यास, आपणच काही रक्कम देणे, वेडेपणा आहे. 

  ६. बँक खाते, पॅन कार्ड व आधार कार्डाचे detail कोठे ही on line वा प्रत्यक्ष कोणाला देऊ नये.

  ७. समोरून फोन करून, कोण बोलतेय, अशी विचारणा, झाल्यास, भोळेपणाने, आपले नाव सांगू नये. थोड्या दिवसाने, ह्याचाच उपयोग होतो.😁 आपला बावळटपणा, त्यांच्या लक्षात येतो. 

  तेव्हा स्वतः ही सावध रहा.  अन् आसपासच्या मंडळीना सावध करा. share करा. best way म्हणजे, हे असे माझे ब्लॉगस WhatsApp group वर forward करा घरबसल्या सामाजिक कार्य करा.  आपल्या संबंधिताचे  well-wishers व्हा.  तर उद्या आणखी या सायबर गुन्ह्याचे, अफलातून कारनामे.  निदान गंमत म्हणून वाचा व धडा घ्या व द्या.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू