फसवणूकम मग ती कशी व कोठून ही असो. ती अटळ नसते.

 ३०. ९ .२०२३. फसवणूक मग ती कशी व कोठून ही असो. ती अटळ नसते.

  माझ्या प्रिय सज्जन व आदर्श वाचक हो.  माझे लिखाण आपण मोठ्या संख्येने वाचत आहात, ही  जागृत सामाजिक जाणिवेचे प्रतिक आहे. त्याच बरोबर स्वतःच्या हितासाठी तरी ACTIVE  होत असाल, ही आशा. त्यासाठी समर्थरामदास स्वामी सतत झटत आले. त्यांचा मानस हेतू सर्वदूर पसरवण्याचा, हा माझा खारीचा प्रयास आहे. तो प्रयत्नात रूपांतर करणे, तुमच्या हातात आहे.  

  काल मी लिहिले, या त्यांच्या मागणीबाबत लिहायची गरज नाही. पण तरी मी लिहिणार आहे.  ते ही मागणी ,

  " प्रथमपुरूषी एकवचनात"  लिहीत आहेत. कारण  हे बोलताना,  भक्तांना आत्मसात करण्यास सोपे जावे. स्वतःच बोलताना, ते मनात जास्त प्रभावाने ठसते. 

  बघा, ९व्या  कडव्यात ते म्हणतात, " हितकारक ते दे रामा! म्हणजे, जे मला - आम्हाला हिताचे अाहे, ते घडू दे रामा!  माणूस स्वतःचा फायदा बघतो व मागणे पुढे करतो. पण दिर्घकालात, जी योग्य आहे, कोणाचे नुकसान न करता घडेल तेच होवो. 

    अश्वारोहण दे रामा!  यात जे मागितलेय ते समजून सांगते.  समुद्रमंथनात जी १४रत्ने वर आली,  त्यात  उचैश्ववा हा अश्व निर्माण झाला. त्याचा अर्थ जाणून घ्या. आज सायन्समध्ये horsepower  हा शब्द प्रयोग केला जातो. ते आपल्याला पटते. पण आपल्या पुराणात तसेच संत वाङ्मयात आपल्याला हेच  सांगितलेय. पण आपण ते महत्वाचे मानत नाही. घोडा हा तेव्हा व आजही बळाचे व ताकदीचे रुपक मानले आहे. त्याबळावर आरोहण करणे,  म्हणजेच ताकदवान होण्याचे प्रयत्न यशस्वी व्हावे, ही मागणी श्रीरामाकडे मागत आहेत. "राम" म्हणजे आपल्यातील , "क्षमता" हे मी कित्येकदा सांगितले आहे. "रा" शिव- असणे "म" शक्ती . त्या अापल्या आत्मारामाकडे हे मागणे मागायचे आहे. अर्थात् आत्मविश्वास आत्मनिर्भर व्हायचेय.

     तसेच हे  मान्य आहे, सायबर, तसेच प्रत्यक्षात गुन्हेगार सर्वत्र टपलेले असतात तेही युगेयुगे. फक्त त्यांची पध्दत - टाईप बदलत असते. पण सावधगिरी तशीच असते. ज्या मार्गाने जावयाचे, तेथे भोळेपणा उपयोगाचा नाही. ते म्हणतात, आपल्यात उत्तम गुण असावेत. प्रसंग ओळखून कोणावरही विश्वास ठेवावा. आजच पेपरमध्ये बातमी वाचली. एका व्यापाराला ( तो ATM मधून पैसे लाखो रूपये काढून बाहेर पडल्यावर) कोणा परक्या माणसांने सांगितले, तुमच्या अंगावर घाण पडलेय, तर त्या माणसाने,  लगेच बॅग खाली ठेवली व बघू लागला. अन् तो ठग बॅग घेऊन पसार झाला.  आता ह्या गृहस्थ, असूदेत, म्हणत दूर एखाद्या दुकानात जाऊन बघू शकला असता.किंवा " राहूदेत." म्हणत, पैशाची बॅग महत्वाची मानायला हवी होती. महत्वाचे म्हणजे अशी मोठी रक्कम काढताना , एकटे न जाता आपल्या बरोबर परिवारातील व्यक्तीला नेणे, योग्य ठरले असते नं. पण overconfidence नडतो. हे असे आपण कधी केले असेल. पण काही घडले नाही म्हणून ~~~असो. तर मग सावध मनुजा सावध रे होऊ शकेल पारध रे. तेव्हा सदैव सावध असा.  अन् इतरांना सावध करत रहा means simple thing - share this blog to more and more your dears and nears

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू