विदूर नीति जी आजही लागू होतेय.

 ११ .१० .२०२३ .विदूर नीति- आज ही लागू.

आज एकदम आपण महाभारताच्या काळ अभ्यासणार आहोत. हो. पण तुम्हाला bore नाही करणार बरे का? उलट Its really interesting हं.  पण तरीसुध्दा आजच्या परिस्थितीशी संबंधीत मुद्दांना अनुसरूनच लिखाण. बहुजनांना विदूर माहित असायलाच हवेत. पण ALAS! असे अनेकजण असतील कि, विदूर कोण विचारतील. किवा कदाचित , " ते" कोणाचे कोण माहित असेल, पण त्यांची महती जाणत नसतील. म्हणून थोडी  introduction.😉😊.  कौरव पांडव  ओळखीचे असतीलच ना?  त्यांचे हे काका. धृतराष्ट व पांडूचे कनिष्ट बंधु.  पण जेष्ट व श्रेष्ट असे तत्ववेत्ता. दुदैवाने राजकारणाला बळी पडलेले "दासीपुत्र" या नावानेच त्या काळात ज्ञात झालेले प्रज्ञावान व  द्वेष्टे. त्यांचे लिखाण संस्कृत मध्ये आहे, हे मान्य, पण भाषांतर करून सुलभ करण्याचा माझा हा प्रयास , आपण याचे प्रयत्नात रूपांतर करावा व करणारच, अशी मनिषा बाळगते. वाचा मग--- तसेच उद्या यावर आधारित गुन्हांपासून स्वतः ला वाचण्यासाठी, त्यांचे मानस शास्त्र समजून घेऊ या. विदूरनीतिच्या आधारे. आज आपण विदूरनीतिच्या पहिल्या अध्यायाचा विचार करणार आहोत. आधी दुसरा मग पहिला अध्याय अशासाठी  घेत आहे की, आजच्या परिस्थितीचा विचार करता हा क्रम घेणे सयुक्त ठरणार आहे. एखादी कर्तृत्वव‍ान व्यक्ती राज्यकारभार करत असताना, लोकांच्या दिलावर ही राज्य करीत असते. मग ती  व्यक्ती जरी पदावरून दूर झाली, तरी तिला कोणी विसरू शकत नाही. 

        Thats why,  replacement of that person should create  such an impression  that public can easily accept him/ her. त्यासारखीच ती उंची गाठणे, जरूरी असते. नाहीतर सतत तुलनेला तोंड द्यावे लागते. 

          विदूरजी आपल्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील १२३व्या श्लोकात म्हणतात,

            मितं भुक्तेसंविभज्याश्रितभ्या

            मितंस्वपित्यमितं कर्म कृत्वा ।

            ददात्यमित्रेष्वपि याचित:

            संस्तमात्मवन्तं प्रजहत्यनर्था: ।। १२३ ।।

         जो राजा वा शासनकर्ता, आपली प्रजा अधिकारी मंत्री, तसेच सर्व नोकर चाकर ह्यांच्या हिताचा  विचार करतो. स्वत:चा विचार न करता राष्ट्राचेच हित जपण्यासाठी धडपडतो, त्यासाठी काम जास्त -- झोप कमी ही दिनचर्या पाळतो. पहचान कौन?  त्याची साथ सोडून रयत जर अल्प अशा फायद्यासाठी स्वार्थी लोकांची ( again  पहचान कौन?) साथ देत असेल तर ती मंडळी समर्थांच्या भाषेत मूर्खच. असो. 

               य: सर्वभूतो्रशमे निविष्ट:

               सत्यो मृदुर्माकृच्छुद्धभाव: ।

               अतीव स ज्ञायते ज्ञातिमध्ये

               महामणिर्जात्य इदम्  प्रसन्न ।। १२५ ।।

  जो शासन कर्ता सर्व प्रजेच्या हिताकरीता , शांति करीता सत्याची कास धरून कार्य करतो. दुसर्‍याचा अादर सन्मान करतो.  सदैव पवित्र विचाराने चालतो, तो उच्च दर्जाच्या खाणीतून निघालेला किमती हिराच असतो.  अशी व्यक्ती आपल्याला लाभली असता, दुदैवाने ( नाईलाजाने/ मजबुरीने)  तिला काच समजून बाजूला होऊ देतो. व पुढे टोचू शकेल अशी काच  हातात घेतो, तेव्हा आपले काय होणार हे सांगायला कोणी भविष्य वेत्ता पाहिजे का? हेच आपण - यानि - आपले   भारतिय नागरिक, राजकारणांच्या नादाने, मोर्चा व बंद - विरोध यासाठी paid persons होऊन,  मूर्खपणा करतो. त्याचा विचार व्हावा.  सुशिक्षित जनता आम्हाला काय फायदा झालाय,असा point काढते, खेडोपाडी झालेले बदल, त्यांच्या गावीच नसतात.  त्याचा खोलवर विचार करण्याचीच, मानसिक तयारी नसते.  याला कबुतरी वृत्ती म्हणतात. नंतर कधीतरी याचा अर्थ सांगेन. आज वाचन कमी पण मनन जास्त असावे. अन्  जरा त्यामानाने  आपली वर्तन पध्दती बदलावी. व लाभ घ्यावा, ही अपेक्षा. तर उद्या आपली फसवणूक कशी व का होते, ह्याची कारण मिमांसा जाणून घेऊ. तर भेटू उद्या. माझे आजचे काम झाले. वाचन करून तुमचे काम चालू. means - like - subscribe & share to whom you know, care for them .

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू