विदूर नीतिच्या गंभीर विषयात पुनश्च मनोरंजन. पण म्हटले तर ह्याच विषयाशी संबंधितच.
प्रिय सुजाण व सज्जन वाचक हो, जेव्हा एखादा अधिकारी वा राजा शिस्तप्रिय असतो. तेव्हाच, त्याने एखाद्या प्रजाननाची वा समोरील व्यक्तीची मजबुरी समजूनच, कायद्याची अंमलबजावणी करणे, योग्य व अावश्यक असते. प्रत्येक वेळी नियमाचा बडगा दाखवणे, बरोबर नसते. हा सुखद अनुभव मला आला. तोच मी तुम्हाला सांगणार आहे. तसे पाहिले तर मी अपराध केला, नव्हताच. पण जरा माझा मूर्खपणा नडणार होता. पण सामना झाला, विदूरांच्या भाषेत, आदर्श अधिकार्यांशी. त्याची ही कथा वाचा व विचार करा. आपणही कधी आपल्या अधिकाराचा सोटा न उगारता, इन्सानियत दाखवलीय का?
म्हटले तर मुर्खपणा, नाहीतर सत्यवादीपणाचा कळस. तुम्हीच वाचून ठरवा. दोन्ही अनुभव रेल्वेतील टिसीसंबंधी आहेत. तर एकदा काय झाले, सकाळी ऑफिस मध्ये जाताना, घाईत पर्स बदलण्याच्या नादात, मी रेल्वेचा पास घरीच विसरले. चर्चगेटला प्लॅटफार्म २ व ३ च्यामध्ये गाडी थांबली, आम्हाला ऑफिसाठी, सबवेतून जावे लागते. मी जाताना, समोर टिसी दत्त म्हणून उभा ठाकला. अन् मला आठवले, पास आधीच्याच पर्समध्ये राहिलाय. मग शोधण्याच्या भानगडीत न पडता, मी सरळ टिसी ला सांगितले, माझा पास घरी राहिलाय,उद्या दाखवते प्लिज. तो म्हणाला, ते काही असले तरी आता दंड भरायला लागेल. पाहिजे तर उद्या चालू पास वर ऑफिसमध्ये दाखवून रिफंड मिळेल. मी स्पष्ट केले "अहो, पण माझ्याकडे पैसे नाहीत.", टिसी," बघा नं कोणीतरी ओळखीचे भेटेल की बाई", मी शोध घेऊ लागले कोणी भेटेना. त्यात मी जरा त्याच्या पासून दूर झाले. त्याचे लक्ष असावे. मी त्याच्या जवळ जाऊन म्हटले, कोण नाय भेटले हो." तो किंचित हसला व बोलला, त्या बाजूच्या गाडीत बघा नं, ट्रेनमधून जा", मी:- मला अशी भिती वाटते, गाडी सुटली तर? तो उद् गारला," मग असे करा, सबवेतून जा," मी, हां, म्हणून उतरले १व २ च्यामध्ये चढून शोधले .पण त्या दिवशी नेमके कोणीच ओळखीचे भेटेना. मी पुन्हा परतून २ व ३ प्लॅटफाॅर्मध्ये जाऊन, त्यांना म्हटले," अहो, कोणीच भेटले नाही तेथेही. काय करू? " त्याने कपाळावर हात मारून माझ्याकडे बघितले. तेवढ्यात आमच्या ऑफिस मधील एकजण जवळ आले , "काय झाले कर्णिक बाई?" मी काही बोलणार, तेवढ्यात ते टिसी महाशय म्हणाले, काय सांगू, त्या पास घरी विसरल्यात, मी सांगितले म्हणून दंडासाठी कोणालातरी शोधत होत्या. मी चांगले सांगितले, खालून समोर बघा, तर तिथे बघून परत येऊन बोलतात, कोण नाय भेटले. मला भल्या वाटल्या म्हणून जाऊन दिले. तर सिधा पुढे निघून जायचे तर~~ अन् तो , माझे कलिग व इतर पेसेंजर हसायला लागले. तेव्हा माझी पेटली. त्याने मला सोडून दिले होते. मी मॅडसारखी परत आले. अन् आज ही हा किस्सा आमच्या ऑफिसमध्ये विनोद झालाय. मला विसरले, पण माझा वेडा सत्यवाद - हा हा हा!
ह्या वेळी त्या टिसीने बहुधा माझा सरळ व सत्यवादीपणा समजून घेतला व आपल्या अधिकाराचा रूबाब न दाखवता माणूसकी दाखवली तर मग या अशा वर्तणुकीचा आदर्श ठेवावा व इतरांच्या समोर ही ठेवावा, ही विनंती. मग त्यासाठी share the blog everwhere possible to you.
Comments
Post a Comment