आपण भले तर दुनिया भली इति समग्र संत महात्मे.
13.10.2023. आपण भले तर दुनिया भली. इति- समग्र संत महात्मे.
मत्प्रिय रसज्ञ व मनस्वी वाचक हो, काल तुम्ही माझ्या सत्य प्रियतेचा नमुना पाहिलात. म्हणतात नं कि, स्वभावाला औषध नाही, तसल्यातलीच गत हो. मी असाच एक प्रसंग ओढवून घेतला,पण देवकृपेने, यावेळीही, एक भला टि.सी. भेटला. वाचा तर ही ह्या हरिश्चंद्राच्या भगिनीची कथा.
आता दुसरा प्रसंग. आम्ही मालाडहून भाईंदर ला शिफ्ट झालो. पण मी चालवत असलेली अंडर प्रिव्हिलेज मुलांची संस्था मालाडला होती. २६ जानेवारीचा दिवस. आधीच्या दिवशी रामलिला प्रचार समितीच्या चाचाजींनी मुलांसाठी खाऊ आणायला १०००रू माझ्याकडे दिले होते. मी अंधेरी लोकलने जाणार होते. भाईंदरला,फर्स्टक्लासच्या डब्यात मी घाईने विचारले, अंधेरी , आतील बाईने हो म्हटले.actually मला विचारायचे होते, अंधेरी लोकल का?अन् त्याबाईंचा समज झाला की, ही गाडी अंधेरीला जाते का? मी चढले. अन् काय गाडी बोरिवली हून थेट अंधेरी आली. उतरले व परत स्लोने वापस मालाडचे तिकिट काढण्यासाठी, पुलावर चढले, तर समोर टिसी माझ्या चेहर्यावरील भाव ओळखून त्याने मला थांबवले. मी पास दाखवून, काय झाले सांगू लागले. तो म्हणे, तुम्ही हा फर्स्टचा पास दाखवलात. आता मी त्याप्रमाणे फाईन लावणार. मी माझी अक्कल पाजळून सांगू लागले, माझ्याकडे पैसे आहेत, पण ते माझे नाहीत. तो काही बोलणार, तेवढ्यात समोरून, दुसरा टिसी आला., " एक मिनिट, तुम्ही रामलिला वाल्या मॅडम नं, राईपाड्याची अन् रेल्वे लाईनची पोरे तुमच्या बरोबर असतात.", मी हो म्हणताच त्यांनी मला एक नंबर वर नेले, मी तिकिटाच्या भल्या मोठ्या लाईनीकडे बघत होते. त्यांनी सांगितले, मी बाई, तुम्हाला पास देतो अाता फर्स्टनी जा. असा देवच भेटला. मी बचावले. चढताना म्हणे, अशा वेळी हा नाही पास दाखवायला. मग साधाच दंड भरून काम होतो हो.
अशी दुसर्यांदा माझा सत्यवादी पणा नडला असता. पण सुटले. तरी ही अशी जित्याची खोड तशीच आहे. आता यातून काहीच कार्य करण्यास, मी संदेश देत नाही. पण आपण भले असू, तर आपल्या भली माणसेच भेटतात. सर्वठायी , सामना फसवणूकीशी होत नसतो. असेच एक उदाहरण उद्या. तर see you.
Comments
Post a Comment