टेहळणी बुरूज भाग २.आपल्याला मिळत असलेली , "रसद"
16.10.2023. टेहळणी बुरूज भाग २. आपल्याला मिळणार असलेली, "रसद".
मत्प्रिय वाचक जन हो, तुम्ही सजग व सतर्क आहातच. त्यामुळे ही, "रसद" नेमकी कोठची याबद्दल, सुसंगत तर्क करालच. रसद म्हणजे, पूर्वीच्या काळी अन्नधान्य व शस्त्रपुरवठा हा अर्थ होता. पण आज त्या शब्दाच्या अर्थाचे स्वरूप जास्त व्यापक झाले आहे. छोट्या छोट्या प्रसंगी सहजगत्या मिळणार मदतीचा हात. तो बहुदा, आपल्या मानलेल्या, लोकांपासून मिळतो. पण ही एक give and take policy आहे. यातच शब्दशः आधी देणे असावे. आपण कोणासाठी," परक्या हं", किती करतो, त्यावर, " तो" आपल्याला take ची संधी देत असतो. तो म्हणजे वरती बसलाय तो हो ईश्वर. कोणी कधीच इतरांना मदत करणे, मनातही आणत नसतील, पण "गरजेला कोणी येत नाही हो," अशा टाहो फोडत असतील, तर no comment.
आपण, या ब्लॉगमध्ये प्रामुख्याने, फसवणूक कशी होते, त्याची चर्चा केली. पण त्याच बरोबर मला, समजून घेऊन मदतीचा हात देणारे टिसी ही पाहिले.
तसेच नेहमी सतर्क - उघड्या डोळ्याने वावरावे, असे सांगताना, मी हा एक महत्वाचा मुद्दा मांडणार आहे. आपल्यासाठी ," रसद" येत असेल, अन् आपण त्याचे स्वागत न करता, मनाची कवाडे बंद केली. तर काय होईल. म्हणून चांगले- वाईट, योग्य अयोग्य याची सतर्क व सजगपणे पारख करता येणे, हितावह होय.
आता माझा हाही एक अनुभव वाचा. मी कित्येकदा बाहेर फिरते. एकटीही. आजची पिढी त्याला solo traveling म्हणतात. बॅग घेतली की निघाले. त्यावेळी मला, पेढे परशुराम चिपळूणला जावयाचे होते. बस रत्नागिरीची. private बसेस गोकुळ हॉटेल बोरिवलीहून सुटतात. पण त्या बसेसचा दुसरा stop नॅशनल पार्क, मला जवळ पडे, म्हणून मी तेथे चढत असे. sleeper coach चे reservation केले होेते. एकदा बसेस उशीरा सुटल्या, त्यामुळे संध्याकाळी सात वाजले. अंधार झाला व सगळ्या बसेस - एका वेळेस ४.५ येत होत्या. मला नंबर नाव दिसेना. म्हणून, मी ( सजगतेने) एका फॅमिलीला , विनंती केली, जरा रत्नागिरीची बस आली की मला सांगा. पण झाले असे कि, रत्नागिरीची बस आली. अन् समोरच्या बसेसच्या मागून बरीचशी पुढे जाऊन थांबली. पण त्यांचे लक्ष राहिले नाही. मी चूळबूळ करत बघायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात एका विशीच्या मुलाने माझी बॅग ( जी जरा जडच होती) हातातून खेचली व धावू लागला. मी ओरडणार, इतक्यात, माझा विवेक जागा झाला व मला सुचले, तो धावताना," आजी लवकर या," म्हणाला. मी त्याच्या मागे धावले. पण गर्दीमुळे, जरा अंतर वाढले. अन् अचानक त्याचा आवाज आला, थांबा हो, आजी येत आहेत. त्यांची बस आहे." मी पोहोचेपर्यंत, कंडक्टर हातातील यादी पहात, त्याला नाव सांगा, म्हणत होता. तो बिचारा माझे नाव कसे सांगू शकणार? मी बसमध्ये पोहोचले. reservation बघितले. त्याला , thanks म्हणणार, इतक्यात, तो, " माझी बस" म्हणत धावला. मी त्याला दुसर्या बसमध्या चढताना पाहीले. नशीब बिचार्याची बस चुकली नाही. कोण होता तो, देवदूतच नं. नंतर कंडक्टर, मला म्हणे, अहो, ती बस गोव्याची आहे. मग तुम्ही ही नातवाबरोबरच बुकिंग करायचे ना?" मी हसले, म्हटले,"तो कोण मला माहित नाही. तो ही मला ओळखत नाही. पण मी,रत्नागिरीच्या बसने जायचेय, हे दुसर्या लोकांशी बोलताना, ह्याने ऐकले. आणि मला मदत केली." एक पॅसेंजर व कंडक्टर एकसाथ, बोलले, " great" खरेच simply great. नं, अन् मी जर वेड्यासारखी नको तो शब्द उच्चारत ओरडा केला असता, तर परत त्याने कोणालाच मदतीचा हात दिला नसता. म्हणून अगदी १० पर्यंत आकडे मोजू नयेत, पण १.२.३ तरी म्हणावे, व नंतर reaction करावी. प्रत्येक वेळी फसवणूकच होईल असे गृहीत धरणे, योग्य नाही. तसेच एकदा नाशिक ला घडले, बाहेर जाताना, माझ्या बॅगेत पुस्तके असतात. त्यामुळे ती जड असते. नाशिकला CBS च्या ST च्या डेपोला उतरताना, मी बॅग, पायरीवर ठेवत ठेवत उतरत होते. तेवढ्यात ५.६ वर्षाचा मुलगा समोर आला,अन् म्हणे," मी छोटा भीम आहे." व बॅग उचलण्याचा प्रयत्न करू लागला. ती जड बॅग त्याला उचलणे, शक्यच नव्हते. तो म्हणे," अहो बाबा, जरा हात लावा नं," त्याचे वडील पुढे आले व उचलून रिक्क्षात ठेवली. पण गंमत म्हणजे, पूर्ण वेळ हा छोटा बॅगेला लटकत होता व म्हणे, ए आज्जे, मी आणली ना, तुमची बॅग! आहे नं मी भीम छोटा भीम," म्हटले हो रे बाबा! अन् त्याच्या वडिलांना म्हटले, "खरेच हो, याचे कौतुक आहे, दुसर्याला मदत करण्याची वृत्ती कशी आलेय ह्याच्यात, घरी गेल्यावर, दृष्ट काढा, ह्याची"
ही अशी वृत्ती प्रत्येकात असली, तर समाजातील अर्धे problem निर्माणच होणार नाहीत. तेव्हा विचार कसला करता, आचार- अशी वर्तणूक, नेहमी करा, बस. माझ्या ह्या ब्लॉग लिहीण्याचे सार्थक होईल. then start . and increase number of helpful person in our society. FIRST GIVE AND THEN TAKE HELP. ह्यासाठी काय करायचे, तुम्ही जाणताच. share these blogs to everyone you know.
~~~~~~~~~~
Comments
Post a Comment