चांगल्या विचाराचा व आचाराचा प्रचार व प्रसार करा हो. त्यासाठीच ज्ञानी विदूरांचा प्रयास होता.

 १७.१० .२०२३.चांगल्या विचाराचा व आचाराचा प्रचार व प्रसार करा हो. त्यासाठीच विदूरांचा प्रयास होता.


माझ्या प्रिय व मनःपूर्वक वाचन करणार्‍या सुसज्जन वाचक वर्ग,  ४.५ दिवसापूर्वी , आपला परिचय विदूर नीतिशी करवला,आठवतेय. ह्या त्यांच्या प्रयासात माझा खारूताईचा वाटा. ती नीति पुर्णतः आजच्या राजकर्त्यांना लागू होतेय. जेव्हा कोणा एका राजकर्त्याने, सजग व सुजाण रीतिने राज्यकारभार चालवला नाही, तेव्हा काय घडले, ते आपण सर्वांनी अनुभवलेच आहे. तेच विदूर आपल्या नीतितून सांगत आहेत. पांडूराजाच्या नंतर जेव्हा धृतराष्टांना (अंध असून ही) हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसवले, तेव्हाच अधोगतीचा मार्ग दिसला. स्वतः हे विदूर, दासीपुत्र  होते, तरी राजवंशाचाच अंश होते. ज्ञानी व विचारवंत व बुध्दीवान होते. त्यांचा जन्म ही काही अनैतिक संबंधातून नव्हे, तर नियोग पध्दतीला अनुसरून झाला होता. असो. तर त्यांनी जे लिहिले, ते  आज ही लागू पडले आहे. घडले आहे, हे सत्य आपण पाहिले. योग्य निवड व  घडण ही सुनियोजित राज्य कारभारास आवश्यक बाब आहे, हे पटले ना! तर  आता दुसर्‍या अध्यायातील २७, २८ व २९ हे श्लोक आपण प्रथम बघणार आहोत. कारण ते अ‍ाजच्या परिस्थितीला लागू पडतात. कसे ते बघा.

        पितृ पैतामह राज्यं प्राप्तवान्स्वेन कर्मणा 

        वायुरभ्रमिवासाद्य्   भ्रंशयत्यनये स्थित: ।।२७ ।

 एखादा राजा वा राजकर्ता वा नेता,  आपल्याच अनीतिपूर्ण कार्याने, म्हणजे,आपल्याच चूकीच्या वर्तनाने, वाडवडिलांनी निर्माण केलेले राज्य धुळीला मिळवतो. तेही असे की जणू जोरदार वादळाने जमा झालेले ढग आकाशातच इतरत्र विखुरले जातात.

       धर्ममाचरतो राज्ञ: सदि् भश्चरितमादित: ।

       वसुधा वसुसंपूर्णा वर्धतेभूतिवर्धनी  ।। २८ ।।

    जो राजा अापल्या पूर्वजांनी दाखवून दिलेल्या आदर्शानुसार, तसेच आजवर स्वत: च आखून दिलेल्या साचेबंदाप्रमाणे, आपणच निर्माण केलेल्या नीतिने वर्तन करतो. त्यावर प्रजा व  त्याचे परिजन प्रेम करतात. त्याला वंदनीय मानतात. तसेच लक्ष्मी (धन व यश) त्यावर वरदहस्त ठेवते. पण जर उलट घडले तर  सर्वच हातातून निसटते.  इथे मात्र विदूरांनी जे प्रजेच्या चोखंदळपणाला गृहीत धरले, ते आजच्या जनतेने खोटे ठरवले. कसे तर money- money- money. आजच्या काळात, राजकर्ता ठरवणे, जनतेच्या  हातात असूनही, परवा म्हटल्याप्रमाणे, थोड्या स्वार्थासाठी, नको त्या नेत्याला दिलेले पाठबळ, अंगाशी आले, पण योग्य राजकर्ते पुढे आले. असो.

            अथ सन्त्यजतो   धर्ममधर्म चानुतिष्ठत: ।

            प्रतिसवेष्टते  भूमिरग्नौ चर्माहित यथा ।।२९ ।।

       धर्माचा पालन  :- इथे धर्म म्हणजे हिंदु मुस्लिम वगैरे अभिप्रेत नाही, तर धृ इति धारयते तो धर्म. म्हणजे मातृधर्म  पुत्र धर्म . गुरू धर्म शिष्य धर्म व राजा धर्म प्रजा धर्म. थोडक्यात कर्तव्य. तर अशाप्रकारे जो राज्यकर्ता, राज्य मिळवण्या साठी, प्रजेच्या हिताचा विचार करत नाही. त्याचे  राज्य अल्पजीवी ठरते. जसे आगीत टाकलेले चामडे संकोच पावते, अगदी तसेच. माझा इशारा सूज्ञ समजले असतील, अशी आशा आहे. 

       आजचा लेख मोठा व अ‍ाशय फार मोठा आहे.  शिवाय तो आपल्या आपल्या पुढील पिढीच्या भल्याच्या दृष्टीने विचार करण्यास भाग पाडणारा आहे. "मला काय करायचेय. मी काय करू शकते/ शकतो". असे म्हणून चालणार नाही. जर आपण आपल्या मुलांचा अभ्यास,  त्यांचे आरोग्य ह्याचा विचार करतो.  तर त्यांना पुढे आजूबाजूला वातावरण ही चांगलेच मिळायला नको का?  

         If you are driving on the high way and you want safety , then your best driving is not enough .  All other drivers on the road, should be the best and following  traffic rules. So wish everybody on the social life Road should be alert and disciplined driver. of course,  you know, your duty  and share this thought by sharing these blogs as possible as. 

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू