सुखी जीवनातील मुख्य अडसर - अात्म वंचना.

 १८.१० .२०२३ .सुखी जीवनातील मुख्य अडसर- 

 अात्म वंचना.  

        माझ्या सुविचारी वाचक हो,  आज कित्येक वयस्क आपली, स्वतःचीच फसवणूक करताना दिसतात. समर्थरामदासाच्या शब्दात - पथ्य न पाळी, तो एक मुर्ख. पथ्य हे आरोग्याशी संबंधित असते. वैद्य सांगतात, ते न ऐकणारे, स्वतःच्याच स्वास्थाचा नाश ओढवून घेतात. त्यालाच आत्म वंचना म्हणतात. हो, आणखी पथ्य हे सामाजिक स्वरूपाचे ही असते. कसे ते सांगते.

१९७० साली प्रथम, "नटसम्राट"  हे नाटक आले. या नाटकातून वि.वा. नां( कुसुमाग्रजांना) नेमका  काय संदेश द्यावयाचा होता, ते तेच जाणे. पण तेव्हापासून तमाम श्रोते, अप्पा बेलवलकर, या नटसम्राटांसाठी, भावूक झाले, ते आजतागायत. पण कोणीही त्या मुलांची ही  "काही" बाजू असेल, हा विचार केलाच नाही.  समजा, आपल्यातील वृध्द पालक, बाहेरून भजी वगैरे आणून कागदातच खाऊ लागले तर  घरातील मुलांची प्रतिक्रिया काय असेल?   तुम्ही त्या मुलांच्या जागी असतात तर~~  तुमची प्रतिक्रिया काय झाली असती? विचार करा बरे!

  आता ही एक सत्य घटना सांगते. मी ऑफिसमधून येताना, दादरला  वाचनालयात जात असे. तेव्हा लक्षात आले कि, रोज एक वृध्द महिला, प्रवासी महिलांकडे पैसे मागत असे. तिकिटाला पैसे नाहीत म्हणे.  बिना तिकीट बरोबर नाही नं! ही वर मल्लिनाथी. तिच्या वयाकडे पाहून नवनवीन target मिळत असे. विशिष्ट रक्कम मिळाल्यावर, गेटकडे वळे. मी व मैत्रिणीने लक्ष ठेवले. तर ती नंतर गेटजवळील स्टॉलवर बटाटेवडे व गुलाबजाम खात असे व निघून जाई.  मैत्रिण म्हणाली, साडी चपला महागाच्या दिसतात. मी एकदा तिच्या घरच्यांचा शोध घेतला अन् भोचकपणाने घरातील मंडळीची भेट घेतली व त्यांच्याशी बोलले.  लक्षात आले, मधुमेह ३५०च्या वर असल्याने घरी पथ्य चालू होते. डॉक्टर मुला सुनेला दोष देत होते. देवळाच्या नावावर ही महिला ( वय६५) - बाहेर पडत असे. त्यांना धक्काच बसला. आता त्या सुनेच्या जागी स्वतःला  ठेऊन विचार करा. या वयात जरा  रसनेवर- जीभ हो, ताबा मिळवायला हवा नं? हा असला टोकाचा मार्ग सगळेच घेत नाहीत,  पण काय होतं नाही हो, म्हणणारी बरीचशी मंडळी आपल्यात आहेत. खाणे- आपल्यासाठी असते आपण त्या आहारी जाऊ नये.  हे सुध्दा एक व्यसनच, म्हणते मी. पण सांगायचा मुद्दा,  त्यांच्याच  कुसुमाग्रजांनी, लिहिलेल्या "पाचोळा" ता कवितेतून, त्यांनी, सर्व जेष्ठ व श्रेष्ठ नागरिकांनी, मोहातून आपल्याला मुक्त करणे, जरूरी आहे. हे सांगितले आहे. काही दिवसापूर्वी,  आपण ती कविता अभ्यासली होती. नटसम्राट रंगमंचावर श्रेष्ठ असले, तरी लौकिक जगात, घरातील स्वच्छता व मुलांची प्रतिष्ठा पण जपणे, अापले कर्तव्य आहे हे त्यांच्या ध्यानीमनी नव्हते. आज ही  ५० वर्षानंतर ही, प्रेक्षक, ह्या नाण्याची दुसरी बाजू समजून घेतच नाही.  जर आपल्या घरात असे घडले तर~~ असो. पुढच्या पिढीसाठी, स्वतःत बदल करणे, नक्कीच योग्य व फायदेशीर राहील. 

   आपण, आपल्या तीन इस्टेटी बद्दल विचार करत आहोत.

     तन मन व धन. तेव्हा ह्याची जपणूक व कमाई- जमाई करणे, हे आपले कर्तव्य नाही का?   तेव्हा काय करणार, हा विचार व आचार, सर्वदूर फैलवा. share the blog. निदान घरात चर्चा तरी करा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू