सुखी जीवनातील अडसर आत्मवंचना भाग दुसरा.

 १९.१० .२०२३ . सुखी जीवनातील अडसर -आत्म वंचना भाग २.

       सुजाण वाचक वर्ग हो,आज माझाहा लेख छोटासाच असेल, पण दोनदा वाचा व चिंतन करा अन् चिंता मिटवा.  काल मी उल्लेख केला ते कुसुमाग्रजांचे  काव्य वाचा, समजायला सोपे व सुलभ आहे. पण उमजून आचरणात आणण्यास अवघड आहे. पण नामुमकीन नाही. पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ

तरू त्यावरती एकला विशाळ

आणि त्याच्या बिलगूनिया पदास

जीर्ण पाचोळा पडे तो उदास


उषा येवो शिंपीत जीवनासी

निशा काळोखी दडवु द्या जगासी

सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा

मूक सारे हे साहतो बिचारा


तरूवरची हसतात त्यास पाने

हसे मुठभर ते गवतही मजेने

वाटसरु वा तुडवीत त्यास जात

परि पाचोळा दिसे नित्य शांत


आणि अंती दिन एक त्या वनांत

येइ धावत चौफेर क्षुब्ध वात

दिसे पाचोळा घेरुनी तयाते

नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे


आणि जागा हो मोकळी तळाशी

पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी.

   कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर

                    आता ह्याचा मतितार्थ पाहू. 

         ही कथा आहे, एका उजाड माळरानावरच्या  एकल्या मोठ्या वृक्षाची. जो येणार्‍या जाणार्‍यांना  छाया सावली देत आहे, या माळरानात  भगभगत्या उन्हात, आपल्या विपुल पर्णराशींच्या मदतीने.   तसेच आपल्या मानवी जनतेच्या हातभाराने, ईश्वर ह्या  दुनियेच्या रंगभूमीवर समाधानाची  छाया देत आहे.

      सदैव तीच पाने काही, वृक्षवल्लींवर राहत नसतात. नवी पालवी येत असते. साहजिक जुन्यांनी, त्यांना, सर्व क्षेत्रात, बाजूस होऊन जागा देणेच योग्य ठरेल, हेच कुसुमाग्रज सांगत आहेत. 

       हा वृक्ष समाज जीवनाचे रूपक आहे. ज्या पानांना, तो दिमाखाने, अापल्या अंगाखांद्यांवर मिरवत अाहे व त्यांच्यामुळेच वाटसरूंना सावली देऊ करतो. ती चिरंतर नसतात. जसे,

         मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

         अकस्मात ति ही पुढे जात आहे.

          त्या शिवाय नव निर्माणाला जागा कशी मिळणार?

   खाली पडलेल्या व झाडाच्या पायाशी साठलेल्या जीर्ण पर्णराशींना ही तिथून वार्‍याच्या मदतीने दूर जायला पाहिजे. जागा अडवून राहू नये, हेच कवितेत कवीला अभिप्रेत आहे. शब्दशः अर्थ घ्यायचा, तर तरूणांनी खेळ व  टाईमपास सोडून, चरितार्थाच्या मागे लागावे. पौढांनी, तरूणांच्या कर्तृत्वाला वाव द्यावा. पौढांच्या मार्गातून वृध्दानी आपलीच न चालवता, विश्राम घ्यावा.  हा संदेश आहे. पण कोण लक्षात घेते? त्या शालेय मुलांना हा आशय कसा समजावा बरे?  पौढ वृध्दांसाठी पूर्वी किर्तन- प्रवचनातून हे समजावले जाई. पण आजचे बुजुर्ग, ना घरके ना घाट के.😀 . हेच पर्ण राशीप्रमाणे, आहे आपले  विधिलिखित. जाणून घ्या. मालिका व ते जीवन आपल्या कक्षेच्या बाहेरील आहे. असे वर्तन आपल्या स्वतःच्या घरात झेपणार नाही. मुलानातवंडाना मार्गी लावायचे, तर स्वतः track वर रहा.  मुलांनो, परत एकदा सांगते, सांभाळा, आपल्या जेष्ठ पालकांना! नाराज होऊ नका, ह्याचमध्ये आपले भले भविष्य आहे. like ( पटवून घ्या) करा & subscrbe करा. ( या विचारसरणीत स्वतःला सामावून घ्या) मग बघा सुख आले दाराशी म्हणाल. त्याला दारातून आत घेणे, तुमच्या हातात आहे. ातर उद्या भेटू या.  त्यांच्याच "नटसम्राट" ला वेगळ्या angel ने बघण्यासाठी. 

    शेवटी जित्याची खोड~~ थोडक्यात लिहिताना, मोठाच लेख झाला. ह्याचे काय करायचे, तुम्ही जाणताच.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू