तनमनधन ही तीन साधनेच आपल्या जिवित कार्याची कार्यक्षमता चालू ठेवतात.
2.10 2023.
तनमनधन ही तीन साधनेच आपल्या जिवित कार्याची कार्यक्षमता चालू ठेवतात.
प्रिय सतर्क व सुजाण वाचक मंडळी, पितृपक्ष सुरू झाला. आपल्या सर्व विश्वातील पितरांना अभिवादन करून, मी माझे ठरवलेले - जिवित कार्य, या ब्लॉग द्वारे करीत आहे. मला प्रोत्साहन देणे,सर्वस्वी तुमच्या हातात आहे. अन् ते तुम्ही करीतच आहात. या शिर्षकातच, माझ्या पुढील लेखनाचा सुतोवाच केला आहे. आपण या तनमनधनाच्या साहाय्यानेच, त्यांचे संरक्षण केले, तर आनंदी आयुष्य भोगू शकतो. यात पहिले, " तन" दुसरे " मन" व शेवटी तिसरे
" धन" म्हटलेय. पण मी शेवटून सुरूवात केली. सर्व प्रथम , धनाचा विचार केलाय. आठवतेय नं, कमाई व जमाई, नंतर मनाचा म्हणजे मनःस्वास्थाचा विचार, श्रीरामाच्या दासांच्या म्हणजे आपल्या लेखी समर्थरामदासस्वामींच्या संत वाङमयाच्या अाधारे केला. आता आपल्या सर्वात लाडक्या तनाचा विचार करू या. खाणे पिणे हाच विचार करणारी व त्यासाठीच जगणारी मंडळी जगात जास्त दिसून येतात😁. त्याच्या आरामासाठी चोचल्यांसाठी व मुख्य म्हणजे आरोग्यासाठी तर सर्व धडपडतात. तसेच सर्वांना दिर्घायुष्य हवे असते. एकदम ठिकठाक राहावयाचे असते. पण या साठी प्रयत्न मात्र करतात, ते ६० नंतर प्रभात फेरी (अरेच्चा, morning walk म्हणायचे नं?😉. योगा वगैरे. पण पथ्य - style मारणार, पण चिकन मटण no way. हां, शाहाकारी म्हणतील, आमचा सवालच पैदा होत नाही. पण पनीर बटर चीज वगैरेच काय 😉. असो. निदान अपघातापासून काळजी घ्यावी, हे नक्की. तर या तन- शारिरीक दक्षतेबाबत थोडे. त्या साठी घरात ही काळजी घ्यावी लागते. खाण्याच्या सवयीत जरा बदल करावा. पण मी आता जे सांगणार आहे, ते वेगळेच. आजकाल बाथरूमच्या सपाता असतात. खरे तर पूर्वीच्या पध्दतीनुसार आपले अनवाणी पायच योग्य पकड जमवू शकतात. सहसा कधी घसरण होत नाही. पण आजकाल बाथरूमध्ये चकाचक टाईल्स लावतात. पूर्वीच्या लादीवरून सहसा पाय घसरत नसत. बरे पडू नये, म्हणून, आधाराला भिंतीला हात धरावा, तर तिथे ही कलरऐवजी टाईल्स, मग तो हात ही सरकतो. मग वर पकडण्यासाठी बार. लावायचे. म्हणजे म्हणतात नं, असो. पूर्वी एक रीत होती. कोणाला आठवतेय का, उंबरठ्यावर पाय ठेवायचा नसतो. तो ओलांडायचा. simple thing, त्यावरूनच घसरून लोटांगण होते. मग fracture इत्यादी. त्यासाठी घ्यावयाची काळजी. तसेच झोपेतून उठताना पडणे, ऐकिवात आहे. तर पुढील तीन व्हिडिओज् नीट बघा. व तन- शरीराची काळजी घ्या.
हे मी मुद्दाम बनवलेय. त्यातून पानभर लिहिण्याच्या ऐवजीच काम भागेल. तसे तर पडून दाखवता आले असते. पण मीच घाबरले😬. तसेच अनेक प्रकारे शारिरीक घटना घडू शकतात. तसेच २.३ वर्षा आधीच्या ब्लॉगमध्ये मी लिहिले होते. घरी style मध्ये diet करणारी मंडळी, लग्न कार्यातून गेली की गंमत करतात. हल्ली बहुदा अशा समारंभातून रात्रीच बुफे असते. मग काय diet को मारो गोळी म्हणत, काठोकाठ प्लेट भरून, पोटावर अत्याचार करतात. त्या पचनसंस्थेला मिताहाराची सवय झाली अंसते मग हा अचानक मारा झेपत नाही.😀. तर जरा संभलके.
हे पटतेय ना, अहो , " तन" तंदुरुस्त तरच मन समाधानी व तेव्हाच, ते "धन" फायदेमंद,नाहीतर ती डॉक्टरांची धन.
तेव्हा take care of these three things:- तनमनधन अन् नेहमीचेच हा विचार आचार व प्रकार सर्वत्र पसरवा. यानि कि share this blog to everybody you know and every where.
Comments
Post a Comment