आपल्या जीवनात असलेल्या सुखांची नव्याने ओळख करा.
२०. १०.२०२३ . आपल्या जीवनातील असलेल्या सुखांची नव्याने ओळख.
वाचक हो, लगेच , "काय वेडी आहे ही लेखिका", अशी प्रतिक्रिया देऊ नका हो. आपल्या जीवनात असलेली सुखे आनंद आम्हाला माहित आहे, मग ही परकी बाई काय नव्याने ओळख करून देणार? असे वाटले नं? पण कित्येक बाबी - परक्या नजरेला झटकन लक्षात येतात. आठवतेय, मी दोन दिवसापूर्वी काय म्हटले होते, कित्येकदा क्रॉस करताना, त्या चालकाने वेळीच ब्रेक दाबल्याने, आपला जीव वाचला असतो, हे वाच्यार्थाने घ्या व विचार करा. अनेक प्रसंग आठवतील, कोणीतरी आपले हित जपले असते. पण हे आनंदाचे व सुखाचे क्षण, अनेकांच्या लक्षात राहतच नाही. मिळालेले समाधान, आपणच अल्पकालिन ठरवतो व दुःखाचे व अपयशाचे क्षण कवटाळून बसतो. परत परत आठवत बसतो. मग त्याचे रूपांतर, " वेळ आल्यावर बघून घेईन, मध्ये होते. "आपला तो बाळ्या " या उक्ती नुसार माझी ती भावना, अन् दुसर्याने, आपल्या वर्तनाच्या बाबतीत, लक्षात ठेवल्यास, ," फालतू गोष्ट ती, त्याचे काय एवढे मनाला लावून ISSUE करायचा?" असे म्हणायचे.
आता जरा काल म्हटल्याने प्रमाणे, नटसम्राट चा योग्य ( माझ्या मते ) विचार करू. तसे पाहिले, तर आपला समाज नटाला महत्व देतो. लेखक दिग्दर्शक नेपथ्य पार्श्वसंगीत ही मंडळी या प्रेक्षकांच्या खिजगणतीतच नसतात. असो. पण ही चंदेरी दुनिया, खरी नाही नकली आहे, हे नटमंडळीही विसरतात. चाहत्यांच्या गराड्यात स्वः ला विसरून, कलाकृतीचे आपणच सर्वेशा मानू लागतात. मग सुरू होते घरच्या मंडळींची गळचेपी. सर्व ठिकाणी कमावती व्यक्ति, मुख्य असते. पण ह्यांच्यात थोडा "ग" निर्माण होतो. अन् तो पोसतो, आपला समाज. तुमच्यातल्या, कोणी एखादा पटकथा लेखक वा दिग्दर्शक भेटला. अमका make up man किंवा नेपथ्यकार, माझा नातेवाईक आहे, म्हणून भुषण मानलेय का? खरे सांगा. कित्येकदा stage workers चा ह्या यशात फार मोठा वाटा असतो. पण कोण लक्षात घेतो? तर मुद्दा असा आहे, कि नट हा सम्राट ठरतो. ह्या सर्वांच्या सहाय्यामुळे..
आता हे स्वतःला सम्राट समजून, आपल्याच मनोवृतीने जगू लागले, दुसर्याचा विचार, अपेक्षा समजून न घेता, मनमानी जगू लागले, तर कसे चालेल? ह्यांच्या मोठ्या यशापुढे, मग कित्येकदा, परिवारातील अगदी मुलांच्या यशाला कमी लेखले जाते. त्यासाठी ह्या मंडळींनी ही जर अापली मुले, याच क्षेत्रात येत असतील तर, आपण exit घेणे, योग्य नाही का? पण त्यांचे तथाकथित चाहते, त्यांना डोक्यावर चढवून, पापच करीत असतात. याचा फायदा जाहिरातदार घेतात. व मूर्ख जनतेच्या माथी, आपला माल थोपतात. एक उदाहरण देते, घडी डिटर्जंट पावडर. शहेनशहा जाहिरात करतात-- ५ पॅकवर एक मोफत. आधी वापरून पाहा, मग विश्वास ठेवा. मुळात, या जेष्ठ व श्रेष्ठ व्यक्तीला, कधी या मालाची ओळख व वापर करायची वेळ आलीच असेल का? 😬😁 अन् म्हणे वापरून खात्री करा, ऐवढी सहा पॅकिटे घरात आल्यावर, ती संपेपर्यंत झक्कत वापरणारच ना? थोडक्यात, "हं काहीतरीच हं, श्री." तर यावर विचार करणे, आपोआप होणार, वेगळे सांगणे, न लगे! तर हा मजेशीर प्रकार, नक्कीच share कराल, हे ही नक्कीच. निदान mouth publicity तरी. फक्त संदर्भ सांगा, ह्या ब्लॉगचा.
Comments
Post a Comment