जेव्हा कोणालातरी आपली मुले, अन्यायाने गमवावी लागतात. त्यांना आजचा दिवस समर्पित.

 २१ .१० .२०२३. जेव्हा कोणाला तरी आपली मुले, अन्यायाने गमवावी लागतात. त्यांना आजचा दिवस समर्पित.

        वाचक हो,  आज मी पूर्ण निराश आहे. म्हटले  दिल्लीची ही घटना. पण दिल्ली तो दूर है। म्हणून चालणार नाही हो.   घटना आहे २००६ मधली. दिल्लीतील नोईडा सेक्टर ३१ मधील निठारी गावची. झाले असे कि, तेथील डी- ५ कोठीच्या मागे वाहण्यार्‍या नालात,  अनेक मानवी सांगाडे दिसून आले, अन् धक्कादायक बाब, म्हणजे ते सर्व लहान मुलांचे होते.  जास्त नाही १७ वर्षापूर्वीची गोष्ट. सर्वांना आठवत असेल.  संपूर्ण देशात रागाची व शरमेची लाटच उसळली. तेव्हा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे राज्य होते.ब मुलायमसिंग मुख्यमंत्री होते.  

          तेच्हा दिल्लीत १९ मुले बेपत्ता होती. पण सर्व गरिबांचीच असत. त्यामुळे, no comments .पण हे सांगाडे मिळाल्यावर, तपासाला वेग आला. त्या मुलांचा काय दोष होता, ती गरीब घरातील रस्त्यावर खेळणारी होती. पण या विचित्र अमानुष घटने नंतर  पोलिसांची पथके, गस्त घालू लागली. निष्पन्न निघाले, ते अति भयानक होते.  जिथे  हे सांगाडे सापडले, त्या सेलच्या मालकाची चौकशी झाली-मोनिंदरसिंग व त्याचा नोकर सुरेंद्र कोळी. तेच  दोषी  निघाले. त्यांनी आरोप कबूलही केले.

           " नरभक्षक" प्रकार होता.  एक महिला ही मारली गेली होती.  दोघांनी नरभक्षण व मृत देहाशी संबंध कबूल केले. केस उभी राहीली. पण त्याचा निकाल लगेच न लागता  २०१७ मध्ये लागला. सीबीअाय कोर्टाने, दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. खरे तर त्यांच्या ह्या अशा क्रूर वर्तनासाठी, त्यांना हाल हाल करून मारायला हवे होते.   पण  आपला अंधा कानून. तरी   सामाजिक  रित्या , दिलासा मिळाला. मुलांच्या पालकांना न्याय मिळाला. पण या शिक्षेची कारवाई झालीच नाही,असे दिसते. आरोपीच्या वतीने सुप्रिम कोर्टात अपील केले गेले. एक कळत नाही, ह्या अशा माणसांची केस कोठच्या निर्दयी वकिलांनी लढवली??? त्यांना मुले नव्हती का? असो. कालच्या पेपरात धक्कादायक बातमी वाचली, ही केस अजून चालली होती. अन् भक्कम पुराव्या अभावी व त्यावेळच्या ढिल्ला तपासामुळे, ते दोघांची निर्दोष मुक्तता  झाली. हा कोठचा न्याय? त्या गरीब पालकांना या देशात कोणीच वाली नाही का? या प्रकरणात , मला काय  करायचेय, हे म्हणणे, महापाप आहे. मी तरी पिच्छा  पुरवायचे ठरवलेय. वाचक हो, निदान मौखिक व मौलिक पाठिंबा द्याल का?  २००६ ते २०२३ ही दोघे , आयुष्य जगू शकली. जेव्हा रायगडाला जाग अाली, तेव्हा मराठी हिंदु राज्य उभे राहिले. हे चांगले घडले. आज भारतियांना जाग येईल का? या सुटकेचा परिणाम,  म्हणून भविष्यात असेच गुन्हेगार  निर्माण होतील, त्याचे काय? सोचो सोचो,  ही बातमी सर्वदूर पसरवा. हे सांगायला हवे का?

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू