तिला असे अमर करू या

 २३. १० . २०२३. जिथे उलटी गंगा   वाहते, त्यांचे दुःख,  नेहमीच ," परदुःख शीतलच" असते. भाविका तुझ्यासाठी.

     माझ्या वाचक हो, परवाचा लेख वाचलात नं? काय प्रतिक्रिया झाली हो, मनापासून सांगा, ज्यांनी तो वाचला नसेल, त्यांनी आवर्जून वाचावा, ही विनंती.  ते दिल्लीतील गरीब  परिवार , ह्या कायदेशीर कारवाईने किती दुखावले असतील. त्यांच्या मुलांना मारून खाल्ले गेले. ती  २००६ मध्ये १०. १२ असलेली आज १६.१८ वर्षाचे तरूण  असते. आपण म्हणतो, आईचे ह्रदय कितीही व कधी ही आपल्या बाळाला विसरू शकत नाही. भले त्याच्या शिवाय आणखी अपत्ये असली तरी मग त्या मातेच्या जागी   कोणी ही स्वतःला कल्पनेत ही बघू शकणार नाही. आज मी माझी एक मुलगी, भाविका ( हो, विद्यार्थिनी)  गमावली. फक्त १५ वर्षाची होती हो.  छोट्याशा तिला," श्रध्दांजली" असे म्हणणे, नशिबी आले. त्या दिल्लीच्या पालकांचे दुःख समजू शकते.  असे म्हणतात, प्रत्येक बाईच्या ह्रदयात,  एक, "आई"असते अन् ती दुसर्‍या  आईला समजून घेते. पण या माझ्या विश्वासाला आज तडा गेला. परवा लिहिलेल्या ," निठारीच्या" केसमध्ये धक्कादायक बाब म्हणजे, त्या दोघा नराधमांची केस, एका महिला वकिलाने लढवली व त्या दोघांना सोडविले. त्या अगम्य महिला वकिलाचे नाव आहे, "मनिषा भंडारी." ह्या वकिलीत, तिला ( हो, तिलाच, आदरार्थी, "त्यांना" असा उल्लेख नाहीच) किती पैसे माहित नाही. पण तिच्या पदरी पापाच्या राशी निश्चितच जमा झाल्यात. बस आज येवढेच. to share not to share, make no difference to these mothers. जखम आईच्या काळजाची, युगे युगे वाहत आहे.  अशी उलटी गंगा वाहू नये रे देवा, हेच तुझ्याकडे  मागणे.बस.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू