दसरा- सिमोल्लंघनाचा दिवस. विजय दिन.

 २४. १० .२०२३ .

 दसरा - सिमोल्लंघनाचा दिवस. 

      माझ्या प्रिय वाचक हो, मी तर एका अर्थाने सीमोल्लंघन केलेच आहे. म्हणून तर या ब्लॉगद्वारे आपल्यापर्यंत येत आहे. चला,तुम्हीही खर्‍या अर्थाने सिमोल्लंघन करू शकाल का? मनात आणाल तर, नक्कीच कराल. त्यासाठी कोठेही जावयाची गरज नाही. घरबसल्या करू शकाल. नवल वाटले ना? हीच तर गोम आहे. फक्त तुम्हाला जरा चौकस होणे,आवश्यक आहे. अन् मी व माझा परिवारच ही कल्पना जराशी व्यापक बनवायला पाहिजे, बस. हो, आणि त्याशिवाय थोडे "भोचक" बनावयास पाहिजे. दचकलात नं? घाबरू नका. प्रत्येक वेळी भोचकपणा, म्हणजे, इतरांच्या बाबतीत, " नाक खुपसणे, वाईटच नसते, तर त्यातून सामाजिक कार्य घडत असते. नाकासमोर चालणारे "ते कसे बुवा?"  असे विचारतील. तर ऐका. जर शेजारी काहीतरी विचित्र घडत असेल, तर वेळीच , तिथे इतरांनी लक्ष घातलेच पाहिजे. तिला, तिचा नवरा मारतोय, मला काय करायचेय? एखाद्या मुला/ मुलीला काही कारणाने त्रास दिला जातोय, असे लक्षात आल्यावर, त्यात वेळीच हस्तक्षेप करणे, चांगले कार्य ठरते. एखादी मुलगी / मुलगा रस्ता भटकत असेल, तर तिच्या पालकांना सावध करणे, हे पुण्याचे काम आहे. हां, एखादे पालक कदाचित, नाही नक्कीच, काहीतरीच काय, आमची मुलगी/ मुलगा असा नाही हं, म्हणून झटकू शकतील. पण आपण त्यांना सावध करण्याचे कर्तव्य करावे, तसेच आपल्याला कोणी सावध केल्यास नीट शहानिशा करावी.  शिवाय, आपल्या मोलकरीणीच्या मुलांची चौकशी करावी. त्यांचे शिक्षण व आरोग्य यासाठी लागेल, ती जमेल तशी मदत करावी.  हे सीमोल्लंघन कराच. किती समाधान मिळते, ते बघा. एखादी गोष्ट कळली, कि त्याची, " अगबाई, अरेच्चा!" अशी gossip करण्यापेक्षा, ती गोष्ट अयोग्य असेल वा गरज असलेली असेल, तर हस्तक्षेप जरूर करावा. 

    हा भोचकपणा  हितकारक ठरतोच. तेव्हा यावर पूर्णतः विचार करा. त्यानुसार आचार करा. अगदी निडरपणे- परखडपणे. तर मग शुरू हो जाये, Mission social  सुधार. आजचे विजयादशमीचे सिमोलंघन.  विजयी भव

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू