१० लाखाची बॅग घेऊन चोर टोळी पसार.
२६.१० .२०२३ . १० लाखाची बॅग घेऊन चोर टोळी पसार.
प्रिय हुशार व चलाख वाचक हो, आज मी तुम्हाला एक कोडे घालणार आहे. खरे तर मीच गोंधळात पडलेय. हे कसे शक्य आहे. जरा डोके चालवा व आज, मलाच योग्य सल्ला द्या. आधी एक बातमी सांगते. सध्या, अशा अनेक घटना घडल्यात, म्हणे. त्यामुळे, मुंबईत, टकटक टोळ्या सक्रिय झाल्यात असे ऐकतेय. मी घरातच असते. पण जे अाजकाल, कारने आपल्या सोबत मोठी रक्कम किंवा सोन्याचे दागिने घेऊन जातात, ते ही ह्या अशा बातम्या ऐकत वा वाचत असतील ना? तेव्हा मला कळत नाही, ही मंडळी, अशी , " जोखीमवाली बॅग", मागच्या सीटवर, हाती लागेल, अशा प्रकारे ठेवतातच का? ती रक्कम / दागिने, एखाद्या गळ्यातील बॅगेत ठेवून, स्वतःच्या खांद्यावर, का ठेवत नाहीत. अगदी शबनम पिशवी असली, तरी सुरक्षित राहील. असो. आता बातमी वाचा:-
एका हॉटेल व्यावसायिकाची बँकेत जमा करायची,
रू.१० लाखाची रक्कम , चालकासहीत एकजण ( दोघे)
बँकेत निघाले. रक्कम ठेवलेली बॅग, मागील सीटवर ठेवली होती.🙄.वाटेत एका मॅकनिकला बोलावले व गॅरेज मध्ये जाण्यास निघाले. आता तो मागेच बसला असेल ना? माझ्या माहितीत पुढे तिघे बसू शकत नाहीत.😀. . वाटेत एका ठिकाणी थांबले असता, एक तरूण, चालकाजवळ आला व त्याने कारच्या काचेवर टकटक केली. चालकाने काच उघडली, तर खाली पैसे पडलेत, सांगून, तो निघून गेला. चालक पैसे गोळा करण्यासाठी खाली उतरला. तेव्हा दुसर्या तरूणाने, मॅकेनिकास बोलण्यात गुंतवले. अन् अन्य कोणीतरी, " ती" बॅग घेऊन पसार झाला. आता एक विचार करा बरे! मागची काच उघडी होती का? की चालक खाली उतरून पैसे गोळा करत असताना, त्याच्या अंगावरून, वाकून त्याच काचेत हात घालून, बॅग बाहेर काढली गेली? पैसे गोळा करायला लागले, म्हणजे, नाणी नोटा पसरल्या होत्या नं? त्या चालकाच्या असणे, शक्य नव्हते, तर हा क्षुल्लक पैशाचा मोह का? Its seems, some thing fishy. मला तरी प्रश्न पडलाय. माझ्या माहिती प्रमाणे, जर मागच्या काचा बंद असतील , तर पुढची काच उघडताना, मागच्या बंदच राहतात. मग हे कोडे कोणी उलघडेल का? वाचकहो, आज मी तुमच्या कडून ज्ञानाची अपेक्षा करतेय. तर हा प्रकार जास्तीत जास्त share करा. जर असल्या गुन्ह्याला अटकाव करता आला, तर एकत्रित होऊन प्रयत्न करू या.
Comments
Post a Comment