चोरावर मोर. आपले मानसिक व सामाजिक स्वास्थ.
२७.१० .२०२३. आपले मानसिक व सामाजिक स्वास्थ. चोरावर मोर आपण ही होऊ शकतो
माझ्या प्रियतम सजग वाचक हो, कालच्या घटनेचा विचार केलात का? जरा कल्पना करा, आपण त्या जागी आहोत, तो प्रसंग आमने सामने बघत आहोत. समजा समोर दुकानात आहात. एक कार येऊन उभी राहते, तिच्यातून कोणी उतरायच्या आधी, समोर पैसे विखरून पडलेय. तर ते त्या चालकाचे असूच शकतील का? म्हणजे त्या क्षणाला त्या कोणा तरूणाने, एका हाताने पैसे खाली सोडले असतील व दुसर्या हाताने, " टकटक" केले असेल. नेमकी एखाद्या गाडीची चालकाची सिट कोठे येईल, आधी कळणे, शक्य नाही. म्हणजे ती कार थांबल्यावरच, हे केलेय. मग तीच कार का? त्यात मागच्या सीटवर जोखीमभरी बॅग आहे. हे , " रेकी" करूनच target ठरवले असेल नं? घरातच एक व्यक्तीने वाकून ओणवे व्हावे, दुसर्याने त्याच्यावरून टेबलावरील वस्तू उचलावी. 😆😬. मग ते टोळीचे लोक इतके चालाख व quick active असावेत. पण आजवर कोणी तरी अशा प्रसंगी," हँ, माझे पैसे नाहीत, म्हणालेच असतील. अशांनी कृपया पुढे यावे व आपला प्रामाणिकपणा जाहीर करावा! कि सरसकट ह्यांची तमाम, सावजे, त्या पडलेल्या- स्वतःच्या नसलेल्या पैशाच्या मोहात पडतात. म्हणजे त्या टोळीच्या मोडस् पध्दतीत, त्यांचा लोकांच्या मानसशास्त्राच्या perfect अभ्यासाचा हा प्रताप आहे कि, फुकटच्या पैशाच्या मोहातून कोणीच कधीही सुटू शकत नाही. आपले पैसे तेथे पडण्याची शक्यता नसतानाही, लगेच उचलायला वाकणारच. मग चलाख व चतुर कोण बरे?
मग माझ्या लेखाच्या वाचक मंडळीनो, आपण का बरे चलाख व सावध होऊ नये. जेव्हा आपल्या बरोबर एखादी जोखीम असेल, तर या असल्या वाचलेल्या व ऐकलेल्या घटना आठवून सावध व सजग राहणार ना? आता मी माझ्या बाबतीत घडलेला, प्रसंग सांगतेय. मी पूर्वी लिहिला होता. पण परत परत घडणारे गुन्हे पाहता, हे निदान माझ्या वाचकांच्या मनावर hammer करणे, गरजेचे वाटले. तर ऐका. मी मालाडहून भाईंदरला राहिला गेले, पण मालाडला मी एक संस्था चालवत असल्याने रोज माझी येजा असे. माझ्या सोन्याच्या हाराची (२तोळे) कडी तुटली. म्हणून ओळखीच्या मालाडच्या सोनाराकडे घेऊन गेले. अर्थात् माझ्या भयापोटी, मी तो हार, मैसूर सोपच्या बॉक्समध्ये कोंबून नेला होता. तो, सोनाराकडे देऊन पुढे गेले. परताना तो घेतला. सोनाराने तो हार त्यांच्या लांबट बॉक्समध्ये घालून दिला. कोणीतरी watch ठेवत असणार. मी तो तिथेच अात जाऊन पुन्हा माझ्या त्या पॅकेटमध्ये कोंबला. सोनाराचा रिकामा डबा ही नीट ठेवला. स्टेशनवर येऊन गाडी पकडली. तिही ladies first हं. गर्दी होतीच. गंमत म्हणजे भाईंदरला उतरताना, काय झाले माहीतेय, अलगद तो सोनाराचा बॉक्स, पर्समधून गायब. आजूबाजूला socalled high class महिलाच हं. सांगायचे तात्पर्य ती मंडळी इतकी चतुर व हातोहात active असतात. पण माझ्या सावधगिरीमुळे, मी त्या चोरणीवर मोरणी ठरले. माझी जोखीम वाचली. तर मंडळी जरा, आपणही असे घडू शकेल, या विचाराने, समयसुचकता दाखवू शकतो. तर ही अशी सावधगिरी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवा. For that share this blog to your dearrst and nearest. उद्या अशाच काही idea च्या कल्पना सांगेन.
Comments
Post a Comment