नाव:-ठगाशी असावे ठग. कोण फसवील मग.

 ठगाशी असावे ठग. कोण फसवील मग.

        My dear followers,  we should understand the systems and technical modus operandies of culprits and be alert to save our properties.  हां, तर मी काल मी लिहिल्याप्रमाणे, काही  सावधगिरीच्या कल्पना सांगणार आहे. 

        १. जेव्हा तुम्ही बँकेत मोठ्ठी रक्कम काढायला किंवा लॉकरमधून दागिने काढायला जाल, तेव्हा बरोबर कोणालातरी ठेवा. पुरूषांनी कधीही ब्रिफकेस वापरू नये. वा महिलांनी पर्स घेऊ नये. तर गळ्यात खांद्यावरून दप्तर सारखी साधी बॅग वा शबनम न्यावी.ती साईडला न ठेवता समोर ठेवावी व त्यावर हात ठेवावा. 

        २. सोनाराकडे खरेदी केल्यावर लगेच बाहेर न पडता, आत येण्याची परवानगी मागून, ते दागिने, एखाद्या टिफिन बॉक्स मध्ये ठेवावे. दसरा दिवाळीच शुभ मुहुर्त न मानता एरवीच्या दिवशी खरेदी करावी. अहो, ही सुध्दा एक अंधश्रध्दाच आहे.  

        ३. शक्यतो आजच्या सोयीचा फायदा घेऊन on line payment करावे. म्हणजे जाताना risk राहणार नाही. 

        ४. आता दागिने घालून लग्नकार्याला जाताना व येताना उबेर वा ओला बुक करून जावे. त्यामुळे, त्यांचा आपल्याकडे record राहतो. हॉल कितीही जवळ असेल तरी. मी कित्येकदा  महिलांना  भरजरी साड्या व दागिने - साधारणतः ‍१२ तोळे- बघा   मंगळसुत्र २तोळे, हार २- ५० तोळे. पाटल्या ४तोळे व बांगड्या  २ वा ४ घालून ट्रेनमध्ये चढताना पाहील्या आहेत. सर्व साधारण दोघी तिघी गप्पात गर्क. आजूबाजूला लक्षच नाही. किंवा बस स्टॉपवर बसची वाट बघत ताटकळताना पाहिल्या आहेत. एवढी जोखीम बरोबर असताना,  प्रवासात कंजुषी कशाला? शानमध्ये कॅब बुक करून जावे. हे योग्य व सुरक्षित नं? परतीला ही हॉलमधून कॅब बुक करूनच बाहेर पडावे.

        ५. स्वतःची कार ही कधीकधी, parking problem मुळे डोके दुःखी ठरते. तेव्हा safe parking lot आहे नं, 

 ह्याची खात्री करावी.

         आता कालची माझी सुरक्षित व्यवस्था वाचलीत ना? खरे सांगू, ही idea मूळची माझी नव्हे.

          मी मध्यंतरी कनाशीला ( कळवण) वर्षभर,एका आदिवासी मुलींच्या संस्थेत , सेवावर्ती म्हणून होते. आमच्या आश्रमाला  कँपाऊंड घातले होते. पण पैसा अभावी, काम अर्धवटच झाले होते. मी विचार केला, donation मिळाले, तर बघावे. एक कार्यकर्ता म्हणाले, मालेगावचे एक जैन शेट आहेत. त्यांना विचारू शकतो. फोन करून जाण्याचे ठरवले. दोन कार्यकर्ते व मी रिक्क्षाने गेलो. त्यांना problem सांगितला. ते लगेच एकरक्कमी द्यावयास तयार झाले.  गरज एक लाखाची होती.  त्यांनी विचारले, टिफिन आणलाय का? मी म्हटले,  "नाही इथेच खाऊ नाहीतर आश्रमात-- ", ते हसले. समोरील खानावळीत खाऊन घ्या. अन् कार्यकर्त्याला बोलले, "येताना बिस्किटचा वा चॉकलेटचा मोठा बॉक्स आणा. छोटी पॅकेट नको हां, " तो हसला. आम्ही येताना त्याप्रमाणे केले. मला त्यांचे गमक कळले नाही. परत आल्यावर, त्यांनी तो बॉक्स रिकामा केला. डॉवरमधून एक गठ्ठी काढली. रू.१०००चे १००चे बंडल. तेवंहा हजारच्या नोटा चलनात होत्या. अन् त्या बॉक्समध्ये ठेऊन माझ्या हातात दिले. मी रिसिट केली. तर त्यांनी ते रिसिटबुक ही गुंडाळी करून रद्दी पेपरमध्ये ठेवून मला दिले. अन् माझी ट्यूब पेटली.It was for safty purpose. अफलातून कल्पना.

           असे जरा डोके चालवले, तर तुम्ही ही चोरावर मोर होऊ शकाल. तर मग ह्या डोकेबाज कल्पना सर्वांना सांगा बरे! कसे तर share the blog to your friends and relatives for their benefit.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू