कोणत्याही गोष्टीला अतिरेक केव्हाही वाईटच व खतरनाकही.
4.10.2023. कोठच्याही गोष्टीचा अतिरेक, केव्हा ही वाईट व खतरनाकच.
My dear and now near, rather nearest viewers, welcome,सुस्वागतम्. हो आज अचानक इंग्लिश का बरे, प्रश्न पडला असेल न? बस असेच. खरे तर कोठल्याही गोष्टीचा अतिरेक नसावा. ना अति खावे ना अति लंघन- diet करावा. तसेच भाषेचा अति स्वाभिमान नसावा किंवा मराठी वाचता येत नाही हो. अशी फुशारकी करावी. त्याने काही कोणी, खूप मोठ्ठे sophisticated, ठरत नाही. हां, हे खरे आहे कि, आता मात्र मी विषयांतर केलेय. झाले असे कि या ब्लॉगच्या निमित्ताने, कित्येक मराठी मुलेमुली, मराठी वाचता येत नाही, हो असे म्हणताना दिसतात. पण इतर भाषिक मात्र कटाक्षाने,आपली मातृभाषा वाचायला, मुलांना भाग पाडतात. अमेरिका ऑस्टेलियात हा माझा ब्लॉग वाचला जातोय. पण~~ असो. आपण, आपल्या मूळ विषयाकडे वळू या. अति तेथे माती. ही म्हण इथेही लागू पडतेय. बघा कशी ती.
कालच मी morning walk बद्दल लिहिले. खरेच सकाळच्या फेरीने माणूस एकदम तंदुरूस्त होत असेल का?
न जाणार्या / जाणारे सगळ्या आजार पणात डूबुन जात आहेत का? असे नेमके विभाजन होतेय का? नाही आजाराचे शिकार झालेले दोन्ही गटात आहेत.
मध्यंतरी एक गादी मिळत असे. जवळजवळ ८५ हजाराला with discount .म्हणे सर्व आजार दूर राहातात. कित्येकांनी ती घेतली.पण ती वापरणार्यात किती निरोगीच राहिले? टक्केवारी. जसे मुलगा मुलगी होण्याचे चान्स ५०:५० अगदी तसे.
आता आणखीन एक अंधश्रध्दा. सडपातळ माणसे एकदम निरोगीच असतात. पण जाडी माणसे सगळ्या आजारपणाचे माहेरघर. मग काय, कोणी जाडे दिसले की, सुरू लेक्चरबाजी. "अगबाई, वजन कमी करा हं. आहार एकदम minimum असावा बरे. तूप बटर बंद तळण . जो तो येताजाता सल्ला देतो. मग जोडीदार काळजीत अन् सुरू होते डाएटिंगच्या नावाने आबाळ. ह्या प्रकारे अचानक आहारात कमी केल्यामुळे नाही म्हटले तरी अशक्तपणा येतोच. पण ज्यांना माहित असते की सदर व्यक्ती " डाएट" वर आहे, ते लगेच शेरा मारतात. " खरेच थोडा/डी बारीक वाटताय हं. लगेच डाएट जाते डोक्यात व आहार अजून मित होतो. आजकाल डाएट म्हणजे ब्रेड बिस्कीट बंद. लाह्या खा. अहो. कॉर्न फ्लेक्स हो. जेवणात भाकरी व उकडलेली पाले भाजी. परवा किटकनाशकांबद्दल चर्चा केली ना? याचा काय संबंध अहो. अगदी निकटचा आहे. तेलाच्या फोडणीत हे जर्म्स - रासायनिक परिणाम जळून जातात. तेच सध्या ह्या कु पध्दतीच्या कल्पनेमुळे आपण दूर करतो. आणि आहारातील स्निघांश I mean तेल तूप कमी झाल्याने हाडातील द्रव आटतो व हाडे वाजू लागतात. सांधेदुखी गुडघ्याची शस्त्र क्रिया वगैरे आताच का होतात विचार करा. आज इतकेच. लेखाचा मिताहार😀.
आणि हो बारीक असलेली कित्येक जण heart attack चे शिकार झालेले दिसतात नं. जरा शोध घ्या बरे. जाडे असणे म्हणजे आजारी होण्याचे चान्सेस जास्त असे आढळून येतेय का? सुटसुटीत राहणे, योग्यच. पण कसर slow but study.
पटतेय ना? मग थांबून काय विचार करताय. act immediate and share this blog to your own nearest people. and become them alert.
Comments
Post a Comment