स्वतःची फसवणूक, आपणचकरत असतो. कशी ते बघा.

 ६.१० .२०२३  स्वतःची फसवणूक आपणच करत असतो. कशी ते बघा.

       प्रिय सुज्ञ वाचक हो, काल आपण एक गोष्ट पाहिली. बर्‍याच वेळ आपणच आपली फसवणूक करीत असतो. आपल्याला वाटते, आपण अगदी साधे, नाकासमोर चालणारे, बाकीचे आपल्याला फसवण्यास टपलेत.   आपली कमाई, जमाईत रूपांतरित न करता आपणच, सढळ हाताने उधळतो. sorry हा शब्द खटकला नं, पण  काल वाचलेत नं?  आपला जन्म दिन साजरा करण्यासाठी, आपण पार्टी करतो. मग आलेले पाहुणे, रिकाम्या हाताने कसे जावयाचे, म्हणून gift घेऊन येतात. किंवा बुके( फुलांचा गुच्छ आणतात. म्हणजे आपण " बुफे" वर खर्च करतो. व आमंत्रित " बुके" वर खर्च करतात. दोन्ही पार्टींच्या खिशाला  unnecessary  छाट पडते.  का तर आपण कसे sophisticate आहोत, दाखवण्यासाठी. अन् एकाने बोलावले, म्हणून इतर ही झक्कत, पार्टी ठेवतात. ते ही वाढदिवसासाठी म्हणजे, वाढत्या वयात ठिक आहे हो. पण उतरत्या वयात काय, आपण आता bonus life जगत आहोत, त्याचे प्रदर्शन कशाला? कदाचित या वयात मोठी आजारपण येऊ शकतात, त्याची बेगमी करणे, आवश्यक नाही का? तसेच माझ्या तरूण मित्र मैत्रिणीनो, आपले saving बळकट करून ब्लॉक व घरातील necessary  वस्तू- गॅस फ्रिज सोफा कम बेड इस्त्रीहि, अन् washing machine घ्याल , तर सुखी आनंदी जीवनाची ती नांदी ठरेल. या सर्व वस्तुच्या सहाय्याने, सहजीवन किती सुलभ होईल. पण मी वर लिहिल्याप्रमाणे, स्वतःची फसवणूक करतो. अन् समांरभाच्या एकाच दिवसावर अफाट खर्च करतो. आता सकल व तमाम वाचक हो, एक वही पेन घ्या. अन् हिशोब मांडा बरे.  हा  लग्न - वाढदिवसावर होणारा खर्च अन् तुलना करा बरे!   फक्त लोक काय म्हणतील, ह्याच कल्पनेतून  होणारा खर्च आणि आपल्या गरजेचा खर्च ह्यात काय महत्वाचे, हे तुम्ही ठरवा.  जेष्ट व श्रेष्ट मंडळी म्हणतील, आमचा मेडिकलचा विमा आहे हो, फिक्र not. पण जरा  हिशोब करा. त्यासाठी, आजवर किती premium केव्हापासून व किती भरलाय? त्यावेळची भरलेल्या रू १००० /- आज index  मध्ये value किती घसरलेय. अन् विमाधारकांच्या बाबतीत डॉक्टरांचे फावते? अन् हो. ती treatment आपल्याला फुकट मिळत नसते, तर आपण advance मध्ये already  पैसे भरले असतात. अन् त्या पैशा वर interest मिळत नाही.😬. हां, medical  साठी, जे  भरतो, त्यावर TDS चा benefit मिळतो. तसेच insurence premium मुळे Income tax मध्ये सूट मिळते. पण या सर्वांची index च्या आधारे तुलना करा बरे. तसेच पुन्हा तरूण मंडळींना सल्ला- जर saving असेल तर घर जीवनावश्यक बाबी साठी heavy interest वर लोन न घेता. planning करून सुख- benifit मिळवू शकाल.

    करा हिशोब.  अन् of course ,naturelly for spreading this atractive and benificial thought to your reletives and friends share these blogs & help them in  their financial position.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू