पुनश्चः , " आ बैक मुझे मार means danger is created by us- not come by outside😉😁😂.

 3.10.2023.  पुनश्च, " आ बैल मुझे मार". means danger is created by us - not come by outside.

       माझ्या प्रिय व सतर्क वाचक हो, 

            आज मी तुमच्या सतर्कतेची परिक्षा बघणार आहे. आज मी नवीन न लिहिते  मार्च २०२० रोजी लिहिलेला ब्लॉग परत टाकत आहे. काहीजणांनी तो वाचला असेल.पण हा विषय सदैव लागू पडतोय. पुरातन काळापासून. इतर जगापेक्षा, आपल्या भारत देशात  कनकप्रेमाचा अतिरेक होतोय. पण त्या वेडापायी, आपण आपल्याच सुरक्षिततेला,  चूड लावतो.  पुढील पिढीतील, तरूण वाचक हो, म्हणजेच स्वतःच, स्वतः ला धोक्यात टाकतो. तर वाचा हा तीन- साडे तीन वर्षापूर्वी मी लिहिलेला लेख.

सकाळची फेरी. मी हा विषय थोडक्यात, एक महिन्यापूर्वी हाताळला होता. आता जरा स्पष्ट करते. मुळात हा प्रकार सुरू झाला, साधारणपणे  १५ ते २० वर्षात. कसा व नेमका कधी राम जाणे. माफ कर देवा! तुला तरी हे कसे माहित  असणार. पण हे नक्की बहुदा वयस्क पुरूषांनी  सुरूवात केली असावी. घरी बसण्यापेक्षा  ~~. मग ओझोन सक्काळी मिळतो, म्हणून बायका ही निघाल्या. हम भी कुछ कम नाही, म्हणत. No problem. पण घरात सकाळच्या घाईच्या वेळी मदत मिळाली. नातवांना बघितले तर मुलांना सुनांना जरा  solace मिळेल ना! असो. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

    पण ती म्हण आहे ना,  " आ बैल मुझे मार!!!

      तसला प्रकार होतोय. सकाळी बाहेर पडताना तयार होताना जरा दागिने घरी काढून ठेवले तर कोणी गरीब म्हणणार आहे का? समजले गरीब तर काय फरक पडतो. 

      मी , मुद्दाम कधी  कधी जाऊन , गप्पा मारल्या, सहज म्हणून विचारले, " अरे बापरे! एवढे गळ्यात हातात घालून तुम्हाला झोप कशी येते  बाई?" तर थोड्या फार फरकाने उत्तर मिळे,

      " छे हो, रात्री कोण घालते, हे सगळे?" 

       मग येवढ्या सक्काळी हे सर्व घालून निघणे,  म्हणजे आ बैल मुझे मारच ना!

      ते ही कसे तर सामसूम रस्त्याने दोन्ही हात  left right करत. ते का ते परत कोण जाणे !  मागून पुढून ठळक पणे दिसणारे व २.३ तोळ्याचे मंगळसुत्र व हातात प्रत्येकी २.३ तोळ्याच्या बांगड्या.नजर नाकासमोर , आजूबाजूला  समोरून येणार्‍या जाण्यार्‍यांवर जरा लक्ष देणे, छे!  मग काय दुसर्‍या तिसर्‍या फेरीला चोरांना फावते. चेन

चेन खेचायला १५.२० सेंकद पुरतात. आवाज करीपर्यंत बाईक पसार. मग पोलिसांच्या नावाने ओरडा करायचा, या सरकारचे नावाने बोंब ठोकायची. बायका सेफ नाहीत वगैरे. 

      The simple precaution is not to wear gold, while going for morning walk.

      मी त्याच topic ला धरून आहे. चुकीच्या प्रथा. जर एकही महिला सकाळच्या पारी दागिने घालून बाहेर पडली नाही, तर चोर काय डोक्यावर पडलेत, जिथे काही मिळण्याची शक्यता नाही, तिथे दबा धरून बसायला.

        हां. लग्न कार्याला दागिने  घालावे लागतात. नाहीतर नातेवाईक समजतील, इश्श! ह्यांच्याकडे सोने नाही की काय? केवढा मोठा अनर्थ. असो. जिचा तिचा प्रश्न.

         पण येवड्या महागाच्या दागिन्याची काळजी कशी घ्यावी. ही विचार करण्याची बाब आहे ना? आज सोन्याचा भाव १० ग्रॅम म्हणजे तोळ्याचा ३५००० ते ४०००० अाहे करणावळी सकट व लग्नात तर काय कमीतकमी चार बांगड्या, असल्यास पाटल्याही मंगळसुत्र निदान २ तोळ्याचे तरी. बाकी चिल्लर . किती होतात. ते बघा. हे घालून जेव्हा सहकुंटुंब बसने किंवा ट्रेन ने प्रवास करतात, तेव्हा त्यांची किव कराविशी वाटते. अशा वेळेस या सोन्याची काळजी म्हणून घरूनच  "ola/ uber बुक करून जरा पैसे खर्च करून जायला काय हरकत आहे, अं. येताना बहुदा उशीर झाला म्हणून काही टॅक्सी शोधतात. पण जर एकमेकानी एकदुसर्‍यासाठी बुक केली, तर काय फायदा होतो, माहित आहे. आपण जात असलेल्या वाहनांची माहिती दुसर्‍याकडे अाहे, हे कळल्याने, चालकाला ही धाक बसतो.  हे दुसर्‍यासाठी करणे, आपल्याही  उपयुक्तच.

         पण लक्षात कोण घेतो!

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू