संविधानातील कलमांमुळे, होणारा अन्याय rather १२वीतील हुशार मुलांवर होणारा जुलुम
७.१० .२०२३ . संविधानातील कलमांमुळे, होणारा अन्याय हो, १२वीच्या हुशार मुलांवर होणारा जुलुम.
प्रिय वाचक मंडळी, आठवतोय आपला १५ सप्टेंबरचा ब्लॉग - मी लिहिले होते, या आरक्षणामुळे, विद्यार्थी मुलांच्यात फाळणी होतेय. आधी जिवश्च कंठश्च दोस्ती असलेले friends यामुळे एकमेकांपासून दुरावतात. कधी हा विचार कोणी केलाय का? कटू सत्य आहे हे. बघा कसे ते.
मी एक सत्य घटना सांगते. साधारणतः १९९२ वा १९९३ ची गोष्ट त्या काळातच १०वी व १२वीत मेरीट लिस्ट निघत असे. आमच्या बिल्डिंगमध्ये रहाणार्या डॉक्टरांची मुलगी , त्याकाळात १२वीत ९४.३ % मिळवून मेरिटमध्ये आली होती. पण झाले असे,
ओपन कॅटगरीत ९५% ला अॅडमिशन थांबली. पण रिझर्व मधील एका मुलाला ६८% लाच प्रवेश मिळाली. वर त्याच्या वडिलांनी, आमच्या डॉक्टरांना डिवचले, " हे काय तुमच्या मुलीला प्रवेश नाय मिळाला? अरारा!" असो अशा वेळेस या तर्हेने admission मिळालेल्या दोस्ताचाही राग केला जाऊ शकतो. व १५ तारखेच्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे, त्यांना त्रास दिला जाऊ शकतो. कारण या कॉलेजमध्ये असलेल्या मुलांना हे जाणवत असते कि, कोणा एका मित्राला ०.६% म्हणजे फक्त ६* ६=३६ मार्कां साठी प्रवेश न मिळाल्याने. करिअरला मुकावे लागलेय पण ~~. पण ही बहाद्दर! इतर कोठेही बी एससी. वगैरे न जाता घरी वडिलांच्याकडे मेडिकलचा अभ्यास सुरू केला. माझ्या वडिलांनी, त्यांना वयाच्या अधिकाराने, उपदेश दिला~ ती शांतपणे म्हणाली,आजोबा बघा. लवकरच मला चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळेल. तेव्हा कॉलेजेस बरोबर जूनमध्ये सुरू होत. अन् काय आश्चर्य , १५ ऑगस्टला ती सांगत आली. तिला मुंबईतच नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. एवढेच नव्हे तर पूर्या महाराष्ट्रात एकूण ११ जागा रिकाम्या झाल्यात. हा अभ्यासक्रम न झेपल्याने. बोला. आता या बाकी १० जागा फुकट रिकाम्या राहिल्या नं? आता मूळ विषयाकडे वळू या. हा इंग्लीश मिडियम मधील अभ्यासक्रम न झेपल्याने कितीजण नैराश्याच्या गर्तेत गेले असतील? अन् प्रत्यक्षात, आत्महत्येकडे वळले असतील? तसेच आठवीपासून, अभ्यासासाठी, जिवतोड मेहनत करून ही जर आपल्या संविधानातील कायद्यामुळे अॅडमिशन नाकारली गेलेल्या, त्या कोवळ्या १६.१७ वर्षाच्या मुलांची मनःस्थिती काय होत असेल. वरील डॉक्टरांच्या मुलीसारखी अचाट हिंमत व आशावाद असणारी मुलगी विरळाच. इतरांनी काय करावे? वाचकहो, आहे कोणाकडे उत्तर? वाचलेत, माझे हे लिखाण. आता पुन्हा तो १५.९ .२०२३ चा लेख वाचा.विचार करा. हा विचार इतका सर्व दूर पसरवा कि, राजकारण करणार्यांना यावर विचार व आचार करावाच लागेल. मग त्यासाठी काय कराल बरे? yes, you know, what to do.👍👍👍.
Comments
Post a Comment