८ महिन्यात सायबर विभागाकडे १९५२ फसवणूकीच्या तक्रारी.
१.११ .२०२३ ८ महिन्यात सायबर विभागाकडे १९५२ फसवणूकीच्या तक्रारी.
माझ्या मर्मज्ञ वाचक हो, मी येथे आपल्या सर्वांच्या मर्मावर बोट ठेवत आहे. मला सांगा पाहू, सर्वात मोठे दु़ःख कोठचे बरे? जेव्हा आपण कोणाकडून तरी फसवले जातो. तेव्हा, आपल्या मर्मावर आघात होतो. मग ती फसवणूक मोठ्ठी असो, नाहीतर छोटी, पटले नं? तेव्हा सावध मनुजा सावध रे, करील कोणीतरी पारध रे! मग पारध ठरण्यापेक्षा सावध रहाणे, योग्यच नाही का? काल मी असल्या २.३ घटना सांगणार होते. त्या आधी हे जाणून घ्या. अहो, या फक्त ८ महिन्यात सायबर विभागाकडे, १९५२ फसवणूकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. ही बातमी जरा जुनी आहे. २५ ऑगस्टच्या मुंबई चौफेरमधील आहे. या नंतर दोन महिन्यात यात जबरदस्त वाढ झाली आहे. काल मी लिहिलेल्या २७ ऑक्टोंबरच्या महा. टाईम्सच्या बातमीनुसार जनता अजून फसतेच आहे. कारण आजूबाजूच्या घटना व बातम्यांशी अनभिन्न असल्यामुळे. टिव्हीवर ही सतत चालणार्या मालिका / क्रिकेट बघताना
बातम्या कोण बघतेय. उगीच वेळ फुकट,असे म्हणणारे मग असल्या गुन्हेगारांचे target बनतात. हा TRP प्रकारातूनच जास्तीतजास्त कोण टिव्हीचा वापर क्रिकेट/ मालिका साठी करत आहेत, अशी माहिती मिळू शकत असेल का? देव जाणे! माफ कर, देवा तु तरी कसे जाणणार? असो. तर मूळ विषय. दोन महिन्यापूर्वीच्या मुंबई चौफेरच्या बातमीत पोलिस आयुक्त पुढीलप्रमाणे सावध करीत होते.
१. अनोळखी नंबरावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका.
२. कोणाला ही आपला बँकेच्या a/c चा वा कार्डाचा, पिन नंबर, OTP, pasward तपशील देऊ नका.
3. आपली आर्थिक वा वैयक्तिक बातमी देऊ नका.
4. टेलीग्राममध्ये येणार्या( फसव्या) लिंक वर क्लिक करू नका.
5. नामंकित कंपनीमध्ये work from home द्वारे पैसे कमवण्याच्या मोहात पडू नका.
6. वेबसाईटवर आपली गोपनिय वा कोठलीही माहिती भरण्या आधी URL काळजीपूर्वक तपासा. चार लोकांशी चर्चा करा. पण कोण लक्ष देतेय. ह्या बातमीनुसार ६५ तक्रारदारांना पोलिसांनी रू. १कोटी १लाख ८हजार परत मिळवून दिले. किती जिकिरीचे काम केलेय, पोलिसांनी, कल्पना आहे? बाकीचे लटकले ना?
मग आज दोन महिन्यानंतर ही पुन्हा पोलिसांना महा. टाईम्स द्वारा ह्याच सुचना द्याव्या लागत आहेत.
ही बाब आलेल्या तक्रारीबाबत. मोठी रक्कम गेली कि, मग लोक पोलिसांकडे धाव घेतात. पण हजार बाराशेला चुना लागलेले, चुपचाप बसतात. पण असे हजारो असतील नाही - असतातच. तर गुन्हेगारांनी किती कमावले असतील, अंदाज आहे का? तर मग सावध व्हा हो, अन् सावध करा हो. आपल्या whatup गटात महिला वा ज्ञातिच्या गटात forward करा, हे blogs. त्या छोट्या छोट्या घटना उद्या सांगते. आताच, हे टाईप करताना, मला एक फोन आला. ती गंमत उद्या सांगते.
Comments
Post a Comment