आनंदाची व्याख्या व हर्षोल्लासाची तर्हा.
१७.११ .२०२३ .आनंदाची व्याख्या व हर्षोल्लासाची तर्हा.
या, माझ्या रसज्ञ व सुज्ञ वाचक हो, आज आपण ७ दिवसांनी भेटत आहोत. दिवाळी साजरी झाली. त्या आधी नवरात्री व दसरा साजरा केला. नेमिच येतो पावसाळा, या धर्तीवर हे आपले हिंदुधर्मातील मोठे असे दोन्ही सण साजरे केले. पण सर्वांनीच ते गोजिरे केले का, हा प्रश्न उपस्थित होतो. हो, मी आज जरा क्लास घेणार आहे, ते मनसे व दिलसे वाचा. नाराज होऊ नका, तर विचारांच्या वारू (घोडा) वर आरूढ होऊन, आचारची घोड दौड करा. कारण हे सर्व संकट आपल्यासाठी~~ पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. प्रथमत: नवरात्र- गरबा डिजे, तालावर दर रोज ३.४ तास गाजविली. पण मराठीचे स्वाभिमानी, मराठीचा गर्व बोलून दाखवतात, परप्रांतियांना नावे ठेवतात. पण धांगणडिंगा करण्यासाठी, त्यांच्या सणावाराचे अनुकरण करतात. त्यांच्या धंदेवाईकपणाचे अनुकरण न करता. त्याबाबतीत, त्यांना नावे ठेवतात. पूर्वीचा आपला पारंपारिक भोंडला न साजरा करता, खर्चिक असा गरबा खेळतात. ती मंडळी जेवढे कमवतात, त्यातील फक्त १०% सणावारावर खर्च करतात. तेथे मात्र बरोबरी करून आपळि मंडळी, तोच पोशाख चणियाचोळी व महागाचे झब्बे सुरवार घालून( कधीकधी भाड्याने आणून) नाच त** करतात. नवरात्रीचे सप्तरंग कोणीतरी ठरवते व पेपर मिडिया publish करते. त्या तशाच रंगाचे पोशाख आपल्याकडे नसल्यास, खरेदी चालू. मग हे व्यापारी वर्ग,supply as per demand म्हणून तसेच पोशाख शोकेसमध्ये लटकवतात. गिर्हाईक विकत तर घेतात, पण वर हे दुकानदार लुटतात, म्हणून~~~~
असो. आता फटाके. दसर्याला, आपल्या जेष्ट व श्रेष्ट नातलगांना भेटून, आपट्याची पाने ( कनकस्वरूप मानून) देऊन त्यांचा सोन्यासारखा, आशिर्वाद घ्यावयाचा सोडून, त्या रात्री आपण रावण रूपी फटाक्यांचा डोंगर जाळतो. अन् गल्लोगल्ली प्रदुषण करतो. मनातला रावण जाळायचा असतो. रागाचा,सुडाचा. बघा अाता, रावण हा दशग्रंथी होता. शिवभक्त होता. विचार करा बरे, त्याने सीतेला का पळवली,असेल? दुष्टबुध्दी असती तर, जबरदस्ती केली असती? पूर्वापार आपण मानतो, भाऊ बहिणीचे रक्षण करतो, तिला त्रास देणार्याला धडा शिकवतो,हेच बंधुप्रेम नं! मग शुपर्णखाचे नाक कान कापल्यावर, भावाने काय करावे, अशी अपेक्षा? हां आजकालचे कित्येक बंधुराज बहिणीचे पाठीराखे होण्यास मागेपुढे बघतात. अर्थात् याला अपवाद असतातच. माझ्या थोर नशिबाने, मला असे भाग्य मिळालेय. तसे आम्ही तिघी बहिणी व दोन आते भाऊ सख्या सारखे वाढलो. पण ही हे नाते निभवणे, हे कौतुकास्पद आहेच ना? पुढे जेव्हा माझ्या जीवनात संकटाचा डोंगर कोसळला, तेव्हा हे माझे भाऊ( श्री.दिलिप रणदिवे व प्रदिप रणदिवे) च नव्हे तर, माझ्या दोन्ही वहिनी, माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. ( सौ. कल्पना दिलिप रणदिवे व सौ. जयश्री प्रदिप रणदिवे) ही फार महान स्टोरी आहे. पुन्हा केव्हा तरी स्वतंत्रपणे सांगीन. कारण हे माझ्या जीवनातील सुखसंगीत सांगण्यास बराच वेळ हवा.
तर आजचा विषय, कि आपण ध्वनि प्रदुषण व हवेचे प्रदुषण करून काय आनंद मिळवतोय. आजारी व्यक्तींचा आजार वाढवतो. जेष्ट मंडळींची झोपमोड करवितो. मुलांच्या अभ्यासात व्यत्यय आणतो. अन् फटाके तयार करणार्या कारखान्यात काम करणार्या, लहानग्या मुलांचे बळी जातात, त्याकडे फक्त, " एक बातमी" म्हणून बघतो.
तुम्ही म्हणाल, आता दिवाळी तर झाली नं? मऽ गऽ. पण अजून आगे आगे- लग्न संमारंभ आहे . निवडणुका आहेत, आणि शिवाय😉🙄 बेल वर सुटुिन बाहेर आलेले, नेते मंडळी. त्यांचे socalled चेले फटाके फोडून बाहेरच्या जगात स्वागत करतात. हा पैसा कोठून आणतात? सोचो,सोचो. तर मग हा विचार share करा. त्याचा प्रसार व प्रचार करा. बरे!
Comments
Post a Comment