आपल्या भोळेपणाने, आपण इतर ही दुनिया सालस आहे, हे गृहित धरतो

  २.११.२०२३ . आपल्या भोळेपणाने,आपण इतर ही दुनिया सालस आहे, हे गृहित धरतो.

     तर, मत्प्रिय वाचक मंडळीनो, मी तुमची शुभचिंतक आहे. म्हणून या भोळेपणातून वर काढण्याचा प्रयास करीत आहे. प्रयास हा एकतर्फी असतो. पण समोरून जर प्रतिसाद व  त्यानुसार आचार केल्यासच त्याचे रूपांतर प्रयत्नात होते.  हा सावधगिरीचा इशारा आता, दोन महिन्यापासून मी देत आहे. पण crime patrol  हे काम कित्येक वर्षापासून करत आहे. पण पालथ्या घड्यावर पाणी. मुळात कित्येकजण, असे मानतात. हे असले  programme पाहाणे, थिल्लरपणाचे आहे. अन् त्याच महिला, कौटुंबिक कलहाच्या मालिका चवीने बघतात.अन् पुरूष किक्रेट मॅच, तासन् तास टिव्ही समोर बसून बघतात. मला सांगा, या क्राईम पट्रोल मधून दाखवतात, वयस्क महिलांनी, अनोळखींना, अचानक दरवाजा उघडू नये. पाणी मागणार्‍यांना अात घेऊ नये, हा काय थिल्लरपणा आहे, बोला? तर आपल्या सध्याच्या सायबर गुन्ह्याबद्दल , त्यांचा एक एपिसोड १८ व १९ ऑक्टोबर २०१३ पासून दाखवत आहेत. त्याचा संदर्भ पुढे देत आहे. 

     the con team crime patrol.epi 305& 306.  18 and 19 oct. 2013.जालसाजी. 

     पोलिसांच्या अथक प्रयत्नाने त्या २४ वर्षाच्या मुलाला पकडले. तोपर्यंत त्याने, मोठमोठ्या उद्योगपतींना फक्त फोनवरून करोडो रूपयांचा चुना लावला.  शेवटी पकडले गेल्यावर, तो म्हणतो कसा, मी एक फोनवरून offer दिली, पण हे सर्व पन्नाशीचे, दुनिया पाहिलेले, बडे उद्योगपती, काही ही चौकशी न करता, मी सांगितलेल्या, बँक a/c मध्ये धडाधड लाखोने पैसे transfer करत होते, ते सवलतीच्या वा वरकमाईच्या मोहानेच ना? मग ते काय दुधाने धुतलेले आहेत ना?  अशा साध्या मार्गाने मी कमावले! दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये। आज ‍ १० वर्षे हे एपिसोड जनता, लाखोंच्या संख्येने बघत आहे. मग जरा, मी सांगते, तशी आपल्या परिवारात- नातलगात- मित्रमैत्रिणीत- सोसायटीत चर्चा का घडवून आणत नाहीत. मग परिचितात, ट्रेनमध्ये मालिकेवरील व किक्रेटवरील फालतू गप्पापेक्षा या अशा विषयावरील चर्चा फायदेशीर नाहीत का? माझ्या परिचित एका महिलेला, त्या एका मालिकेतील शनाया बद्दल चिंता व्यक्त करणारीला, आपली स्वतःची मुलगी, कोणा तरी भणंगाच्या बरोबर फिरतेय, ह्याची गंधवार्ता नव्हती. आता बोला. सावधान करण्याचे काम पोलिस वर्तमान पत्रे व मी करीत आहे. पण आपले अवधान बाळगणे, ज्याचे त्यालाच करावे लागते. परिचितांनी  एकत्र येऊन मार्ग काढायचा असतो. फक्त एकत्र येऊन पार्ट्या करणार्‍यांना इशारा. तर मग You can also follow, my footprints and share my these blogs to maximum persons.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू