२०.११ .२०२३. आनंद व सुख, तसेच मज्जानी लाईफ. यातील फरक
२०.११ .२०२३ . आनंद व सुख , तसेच मज्जानी लाईफ. यातील फरक.
प्रिय सुखाभिलाषी वाचक वर्ग हो, आपण नेहमीच सुख व समाधानी जीवनाबद्दल विचार करतो.अन् मी आपल्याला त्याच सन्मार्गावर नेण्याचा प्रयत्न करत असते. बरोबर नं? तर सर्वांना, "मज्जानी लाईफ हवेहवेसे वाटते. मुन्नाभाई MBBS ह्या सिनेमात, ही कल्पना प्रथम ऐकली. छान वाटली. पण सर्वसामान्य जन ह्यालाच सुखी समाधानी जीवन मानतात. मग खरे सुख त्यांच्यापासून दूरदूर पळते. ह्याची त्यांना जाणिवच नसते. बघा बरे, जर विद्यार्थी वयात मज्जा करत राहीले, अभ्यास नाही केला. तर चांगले मार्क मिळत नाही. तरूण वयात, कॉलेजमध्ये लेक्चर्स "बंक"
( तरूण मित्रमैत्रिणींनो, शब्द बरोबर आहे ना?) करून girl friend- boyfriend करत बसलेल्यांचे शिक्षण अर्धवट राहते. किंवा मार्क कमी मिळाल्याने, नोकरी धंद्यात यश मिळत नाही.
पौढ वयात, तनमनधनाची जमाई न करता, फक्त मज्जाच
केली तर म्हातारपणी भोगावे लागते. गंमत म्हणजे, कित्येकजण "मोठ्ठाला" जीवन विमा उतरवतात किंवा mediclaim मध्ये पैसे भरत रहातात. पण जर आपण भरपूर जगलो, किंवा आजारी पडलोच नाही, तर त्या पैशाचे काय? कित्येकांना अनुभव असेल, आपण हॉस्पिटलमध्ये admit झालो कि, विचारणा होते, mediclaim आहे का?
बर्याच वेळा, त्याप्रमाणे treatment / bill होत असते. म्हणजे " भर" कोणाची? मग हे सुख आहे कि, मनाची - समजूत आहे. साधारणतः मांसाहारी मंडळी, फुशारक्या मारतात, आम्ही हजारो रुपये खर्च करून महागाचे मासे खातो. तिथे no काटकसर. किंवा देवगडाचे हापूस किती महाग झाले तरी तेच खाणार.खोक्याने घेऊन. मग मधुमेहालाही मारो गोळी!
हे सुख समाधान नाही , तर फक्त मज्जा आहे. क्षणिक सुख. अशा रितीने खरा आनंद मिळत नसतो. तर असे कबुतरी जीवन जगण्यापेक्षा , जरा आजूबाजूला पहावे. हाच पैसा कोणा गरजूसाठी, औषध पाण्यावर , खर्च करून पहावे. त्या व्यक्तीच्या, कृतज्ञतेने, भरलेल्या नजरेतून खरे समाधान लाभते हो. फार पूर्वी एक सिनेमा पाहिला होता , " राही" , संजीवकुमार - स्मिता पाटील व शत्रुघ्न सिन्हा. त्यात , डॉ. प्रभात( संजीव कुमार) पेंशन्टला म्हणतो,
"कभी कभी खुशी, इन्सानके के नजदिक ही होती है, लेकिन वह उसे दुनियाभर तलाश करता फिरता है।"
तसेच समर्थरामदास स्वामी स्वामींचे बोल,
"जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुचि शोधुनि पाहे।" ह्याचा अर्थ नेमका विपरीत व negetive लावला जातो कि, जगात सर्वस्वी कोणीच सुखी नाही. पण रामदासस्वामींना असे अजिबात अभिप्रेत नाही. तर ते सांगू इच्छितात कि. हे विचारी व विवेकी मना, तूच खरा शोध लाव कि, कोण अशा प्रकारे सर्वसुखी आहे व त्यांच्या प्रमाणे, आपली जीवनशैली बनव. स्वतःसाठी जगणारा की इतरांसाठी जगणारा? स्वःअर्थासाठी जगणार्याची तृप्ती कधीच होत नाही. अन् हो, मी आधी कबुतरी जीवन असा उल्लेख केलाय, त्याचा अर्थ व खुलासा, उद्या करीन. तर भेटू या, उद्या. अन् या प्रकारे आपले सर्व आप्तस्वकिय सुखी व्हावेत, असे वाटत आहे ना? तर मग share these blogs to them and askthem to follow these - विचारधारा - जमल्यास या शब्दाला perfect english शब्द सुचवा बरे. thoughts या शब्दात नेमका अर्थ अभिप्रेतहो नाही हो.
Comments
Post a Comment