आजच्या संकल्पना. कबुतरी वृत्ती. विचारधारा आणि संतवचने.

 21.11.2023. आजच्या संकल्पना. कबुतरी वृत्ती. विचारधारा आणि संत वचने.

    मत्प्रिय तसेच जिज्ञासू वाचक हो, काल मी एक उल्लेख केला होता. कबुतरी वृत्ती - -  अनेक वाचकांना हे विधान नवीन व positive  वाटले असेल नं? कारण आपल्या देशात ( खरे तर स्वातंत्रोत्तर - राजकारणात पंख पसरून उडणार्‍या कबुतराला, शांतिदूत म्हटले आहे). पण आपल्या श्री कृष्णाने जे २४ गुरू मानलेत, त्यातील काही negative आहेत. म्हणजे त्यांच्या वर्तनशैलीपासून, हे शिकायला हवे की, कसे वागू नये. 

    सर्व संत मंडळी व प्रज्ञावान व विद्वान सांगत आहेत कि, कबुतरे फक्त स्वतःचाच वा  आपल्याच कुटुंबाचा विचार करतात. आता हे सत्य अाहे कि, जेव्हा काही अन्न सापडते, तेव्हा कावळे,  कावकाव करून आपल्या बांधवाना बोलावतात. चिमण्या ही पाणी मिळाले कि, चिवचिव करून आपल्या सोबत्यांस हाक देतात. पण कबुतरखान्यात जरी हे पक्षी एकत्र आढळले तरी, तेथे त्यांचे लक्ष फक्त स्वतः खाण्यात असते. सहसा ते वर सुध्दा बघत नाही. तसेच त्यांचा तो, आवाज, ज्याला, गुटरगूऽऽ म्हणून प्रेमिकांचा -  असा ओळखला जातो. तो खरेच नाजूक, ऐकावासा वाटतो का? नाही नं? उलट चिवचिवाट- किलबिल मन मोहून टाकतो. 

    असेच मी विचारधारा असा उल्लेख केला. नंतर मला त्यासाठी इंग्लिश शब्द सापडला - Ideology  बघा विचारधारा हा शब्द ही नेहमीच चांगल्या व आदर्श  अशा  विचाराबाबत वापर जातो. दहशत वादी विचार धारा असे कधीच म्हणत नाहीत. हा शब्द सदैव positive निमित्तेच वापरला जातो. 

          अाता हे संत वचन पहा, आपल्या थोर नेत्याने हा श्लोक, अर्धाच आपल्या माथी मारला व आपण ही कधीच असा विचार केला नाही कि, श्लोक कधी एकवाक्यी नसतो. मग त्याची पुढील ओळ काय असेल बरे?

          अहिंसा परम धर्म। धर्म हिंसा तथैव च ।

           तर हा असा संपूर्ण श्लोक. 

           अर्थ-  धारयति इति धर्म।  जी योग्य धारणा  आहे. तोच धर्म होय. जी वृत्ती धारण करणे, आपल्या आचरणात आणणे, सर्वांच्या हिताचे असेल, ती म्हणजेच धर्म होय.

           अहिंसा हा धर्म आहे. पण जेव्हा अादर्श व योग्य व हितकारक, अशा धर्म पालन - रक्षण करण्यासाठी,  हिंसा करावी लागली, तर ते धर्मशील वर्तनच ठरते.  

           आज जरा गंभीर विचारधारा, तुमच्या गळी उतरवत आहे ना? पण हे आपल्या सुखसमाधानासाठी आवश्यक आहे. विचार  केल्यावर पटेल, माझ्या सुज्ञ वाचकांना. दिर्घ विचार म्हणजेच चिंतन व मनन होय.  कोठल्याही विचार वा बातमी वा आसपासची घटना, नुसतीच हवेवर सोडू नका हो.  परिपक्व बना.  आपण कोणाला आदर्श मानायचे, ते विचारपूर्वक ठरवा. आणि नेहमीचेच ,आपल्या- आप्तस्वकियांना, मित्रमैत्रिणींना ही सुविचारी बनवा. कसे तर share these blogs to them, discuss these points with them. ok, then see you tomorrow .

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू