अहिंसा परम धर्म। धर्म हिंसा तथैव च ।
२४.११ .२०२३ . अहिंसा परम धर्म। धर्म हिंसा तथैव च।
माझ्या सुज्ञ व विवेकी वाचक वृंद हो, आज मी, हे काय नवीन संबोधन वापरले,असे वाटलेय नं? हेच आपल्यासारख्या, विचाराने एकत्रीत आलेल्यांना, यथार्थ आहे. कारण मी स्वतः, एका विशिष्ट हेतुने, हा ब्लॉग लेखन सुरू केलेय. अन् माझ्या थोर नशिबाने, एक एक मोती( तुम्ही हो) माझ्याशी जुळत आलात व एक विचारधारा निर्माण झालीय. वृंद म्हणजे, एखाद्या विशिष्ट हेतुने एकत्रितपणे कार्य करणारे. बघा वाद्यवृंद- ऑर्केस्टा हो. ते वादन एकादिलाने करतात. कोरस मध्ये गाताना, त्या सर्वांचा सूर ताल एकच असतो. तसेच श्रोतृवृंद- वक्त्याच्या भाषणात मंत्रमुग्ध झाले असतात. सहज कळणारी कल्पना म्हणजे सिनेमा हॉलमधील प्रेक्षक. ते नायकसोबत मनात नाचतात. नायिकेबरोबर रडतात. I am very much lucky and happy with our group. आपण सर्व एका उद्देशाने आपापल्या ठिकाणी विचारात बदल करत आहोत. एका छोट्याशा कार्यात सामिल होणार आहोत. हे काही मंडळी घरबसल्या ही करत आहोत. कारण हा बदल आपल्याला स्वतःच्यात करायचाय. नंतर इतरांना या सुधारगटात फक्त मेसेज द्वारा बदलाला उद्दुक्त करायचेय. बस. हां, तर दोन दिवसापूर्वी मी, एक वृत्ती( कबुतरी वृत्ती) चा उल्लेख केला होता. त्याचे स्पष्टीकरण करते. कबुतरे फक्त स्वतःसाठीच जगतात. म्हणून, श्रीकृष्णाने त्यांना "नकारात्मक गुरू" केले आहे. त्याला लहानपणी खोडकर व चोरी करणारा म्हणतो. पण त्याला तर पुरेसे दुध दुभते नंदराजाकडे मिळत होते. कंसाच्या जुलमी आज्ञेनुसार कंसराजाकडे दुध पाठवून ही. पण इतर गोपालाकडून, कर रूपी दुभते, राजा कंसाकडे पाठविल्यावर, त्यांच्या मुलांना मात्र मिळेनासे झाले. नंतर कंसाला ठार मारल्यावर, तो बिनधास्त, सिंहासनावर बसू शकला असता, पण नाही, कंसाला मुल नसल्यामुळे, त्याने आपल्या मातामहांना(आजोबांना) राज्य प्रदान दिले
पुढे कौरवावर जय मिळवण्यासाठी पांडवाना मदत केली. पण तेथून ही तो निस्वार्थीपणे बाहेर पडला. पण मुख्य म्हणजे, त्यावेळी वरील अहिंसा परम धर्म। पण त्याच बरोबर, " धर्म हिंसा तथैव च।" असाही संदेश दिलाय. म्हणजे धर्माचे - चांगल्या वर्तनाचे जतन व रक्षण करण्यासाठी जरूर हिंसा करावी. म्हणजे लगेच कोणाला मारून टाकायचे नाही. पण, " अरे ला कारे" अशी शाब्दिक हिंसा नक्कीच करावी. हे योग्यच आहे. जर रस्त्यात, एखादे टोळके, एका मुलीला छेडत असतील, तर, मला काय करायचेय, अशी कबुतरी वृत्ती न बाळगता, ," ठगाशी असावे ठग," हा समर्थाचा उपदेश, एकवृंद होऊन अंगी बाणवावा. म्हणजेच फक्त बघे न राहता, तिथे हजर व्यक्तींनी एकदिलाने त्यांना, प्रतिकार करावा. त्यासाठी, त्या मुलीत, आपली मुलगी वा बहिण बघा. बस, मग आपोअाप त्यांच्या bad action ला तुमची good rection टक्कर देईलच. आजचा विचार व समाचार लहान पण महान. त्या आधी आपल्या शेजारीपाजारी मित्रमंडळीत ही संकल्पना discuss करा. जेष्ट व श्रेष्ट मंडळीनो, संध्याकाळी पार्कात गप्पा मारीत बसता ना तेव्हा शिलेदार बना. बघा नक्कीच हे ADVENTURE मस्तपैकी Enjoy कराल. तर मग आरंभ करा, सम विचारी व सम आचारी सोबती/ सोबतीणी जमा करा. त्यासाठी ह्या आपल्या ब्लॉगचा उपयोग करा बरे. means like and share these blogs to spread this ideology.
Comments
Post a Comment