बुरा मत सुनो। बुरा मत देखो। बुरा मत कहो. हे वचन चुकीचे आहे.उलट त्यात बदल करायचा तर~~
२५.११ .२०२३. बुरा मत सुनो। बुरा मत देखो. बुरा मत कहो। हे वचन चुकीचे आहे. उलट त्यात बदल करायचा तर~~~
माझ्या सुज्ञ व प्रज्ञावंत वाचक हो, मी नेहमीच, माझ्या वाचकांना या स्वरूपात बघते. त्याचे स्पष्टीकरण, मी कालच दिले आहे. या गुगलच्या फाफटपसार्यातून, तुम्ही ह्या ब्लॉगला प्राधान्य देत आहात, वाचत आहात, त्यातच माझ्यावरचा विश्वास दिसून येतो. असो. आपण सर्वजण आपल्या जवळीक असलेल्या मित्रमैत्रिणींवर पूर्णतः विश्वास ठेवतो. मनातील दुःख tensions, पुढील स्वप्ने तसेच कधीकधी घरातील तथाकथित त्रास share करतो. त्याच वेळी गृहच्छिद्र त्यांना सांगून टाकतो. नंतर ते काहीच अस्थित्वात रहात नाही. पण त्यांच्या मनात ती गोष्ट शिल्लक रहाते. अन् gossip बनू शकते. म्हणून या बाबत सावध रहाणे, जरूरी आहे. अन् मुळात मित्रमैत्रिणींची पारख योग्य रित्या करणे, गरजेचे आहे. शिवाय मन मोकळे करण्याला मर्यादा असावी. तसेच social media च्या बाबतीत आहे. तेथे ही कित्येक जण, friendship बनवतात. नवल म्हणजे, घरच्या खाजगी बाबी, मुर्खासारख्या share करतात. फोटो इतर friends चे फोन - त्यांची माहिती ही टाईपतात. अरे काय अधिकार आहे, इतरांची माहिती, दुसर्या इतरांना share करायची. हा, एक gossip चा लेखी ( तेवढाच दुःखी प्रकार) आहे. तर तुम्ही असे करत नाहीत ना? हे आत्मसंशोधन करा हं! काल व परवा , मी "वृत्ती" या शब्दाचा वापर केला होता. पुढील वाचन करताना, जरा आठवा, नाहीतर सरळ reference to contact बघा. especially, हा मुद्दा नजिक आलेल्या निवडणुकीच्या संदर्भात विचारात घ्या. ते काय बोलतात, हे कानाने ऐकण्यापेक्षा, आपल्या स्मरणशक्ती वर जोर द्या. आपल्याला, जे काही तुमचे वय असेल, त्याप्रमाणे, काय काय घडले, काय दिसून आलेय, त्याचा विवेकी मनाने विचार( चिंतन) करा. इतिहास वाचा. व त्या अनुसार, आपले व्यक्तीमत्व बनवा. आपोआप, चांगल्या सुखी जीवनाकडे, तुमची वाटचाल होईल. त्या गांधीजींच्या, तीन माकडांप्रमाणे, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, "बुरा" मत कहो। अशी वृत्ती नका हो ठेऊ या. उलट जे काही भलेबुरे ऐकिवात येतेय, ये नीट ऐका. त्यात बदल हवा. जे चुकीचे आहे, त्याचे खंडन करा. तसेच बुरी चीजे और घटना या कडे डोळेझाक करणे, एक अपराध आहे. तेही नीट लक्ष देऊन बघा. चुकीच्या मार्गाने जाण्यार्यांना अडवा. टोका. हेच योग्य वर्तन आहे. आता बुरा मत कहो?? अंहं, उलट बुरी वर्तणूक, इतरांना सांगा व एकत्रितपणाने, त्याचा विरोध करा. अाता उद्या आवरण - विक्षेप- अविद्या - माया म्हणजे काय ते विशद करते. हे सर्व शब्द नविन व गहन भासले, तरी त्यांचा अर्थ व वापर आपल्या सामान्यांच्या जीवनात सदैव होत असतो. आपण या गोष्टींशी अगदी परिचित आहोत. तर उद्या भेटा व इतरांना भेटवा, माझ्याशी ओळख करून द्या. मी आशा करते, आजपेक्षा उद्या मला, अनेक जण दुप्पटीने, चौपट्टीने भेटतील. तर मग त्याकरिता. share me to those who are still unknown to me.
Comments
Post a Comment