आली आली दिपावली. जीवनी येऊ दे सुखाची सावली
६.११.२०२३. आली आली दिपावली. येऊदे जीवनी सुखाची सावली.
माझ्या प्रिय रसिक वाचक हो, आता जरा ," त्या" विषयापासून switch over होऊ या. अन् मस्त दिवाळी साजरी करू या. फराळ - फटाके - . आनंदाला साद घालण्यासाठी, मी आजपासून, आपल्याला, आपल्या संतमंडळींच्या सहवासात घेऊन जात आहे. मी त्यासाठी, " तुकारामगाथा" आपल्या समोर ठेवणार आहे. एक लक्षात घ्या, ही संत मंडळी आपल्या अानंदात भरच घालणार आहेत. तेव्हा हे वाङमय pl. bore मानू नका. त्यातील आपल्या फायद्याच्या बाबी बघा.
त्यातील काही ओव्या आपण वाचू या. अन् आपल्या जीवनात हर्षमोती ओवू या.
संत तुकारामांनी अनेक ग्रंथ अभंग लिहीले. त्या कालात, लिखाणकला अवघड असून ही, वाणसामानाचे दुकान संभाळून ते लिहिते, झाले. संसारात कर्तव्यतत्पर राहून ही , ते कमलपत्राप्रमाणे अलिप्त व विरक्त राहीले. केवढेतरी श्रम करून लिहिलेली, त्यांची "गाथा" पाण्यात बुडविली, तरी ते निराश झाले नाहीत.भक्तीच्या जोरावर, त्यांनी आपले मन प्रसन्न ठेवले.
म्हणूनच संत तुकाराम, आपल्याला अधिकारवाणीना सांगत आहेत कि,
मन करा रे प्रसन्न।
सर्व सिध्दीचे कारण॥
मोक्ष अथवा बंधन।
सुखसमाधान इच्छा तेथ॥
ते उपदेश करतात कि, हे आपले मन आहे ना, ते सदैव प्रसन्न ठेवा. निराशेला, त्यात थारा देऊ नका. उत्तरेला असे ही म्हणतात, " मन चंगा तो कटोरीमें गंगा", कटोरी म्हणजे आपले जीवन. कटोरीत पाणी असते ना? अन् पाण्याला जीवनही संबोधतात. जे काही साध्य करायचे असेल, त्याला प्रसन्न मनच फक्त कारणीभूत ठरू शकते. कोठच्याही कार्याला वा संकटाला प्रसन्नतेने positive approach ठेऊन सामोरा जा. मग ते सफळ होणारच. तरूणांच्या भाषेत I can do it or. all for the best. असा विचार सदैव मनात बाळगा. बस् काम होऽ ऽ जायेगा। इच्छा तेथे मार्ग व जिद्दीने, मन शांत ठेवून , मार्ग अनुसरल्यावर , यश( सिध्दी) प्राप्त होणारच. काय पटतेय नं? संत वाङमय आपल्याच उपयोगाचे आहे नं. तर मग या बरे, या सफरीला.
असे सांगितले जाते कि, कुटाळ गावकर्यांनी, त्यांनी लिहिलेली , " गाथा" नदीत बुडविली. पण तरीही ती पाण्याच्या प्रवाहातून " वर" आली. हा चमत्कार - अंधश्रध्दा म्हणून दुर्लक्ष करू नका. practically असे घडले असेल कि, नदीच्या प्रवाहात वाहून पुढील गावात, तो ग्रंथ किनार्याला लागला असेल. शिवाय त्या काळी लेखक स्वतःच शाई तयार करत असत. बहुदा त्यांनी अशी ,
" शाई" तयार केली असेल कि, ती पाण्यात विरघळणार नाही.
किंवा प्रत्यक्षात, त्यांनी स्वतःच आधी जास्तीच्या प्रती करून ठेवल्या असतील. अगर त्यानंतर चांगले पांठातर असलेल्या तुकोबांनी परत एकदा लेखणी हातात घेऊन, गाथा लिहून काढली असेल. असो. काही झाले तरी ,ते लिखाण- ते ज्ञान अभंग राहीले. सर्वदूर पसरले.
मने प्रतिमा स्थापिली।
मने मना पुजिली॥
मने इच्छा पुरविली।
मने माऊली सकळांची॥
जर मनापासून," मनात" एखादी प्रतिमा - मुर्ती स्थापन केली. त्याची मनपूर्वक पूजा केली, तर मनाच्या ताकदीनेच, इच्छा पूर्ती होते. मूर्तीची पूर्ती म्हणजे काय ते समजून घ्या. मूुळात मुरत ही एकाद्या देवाच्या सुरत नसून. एखादी संकल्पना असावी. एखादी कला वा ज्ञानाची शाखा असावी. ते स्वःच्या रूपाने , जगासमोेर आदर्श ठेवतात कि, संसाराच्या कर्तव्याची पुर्तता करत राहा. पण त्याच बरोबर, मानसी ठरवलेल्या देवत्वाची( ध्येयाची) आराधना करत रहा. ते नियमित लेखन करीत असत. त्यात मग्न झाल्यावर, ते इतरांना अलिप्त वाटत असतील. गावगप्पात भाग न घेणे वगैरे. पण त्यांच्या मते, 'हे' आपले मनच सर्वात मोठी माऊली आहे. तिथेच लक्ष पुरवल्यास काही नव निर्माण होऊ शकते. म्हणून मनाला सदैव कार्यशील ठेवा. re tire
re tire परत परत tire होऊ नका. तर re active होत रहा. मनातून पटले ना, मग मनाला क्रियाशील ठेवा. मग जीवनात आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे. मी तरी, या लिखाणातून, तेच करीत आहे. जपमाळ घेऊन वा एखाद्या वहीत , तेच तेच नाव लिहिण्यापेक्षा, हा असा हर्षाल्लास काही औरच आहे. तर मग या व अशा जल्लोशात सामिल व्हा व इतरेजनांनाही सामील करा. कसे ते सांगायलाच पाहीजे का? जल्लोश मनाचा असावा. ढोलताशा फटाक्यांचा नसावा. तर अजून ही गाथा छान संकल्पना सांगतेय.
Comments
Post a Comment