जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना तुचि शोधूनि पाही.

 ७.११ .२०२३ जगी सर्व सुखी असा कोण आहे, मना तुचि शोधुनि पाही.

    मत्प्रिय सजग वाचकहो,  ही समर्थरामदासाची उक्ति आपण सर्वांनी ऐकली असेलच. पण ह्याचा सर्वसामान्यतः negetiveच घेतला जातो. की कोणीच सर्वस्वी सुखी नाही. पण समर्थांना हे असे अभिप्रेतच नाही. ते मनाला सांगत आहेत कि, एखादा सर्वसुखी का व कसा होतो, हे मनालाच विचारा.  संत तुकाराम ही समकालीनच होते. ते जरा हा विचार जास्त स्पष्ट करत आहेत. बघा बरे.

             मन गुरू आणि शिष्य ।

             करी आपुलेच दास्य॥ 

             प्रसन्न आपआपणास।

             गति अथवा अधोगती॥ 

       आपले मन हाच आपला गुरू आहे. तेच आपले मार्गदर्शक असणार.  आपणच सर्व परिस्थितीत मन शांत ठेवले पाहिजे. थोडक्यात आपण आपल्या षडरिपुवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राग लोभ मत्सर वगैरे हे आपल्या मनाचे- आत्म्याचे दासच राहिले पाहिजेत. न कि आपण, त्यांना वश झाले पाहिजे.  चांगल्या गुणांशी सख्य करावे. हेच सुखाचे गमक आहे.  जर आपल्या जीवनात गति- progress मिळाली किंवा अधोगति - अपयश आले तरी मन प्रसन्न ठेऊन  हसतमुख राहिले पाहिजे.ह्याचा अर्थ सकाळच्या प्रहरी morning walk ला जाऊन विनाकारण हाऽ  हाऽ  करणे, हास्यास्पद आहे. मनात हास्य फुलले पाहिजे. म्हणजेच सुख- दुखाने गर्व वा निराशा टाळली पाहिजे. आजकाल boliwood gossip मध्ये वाचतो. अमका depression मध्ये गेला. गडगंज पैसे कमवून ही म्हातारपणी हलाखीचे जीवन जगतोय.  एकांती मरण वगैरे ह्या लोकांनी जरा स्वःमनाला आपले गुरू मानले, तर नक्कीच अशी वेळ येणार नाही. त्यांनीच कशाला, आपण सामान्य जनांनी ही हा गुरू केला पाहिजे. माणसे जोडली पाहिजेत. चांगले वाचन ही मनाला ताकद देते.

       आपले मन आपणच खंबीर केले पाहिजे. असे एक गीत आहे. सुख के साथी दुःख में न कोई।

        पण हे साफ खोटे आहे. आपण दुसर्‍यांच्या दुःखात किती वेळ मनापासून  साथ दिली आहे, ते मनाला विचारा बरे, याबाबतीत मात्र सत्यवादी व्हावे बरे. हे आपल्या मनातच राहणार, मग चूक कबूल करावयास काय हरकत आहे?

            साधक वाचक पंडीत।

            श्रोते वक्ते ऐका मात॥ 

            नाही नाही अनुदैवत। 

            तुका म्हणे दुसरे॥

      रामदासस्वामी , आत्माराम उल्लेख करतात, तर तुकोबा मन बोलतात. एकूण एक. 

      भोळ्या भाविकांना समर्थ भक्त व्हा सांगतात. तर संत तुकाराम त्या मनालाच अनुदैवत म्हणतात. आपला सुखाचा मार्ग आपल्या मनातच आहे. तो अनुसरावा. सर्व संत हाच उपदेश करतात. पण बहुजन मूर्ख , ते लिखाण नुसते पठण करतात.  पण उमज- समज - घडण होतच नाही.  तेव्हा माझ्या लाडक्या वाचकजन हो. आपणच आपल्याला सुखी व आनंदी करू शकतो. या बाबतीत जो दुसर्‍यावरी विसंबला तो संपला. तर मग ही दिवाळी हर्षवर्धक करण्यासाठी, या संताचे बोल आत्मसात करणार नं? अन् हीच Idea spelling सगळ्यांना देणार नं? कशी तर , like and share to your dearest and nearest.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू