वक्तृत्व. आपले विचार शब्द रूपाने दुसर्‍याला सांगणे- पटविणे, हीच भाषण कला

 8.11.2023 . वक्तृत्व. आपले विचार शब्द रूपाने दुसर्‍या  सांगणे- पटवणे, हीच भाषणकला.

         रसिक वाचक हो,  हां, असे म्हणू नका, ह्याच्याशी आमचा काय संबंध? असतो हो, प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक वयात हर एक ठिकाणी ह्या कलेशी संबंध असतो. अगदी घरातही, आपले विचार पुढील शिक्षणाचा प्लॅन, पालकांना पटवण्यासाठी आपल्याला भाषाज्ञान व बोलण्याची विशिष्ट style अवगत असणे, जरूरी असते. स्टेजवर बोलण्यापेक्षा ही व्यवहारी जगात, प्रत्येक क्षेत्रात, नोकरीत, व्यवसायात, मुख्यतः वकील, डॉक्टर विक्रेता यांना समोरील, व्यक्तींच्या गळी, आपले म्हणणे, उतवणे, गरजेचे असते. घरात ही जर मुले ऐकत नसतील,  अभ्यासात कंटाळा करत असतील, तर  त्यांना तुम्ही कसे समजावता, हे महत्वाचे असते. मधु( गोड शब्द)  वाणी व चेहर्‍यावरील आश्वासक भाव व हातवारे, हे महत्वाचे असते. चांगली भाषा व त्यावरील प्रभुत्व  हे महत्वाचे घटक असतात.

         आता, माझा कालचा लेख आठवा, किंवा जरा मागे जाऊन परत वाचा बरे!  मी शेवटी लिहिलेय, idea spelling.  ती चूक नाही. इंग्लिशमध्ये स्पेलिंग म्हणजे शब्दाचे घटक.  आपण जेव्हा लिहितो, तेव्हा उकार व इकारात र्‍हस्व दिर्घ अनुस्वार हे घटक फार मोठे परिणाम करत असतात. स्पेलिंग चुकले, तर अर्थाचा अनर्थ होतो. चिता/ चिंता, दिन/ दीन,  तेच बोलण्यात toning वरून ही अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणून व्यवहारी जगात, प्रत्येकाला, वक्तव्ये करताना ही जपावे लागतेच. म्हणजेच भाषणकला येणे, गरजेचे आहे. बघा, एक वाक्य सांगते, " मला माहित आहे,"

           साधे वाक्य, पण उच्चाराच्या बदलाबरोबर राग, लोभ, प्रेम, माया, चिड,  त्वेष व तुच्छता दाखवता येते. बघा बरे बोलून! 

           तसेच काल मी, एक वाक्य प्रचार, थोडा बदलला. जरा विचार करा, त्यामुळे किती अनर्थ झाला, होऊ शकतो. मूळ वाक्य, " जो दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.  

           हे विशिष्ट कार्यासंबंधीचे वाक्य,मी जो दुसर्‍या वरी विसंबला, तो संपला. लिहिलेय नं? जो स्वतःचे सुख वा यश यासाठी दुसरा हात देईल,  त्यावरच  सुखाची कल्पना, समोरील  जनांशी संबंधित मानेल, तो निश्चित  depression मध्ये जाईल. आपल्या मनाची- धनाची- तनाची  निगराणी, आपण ठेवावयाची  ना? तरच happyness tree  तरारून वाढेल नं? मग त्यासाठी, स्वतःला व्यक्त करणे, आवश्यक आहे ना? हो, माझ्या या लिखाणाला, एका थोर व्यक्तींचे पाठबळ मिळतेय. बघा. प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्तृवाची व्याख्या अशी करतात कि,  एखाद्याचे बोलणे ऐकत राहावे, असे ऐकणार्‍याला वाटते, तेव्हा बोलणार्‍याच्या, बोलण्यातून- आविर्भूत होणारे, आविष्कृत होणारे, प्रगट होणारे - तेच वक्तृत्व।  जे समोरच्यात बदल घडवू शकते. तो शुरू हो जाये और यह विचार इतरेजनों तक  पहुँचाइये, फटाफट। इसका  तरीका आपको पता है ही। then start to like and share this blogs.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू