आज वसुबारस आपली हिंदुत्वाचा मोठा सण.

 ९.११ .२०२३ .आज वसुबारस. आपली हिंदुत्वाची दिवाळी आज सुरू.

    हो, माझ्या प्रिय व धर्मनिष्ठ ( hope so) वाचक हो, आपली खरी दिवाळी, आज वसुबारसने सुरू होते. गायवासरू पुजेने. गाय आपल्याला दूध देतेच. पण पुर्वापार आपल्यात, शेणाने घर सारवत असत. त्यामुळे किडामुंगीचा व रोगजंतुचे निर्मुलन- नायनाट होतो.तसेच त्याच्या गोवर्‍या थापून शेगडी पेटवली जात असे. अर्थात् लाकडाची बचत होई. चिपळूण जिर्‍हातील , एकमेव, गाय वासरूचे मंदिर बघा.


अन् बाकीच्या दिवाळी दिनाची महती सर्वांना वेगळी सांगायला नकोच.

     बस आनंदी आनंद चोहीकडे,जिकडे तिकडे चोहिकडे. माझे जन्मापासून आयुष्य मुंबईतच गेले. मी गोशाला पाहिली, ती सर्व प्रथम, आग्राला. ताजमहालच्या परिसरात. 

 अं, काय, खरेच. मी १९७३ मध्ये, माझ्या बहिणीच्या( अंध शाळेत शिक्षका होती)  बरोबर  त्यांच्या मोठ्या मुलांच्या व अंध शिक्षकांच्या education toor सोबत escot म्हणून गरले म्हणून गेले होते. त्यांना सर्व वर्णन करून सांगायचे होते. मी हसमुख शहा ची escot होते. तो चौकस होता. दिल्ली, कलकत्ता, डेहराडून. अर्थात् ताजमहाल पाहिला. अन् मी ही चौकस. त्यामुळे, तो जिथे जिथे स्पर्श करी, तेथील सविस्तर माहीती, त्याला सांगे. काही चिन्ह आम्हाला, हिंदुत्वाची जाणवली.त्याच परिसरात, गोशालेची जागा पाहून, आम्ही थक्क झालो. आजूबाजूला जलाशय हे, शिवालयाची/ देवालयाचीच खूण वाटली. 

  पण आम्ही सर्व लहानच होतो. तरी मी २३ची व माझी माई २५ची. पण पुढे माननिय श्री.पु.ना ओक, ह्यांचे   "तेजोमहालय" हे पुस्तक वाचले. विकत घेऊन परत परत वाचले. का- का हे सर्व दडपले जातेय,  असे  वाटे. तेव्हा आठवला, हसमुख (तेव्हा वय १८ वर्षे) चा प्रश्न, " पण ताई, ह्याच थडग्यावर, फक्त थेंब थेंब जल का पडतेय?  मुळात, मला ही प्रश्न पडला,  इतक्या पायर्‍या चढून हा मकबरा कसा व अन् फक्त ह्याच मकबर्‍याला, "महाल" का म्हणतात? व शहेनशहाला ते, कित्येक बिबी होत्या, मग हिचाच कोठेतरी पुरलेला देह, ४ वर्षाने काढून, इथे आणून कशाला पुरला बरे? अनं तेव्हा काय मिळण्याची शक्यता असणार खूप वर्षाने, मी माझ्या एका ख्रिचन मैत्रिणीला विचारले, तर म्हणे, साधारण ५.६महिन्यानी फक्त सांगाडाच उरतो.  आज.मी युट्युबवर एक व्हिडिओ पाहिला व आपल्या सर्वांना , शिवदर्शन घडवावे, असे मनोमनी वाटले, म्हणून " हा" प्रयास. मी लवकरच, आग्राला जाणार आहे. वय ७३+. फक्त आता, मला escot ची गरज आहे कोणी voluntarily येणारे? असो. तर मग तो व्हिडिओ बघा तर.


तेथे कितीतरी आपली मंगल चिन्हे आहेत. तीही बघाच. अन🙏🙏🙏 नमन करा हं.  तुम्ही म्हणाल, आज दिवाळीच्या मंगलसमयी, ही मृत मुमताजची आठवण कशाला? पण नाही,तुमच्यातील अनेक जण, सुट्यातून, तेथे 

 जाऊन स्वतःला, धन्य मानून असाल. वा! वा!  पण असो. आता पहाल, त्या, तेथील हिंदुत्वाच्या खूणा शोधा बरे.  अन् या महान हिंदु सणाला, एखाद्या शिवमंदिरात जाऊन, "तेथील " शिवलिंगाला, बाहेरची हवा व  भक्तांचा सहवास लाभो, ही प्रार्थना करा. व बहुजनांच्यात, हा भक्तीभाव जागृत करा. जसे नेहमी share करता, तसेच करून. दिवाळीच्या शुभेच्छा. फटाक्यापेक्षा, फराळावर भर द्या. मुख्यतः आपल्या तनमन व धनाचा संभाळ करा.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू