Gate way to future.उज्वल भविष्यासाठी वाटचाल.
२३.११ .२०२३ . Gate way to future. उज्वल भविष्यासाठी वाटचाल.
माझ्या सुजाण वाचक मंडळींनो, आपले ह्या माझ्या जरा गंभीर ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज अनेक मिम्स रिल्स व pranksच्या या जंजाळात न पडता, तुम्ही ह्या माझ्या विचारपूर्वक, आशयपूर्ण व आकलनास सुलभ अशा लिखाणाचे वाचन करीत आहात, यासाठी तुमच्या प्रज्ञेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच. गंमत म्हणजे, माझे वाचक महाराष्ट्रभर पसरले आहेत. अन् अमेरिकेतही २०.२२ आहेत. एक तर मराठीचे वाचन व त्यात, माझ्या पूर्णतः ज्ञानप्रभावी लेखाचे वाचन होत आहे, त्यातही तरूणमंडळी सामील आहेत, हे जाणून माझे डोळे भरून आले. पण एक point असा कि, "बुध्दीमत्ता वरिष्टम्" मुंबापुरीत मात्र ~ असो. इथे मुळात मराठी वाचनाचे वावडेच आहे. मी काल लिहिल्याप्रमाणे, जे जे थोर नेते- पुढारी , आपल्या मराठी प्रेमाचे गोडवे, भाषणातून गातात, त्यांची मुले, कॉन्व्हेन्टमध्येच शिकली आहेत- शिकत आहेत. अन् मराठी वाचनाची बोंब. मग त्यांच्यात मराठी वाचन - समज यांचे बिंब कसे दिसणार? असो. सध्या मागच्या लेखात, मी मांडलेली कबुतरी वृत्ती आपण, तात्पुरती आत्मसात करू या. जर आपल्याला, सामाजिक सुधारणा अपेक्षित असतील व करावयाच्या असतील, तर प्रथम सुधारणा म्हणजे बदल हे समजून घेतले, पाहीजे. बदल का करतात बरे? एखादी गोष्ट चुकीची होत व कालाच्या ओघात चुकीची ठरत असेल, तर बदल करायलाच, हवा नं? जर आपण रस्ता चुकलो, तर मार्ग बदलतोच नं? मग आपल्याला चकवा कसा पडलाय, ते शोधून destination कडे वळणे, भाग आहे नं? म्हणजेच आधीचा विचार- आचार व प्रकार तपासणे, आवश्यक आहे ना? मग त्यासाठी, आपल्या जीवनाचा, छोटासा इतिहास, पहाणे, आलेच नं? आजवर आपण इतरांकडून अपेक्षा ठेवल्या व त्या पूर्ण न झाल्याने, किती लोका़वर नाराज झालो व ती नाराजी बिनधास्त बोलून दाखवली, ते आठवा बरे? या उलट इतरांच्या, आपल्याकडून असलेल्या, "अपेक्षा" समजून, घेऊन, आपण किती प्रमाणात पूर्ति केली आहे बरे? ह्याचे स्वतःशी आत्मकथन करा. तसेच त्यांनी नाराजी दाखवल्यास, ती चूकभूल सुधारली होती का? कि मला वेळच नसतो. म्हणून आत्मवंचना केलेय. एक गंमत सांगते, यच्चयावत महिला वर्गांचे बोल- आम्हाला वाचनाची खूप आवड आहे हो, पण वेळच मिळत नाही. तसेच पालकवर्गांना, विचारते, मुलांना वाचनाची गोडी लागावी. त्यांनी आपली मायबोली आपलीशी करावी, यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत? हां, फक्त महागडी story books विकत आणून कसे होणार? त्यांच्या समोर, तुम्ही वाचन करत असाल, तरच ते अनुकरण करतील? तुम्ही सिरियल बघत वेळ घालवाल, तर ते ही हेच योग्य म्हणून cartoons मध्येच रमतील. काय पटले का? करून बघा. तसेच जेष्ट व श्रेष्ट नागरिक हो, सक्काळी morning walk व हास्य क्लब मध्ये "हाहाहा" करण्यापेक्षा, घरातील, " हसरे तारे"बघा. त्यांना कथा विनोद सांगून बघा. त्यांच्यातील व्हा. हाच अनुभव सर्वत्र प्रसारित करा. त्यासाठी, काय करावयाचे, सुज्ञ वाचकांना सांगणे न लगे! like & share these blogs and discuss the points between your friend circle. आनंद वाटण्याने, द्विगुणित (double) होत असतो हो!
Comments
Post a Comment