अनोळखी फोन. offers. आकर्षित सवलती. फेसबिकवर अनोखे व्हिडिओज्
३.११.२०२३. अनोळखी फोन. offers. आकर्षित सवलती. फेसबुकवर अनोखे व्हिडिओज्.
मम सजग व सतर्क वाचकहो, राग आल्यावर १ ते १० अंक मोजावेत, असे आपल्याला सदैव सांगितले जाते. पण मी सदैव सल्ला देते, या मोबाईलवर आलेल्या आकर्षित करणार्या unknown नंबरच्या कॉलला response देण्या अगोदर rather, असे recorded कॉल पूर्णपणे न ऐकताच सरळ बंद करावेत. काही नुकसान होत नाही. मी परवा लिहिले होते, मला आलेल्या फोनची गंमत सांगेन. वाचा तर. परवा मी असेच ब्लॉग टाईप करत होते. या कामाला साधारणतः २० ते २५ मिनिटे लागतात. अर्थात् आधी विचार करून व विशिष्ट पेपरमधील योग्य बातमी शोधून, विषय मांडणीला, २.३ तास लागतात, म्हणा. असो. तर टाईप करतानाच, तेवढ्याच अवधीत, दोन फोन आले. एक म्हणे कि, "Your credit card is going to disconnect for technical reason, so~" मी बंद करून टाकला. कारण माझ्याकडे credit card/ debit card च नाही. ज्यांच्याकडे ते असते, ते घाबरतात व पुढील मागणी - details सांगतात. ह्यापेक्षा, simple thing आपण सांगावे, " ओके, उद्या बँकेत येते/ येतो." पण आळस वा busy. पण आपल्याकडे बँकेचा land line number असतो ना? मग~ बसल्या जागी, परत फोन करा नं! म्हणून माझा सल्ला - १० नाहीतरी ३ अंक तरी मोजा हो. हां तर, लगेच ५ मिनिटात दुसरा फोन. मी उचलला, Recorded voice उवाच - "आपको टाटा ग्रुपके ओर से gift की तौेरपर credit card मिल रहा है। आप इस लिंक पर क्लिक किजिये और instruction follow किजिये। और कुछ भी purchase कर सकते हो, सिर्फ पहले आपको मेंबर बनने के लिये ५००रू भेज~ " हाऽ ऽ ऽ.मी फोन बंद केला. खरे तर, मी इतका वेळ, ही बकबक ऐकतच नाही. पण मला अनायसे, ब्लॉगमध्ये लिहिण्यासाठी matter मिळणार होते. असो. खरे तर आता, मी हा topic थांबवून, नवीन काही रंजक लिहिण्याचा विचार करत होते. पण alas! आजचा, ' पुढारी', पेपर उघडला अन् लक्षात आले, नाही, हे गुन्हेगारीचे सत्र थांबत नाही. तोपर्यंत माझा हा सायरन - सायबर विरूध्दची ईशारा मोहिम चालूच राहावी, अशी दैवाची इच्छा आहे. ही गुन्हगारी युगे युगे चालत आहे, जखम भोळ्या जनाची वाहत आहे. आपणच आपली काळजी घेणे व इतरांना सतर्क राहण्यास सांगणे, हे करा. त्यासाठी काय करायचे, ते सुज्ञांस सांगणे, न लगे. फेसबुकचा विषय- उद्या.
~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment