नाव:-माया ही अनेक रूपाने, आपल्या सामान्यांच्ता जीवनात येत असते. positively ही.
29.11.2023. माया ही अनेक रूपाने, आपल्या सामान्यांच्या जीवनात येत असते.
प्रिय वाचक मंडळींनो, काल मी तुम्हाला, संबोधित न करताच, विषयाला हात घातला नं? मी ही "माया" या प्रकारावर, इतक्या deeply विचार, खरेतर चिंतन करताना, स्वतःशीच चकित झाले होते कि, लिखाणालाच अारंभ केला. खरे तर ते माझे स्वगतच होते. सुविद्येला जागृत ठेवले, तर जीवन आनंदमय होणारच. तेव्हा, कुविद्या - वाईट विचार- आचार, मोहातूनच निर्माण होतात. एखादी जबरी इच्छा, आपल्याला मोहमयी मायेत गुंतवते. अहो,दचकू नका. मोह काय नेहमी अपराधालाच जन्म देतो, असे नाही. मोह ही चीज सुधारणा व संशोधनाची शिडी आहे. त्यातून आपण काहीतरी चांगली निर्मिती करू शकू. आता माझेच बघा. मुळात मला प्रवासाची आवड आहे. पण पूर्वी, हे धनाअभावी कठीण जात होते. पण तरीही जी जी स्थळे बघावयाचा मोह होता. त्यातील आर्थिक दृष्टा जमतील, तेथे भेट दिलीच. आता समृध्दी आली, तर तन साथ देत नाही. तरीही ह्या ओढीपायी सोबत मिळवून स्वतंत्र गाडी करून फिरतेच. कारण या मोहमयी मायेतून जन्मते, "उमेद" ती आपल्या मनाची ताकद असते. या माझ्या ब्लॉगला, मी प्रारंभ केलाय, तनमनधनाच्या, " जमाई" या संकल्पनेतून. ज्ञानरूपी - पुस्तके जमवा. अन् बघा. तुम्हीही वाचन वाढवा. मग त्या लेखका़बरोबर, आपण ही त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या बरोबर स्वैर अशी सैर करू शकतो. खरे सांगू, मला ही असे वाटते, जास्तीतजास्त, वाचकांना , माझ्या या ब्लॉगच्या माध्यमातून, माझ्या, अशा अनोख्या विचारप्रवाहात ओढावे व खोल विचार करणारी मंडळी, सर्वदूर निर्माण करावी. त्यासाठी, एक विनंती आहे, जमतील तितकी उत्कृष्ट पुस्तके विकत घेऊन वाचन करा. परत परत वाचा. मग उंच उंच भरारी घ्याल. समस्त अनुभव शक्यतो, स्वतःच घ्या. घरबसल्या दिवसेन् दिवस, त्या मालिकेतून, एखाद्या कुंटुंबात घडवल्या जाणार्या, भांडणात, एकमेकांची खुसपट काढणार्यात रमू नका हो. त्यापेक्षा, ती किटी पार्टी पत्करली. निदान १०.१२ live चेहरे आमने सामने येतात. 😬. आता काल रात्री, आपल्या देशाने, फार मोठे यश मिळवलेय. हां,मॅच वगैरे नाही हो, पण आपल्यातील, किती सुशिक्षित मंडळी, यात मनाने- भावनेने गुंतली होती. अन् कितीजणांनी, देवाकडे, त्या कामगारांना, वाचविण्यासाठी प्रार्थना केली होती? आपल्या देशातील नागरिक, "आपला काय संबंध" असा कबुतरी दृष्टीकोन बाळगत होती. असो. आता तोच व्हिडिओ देत आहे, तो बघा. आजच्या विद्यमान सरकारची, ह्या साध्या कामगारांसाठी ही धडपड होती व सर्वांची सुखरूप सुटका करविली. अहो, यासाठी या राज्यकर्त्यांचा अभिमान बाळगा व सर्वांशी या घटनेबाबत बोला. बघा बरे कितीजणांना, या घटनेची माहिती आहे? सत्य घटनांच्या मालिकेत involve व्हा हो. तर मग या ब्लॉगची माहिती जास्तीतजास्त जनतेत प्रसारित करा. कशी ते सांगावयास नको नं?
Comments
Post a Comment