म्हणी.आपल्या गुरू.आता आणखी म्हणी बघू काय शिकवत्यात बरे.

 २९.१२ .२०२३ .म्हणी. आपल्या गुरू. आता आणखी म्हणी बघू काय शिकवत्यात बरे.

 १३.अति परिचयात् अवज्ञा –  कोणाच्या घरी जास्त जाऊ नये. तसेच इतरांच्या बाबीत, जास्त तोंड खूपसू नये वा उगीच सल्ला देऊ नये. जवळीकता  असली तरी मर्यादा राखून राहावे. म्हणजेच कोणाची privacy भंग झाल्यास अपमान होऊ शकतो .

 १४.अति झाले अन् हसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ते हास्यास्पद ठरते.

 ( एकूण कोठचीही limit cross  करू नये.)

 १५ .अति झाले अन् आसू आले – एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला , की ती दुःखच  होऊ शकते. 

१६.अंगावरचे लेणे , जन्मभर देणे –  दुसर्‍याचे दागिने बघून हव्यासापोटी, आपणही,दागिन्याकरिता कर्ज काढावयाचे अन् ते लेणे मिरवायचे  आणि ते रिण, जन्मभर फेडीत बसायचे .

 १७.अंधारात केले , पण उजेडात आले – एखादी गोष्ट कितीही गुपचुप केली तरी ती काही दिवसांनी सर्वांना कळतेच.तेव्हा beware while active.

१८. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली आर्थिक परिस्थिती पाहूनच खर्च करावे. १६ व्या म्हणी नुसार, इतरांना दाखवण्यासाठी खरेदी करू नये. 

१९.  नाचता येईना, अंगण वाकडे. जेव्हा एखादी गोष्ट, आपल्याला जमत नाही, तेव्हा  इतर संबधीत बाबी चूकीच्या ठरवणे.

२०. आयत्या बिळावर नागोबा –  इतरांनी केलेल्या कामाचे credit घेणे.  दुसर्‍याने केलेल्या गोष्टीचा फायदा उपटण्याची वृत्ती असणे .

२१ .आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – एखाद्या बाबतीत, अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे..

२२ .आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे –  जेव्हा सर्व मुलांच्या हातून, चुकीची घटना घडते, तेव्हा, " माझा मुलगा, एकदम साधा हो, बाकीची, मुले त्याला बिघडवतात. असे सर्वांच्याच आया म्हणतात.

२३.आपलीच पाठ थोपटणे. – स्वत:चेच गुणगान करणे. स्वदोष न पाहणे.

२४.आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वत:चाच स्वार्थ पाहणे. दुसर्‍याच्या वाटेचे श्रेय ही स्वतःच लाटणे.

       बघा बरे, या म्हणींतून किती ज्ञान सुलभपणे मिळाले. अन् हा धडा, प्राथमिक शाळेतील, आपल्या काय कामाचा, म्हणून आपण, विसरून जातो. हे तर आपल्या तरूणपणी व पौढपणी, उपयुक्त असे ज्ञान आहे. तर मग हे विसरणे, निव्वळ मूर्खपणा होय. sorry for this word. But its truth. बरोबर ना? मग काय  शिकायचे नं यातून शहाणपण.

 =================================

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू