दोन्ही बाजुस,अति महत्वाकांक्षा असेल, तर विश्वास डळमळित होतो हो.
१. १२.२०२३ . दोन्ही बाजूस, अति महत्वाकांक्षा असेल,तर विश्वास डळमळीत होतो.
माझ्या सुज्ञ वाचक मंडळींनो, वरील दोन्ही भावना, प्रगतीसाठी आवश्यकच आहेत. पण त्यासाठी या आशा व आकांक्षांवर जरा काबू ठेवणे, गरजेचे असते. आशा- आकांक्षा नक्कीच असाव्यात. पण त्यानिमित्त, आपले वर्तन- वागणूक, मर्यादाशील असावी. आकांक्षा बाळगाव्यात, पण त्यांच्या पूर्तीसाठी, दूरदर्शी सावधानता राखावी. योजना युक्तीने परिपूर्ण असाव्यात. फार मोठ्ठे गंभीर लिहिलेय नं? पण तेच आपल्या साध्या व सरळ वर्तनाने सुलभ व यशदायी होऊ शकतात. दोन समांतर जगणार्या व्यक्तींच्या अपेक्षा व आकांक्षा - चांगल्या असूनही- विरुध्द दिशेने जात असतील, तर संघर्ष अपरिहार्य होतो. मग समजूतीने मार्ग न काढल्यास, एकमेकांवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो. आता या बाबत, एक म्हण perfect fit बसते, "घरोघरी मातीच्या चुली", अर्थात् सगळीकडे, या बाबत अतिरेक नाही होत... पण काहीजण असे असतातच. मी कोठच्या गोष्टी बद्दल बोलतेय, चाणाक्ष वाचक अंदाज लावतीलच. पालक- बालक. अर्थात् अभ्यास मार्क- रँक.
काही पालक ८०ते ८५% मध्ये खुश असतात. तर काही एखादा% वा एखादा मार्क जरी कमी झाला तर "कल्लोळ" करतात. इतका कि, त्या मुलांच्या जीवनात, "झाकोळ" येतो. झाकोऴ चा अर्थ कालच मी सांगितलाय, आठवतोय. सत्य दडपणे. पण आणखीन् एक अर्थ असा कि, सुर्य बरेच योजने दूर असतो. आकाराने व तेजाने अतुलनीय असतो. पण जेव्हा त्याच्या मानाने, चिल्लर असे ढग, त्याला आपल्या पृथ्वीतलाहून पाहता, झाकून टाकतो. तोही ,
" झाकोळ"च. अर्थात् सुर्याचे तेज मेघांच्या - मायेच्या आड दडपले जाते.
तर हे दोन्ही मुद्दे, असंबंधित वाटले नं? पण नाही , हे एकाच धाग्याने बांधले आहेत. अहो, मुले प्रज्ञावान, स्मरण शक्तिवान असतात. मती म्हणजेच बुध्दी. माझे मूळ नाव, भानुमती आहे. त्याचा अर्थ - सुर्यासमान- मती- बुध्दी असणे. god knows, in case of me, is it true or! पण कित्येकदा पालकांच्या अतिरेकी महत्वाकांक्षेमुळे, मुलांचे बालपणाचे काय, हा प्रश्न खरे तर समस्या निर्माण होते. मग पुढे, त्याचे दुराव्यात रूपांतर होते. महत्वाची बाब म्हणजे आजकाल, सर्व मुले physically एकत्र येऊ न शकल्याने, आभासी दुनियेत रमतात. हेच जेव्हा मुलींच्या बाबतीत, कॉलेज जीवनातही घडत गेले, तर social media वर मिळणार्या like कडे आकर्षित होतात. काही दिवसा पूर्वी, मी एका topper मुलाची सत्य कथा लिहिली होती, आठवतेय. सहलीला गेल्यावर friends circle मध्ये न एकटा पडका होता. उद्या तो, ब्लॉग पुन्हा तुमच्यासमोर ठेवीन. तर आज एवढेच बस! यातून काय व कसा धडा घ्यावयाचा,ज्याचा त्याचा विवेक. फक्त माझे हे सांगणे, कृपया पालथ्या घड्यावर पाणी, होऊ नये, म्हणून ,हा ब्लॉग, आपल्या whatup groups मध्ये प्रसारित करा, ही🙏विनंती. भेटू उद्या.
Comments
Post a Comment