इतिहासात शिरलोच आहोत, तर आपल्या छत्रपती संभाजी राजेंची नव्याने ओळख करून घेऊ या.
११. १२ .२०२३. इतिहासात शिरलोच आहोत, तर आपल्या छत्रपती संभाजी राजेंची नव्याने ओळख करून घेऊ या.
माझ्या महाराष्ट्रप्रेमी व मराठीचे अभिमान बाळगणार्या वाचक वर्ग हो, मी आपल्या लाडक्या शंभुराजांची व त्यांनी लिहिलेल्या, संस्कृत ग्रंथाची माहिती व त्यांचे हे लिखाण, आपल्यासमोर मांडणार आहे. खरे सांगा कितीजणांना, या शंभुराजा लिखित " बुधभुषण " ग्रंथाची माहिती आहे. हा, ३ वर्षापूर्वी, मी माझ्या ह्याच ब्लॉगमधून याविषयी व त्यातील विषयाबाबत लिहिले होते. पण आज, नवीन आलेल्या वाचकांसाठी-ही पुनरावृत्ती. त्यावेळच्या वाचकांना परत जागृत करावे, हा हेतू. पण आपले मराठ्यांचे दुदैव म्हणजे, ह्याचे हस्त लिखित( जे शंभुराजांनी स्वः हस्ते- लिहिले आहे, ते आहे, "" इटलीत"" ते आणावे,असे कोणा ही राजकारण्यांना वाटले नाही- वाटत नाही.😕🤔.
आता बुधभुषणातील समृध्द शैली अभ्यासू या.
ह्यात ते सूर्याचे स्तवन करत आहेत. बघा.
सिन्दूरस्पृह्या स्पृशन्ति किरणं कुम्भस्थमाधोरणा ।
भिल्ली पल्लवशंकया विचिनुते सान्द्रं द्रुमद्रा ।
कान्ताः कुंकमशंकया करतले मृद्रन्ति लग्नंम् यत् ।
त्ततेजः प्रथमोद्भंव भवकरं, सौर चिरं पातू वः ।। ६१ ।।
अर्थ:- सुर्याचे किरण, जणू हत्तीच्या गंडस्थळ मस्तकावर पडल्याने, सिंदूराप्रमाणे चमकत आहेत
अन् भिल्लीणी तो ओला सिंदूर समजून, द्रोणात घेऊन, कुंकुम समजून लावत आहे. हे सुर्या, तुझे हे उदय काळीचे पहिले तेज आम्हाला पावन करो.
शंभुराजेंनी प्रारंभी ईश स्तवन करताना गणेश, शिव व शारदा या देवतांबरोबर गुरूंचे स्तवन केले. त्यात त्यांनी गुरू कसे असावेत. हे सांगितले आहे. हे वर्णन छत्रपती संभाजीमहाराजांच्या व्यक्तीमत्वाचे नेमके दर्शन दाखवत आहे.
बघा हा श्लोक हं,
अज्ञानकृष्णसर्पेण, दंशिता भुवि मानवाः ।
तेषां जीवनहेत्वर्थे, नौमि जांगुलिकं गुरूम् ।। ४ ।।
आता ह्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊ या.
बघा हा श्लोक हं,
ह्या जगतातील माणसांना, जणू अज्ञानाच्या कृष्णसर्पाने डंख मारला आहे. त्यांना जिवंत (मनाने) ठेवण्यासाठी , " गुरूरूपि विषवैद्यकांची (सर्पाचे विष उतरविणार्या) हेतूपूर्ण निवड केलेली असते. त्याला शरण जाणे, हितकारक असते. मी तेच केले, जाणकार मैत्रिणी सौ.सुजाता सोहोनी व सौ. अंजली कुलकर्णी ह्या माझ्या(संस्कृत तज्ञ) मैत्रिणीकडून अर्थ समजाऊन घेतला व आपल्याला सांगत आहे
बघा या प्रकारे, शंभुराजे, तत्कालीन जनतेला , मोगलांपासून मिळणार्या फायद्यापासून दूर रहाण्यास सांगत आहेत. त्यापेक्षा आपल्या हिंदुत्वा साठी जगा. आज ही, या काळात, हा उपदेश, हितकारक ठरतो. त्याकाळी,अल्प स्वार्थासाठी, मोगलांना वश होण्यापेक्षा, ते आवाहन करतात, गु्रू असा करा कि, तो, आपले अज्ञानरूपी - विष - उतरवील व आपले विचार व आचार संपन्न बनवील.
आज ही आपण, आपल्या पुढील पिढीस , योग्य व विकासशील राजकर्ते निवडावयास हवे. उगीच अल्प फायद्यासाठी, आपले बहुमुल्य, " मत" फुका जाऊन देऊ नये. पटतेय नं, मी कोणाही पक्षाचा प्रचार करत नाही. पण योग्य विचारांनी युक्त व सच्च्या हिंदुत्वाचा प्रसार करावा, आपल्या, पहिल्या तिन्ही छत्रपतींना, निर्देशित असलेले, राष्ट्र निर्माण व्हावे, अशी आकांक्षा बाळगून मी .
हे लिहित आहे. मला वाटते, सर्व मराठीजनांना ही असे वाटत असेल, म्हणून, घरोघरी, " देवघर" असते. निदान स्वतःशी तरी विचार करा. बस. आणखी काय सांगू. नेहमीचेच. .
पुढील चिन्हाद्वारे ही, मी काही सांगू इच्छितेय ते - between the lines वाचण्याचा प्रयास करा, चाणाक्ष वाचक हो😉
Comments
Post a Comment