शंभुराजांच्या, बुधभुषण या ग्रंथातील राज्यकर्ता कसा असावा, हा तपशील
१३. १२.२०२३. शंभुराजांच्या बुधभुषण या ग्रंथातील, राजकर्ता कसा असावा, हा तपशील.
माझ्या सुज्ञानी वाचक हो, संभाजीराजेंनी आपल्या बुधभुषण या ग्रंथांत, राजा- राजकर्ता कसा असावा, ह्याचे वर्णन केले आहे. आज माझी मोठी चूक मला नडली. मी संपूर्ण ब्लॉग लिहिला अन् माझ्या asstt ला पाठवताना select केल्यावर copy च्या ऐवजी चुकून cut press केले. अन् पुर्ण लिखाण परत लिहित आहे. खरे तर, अरे बाप रे म्हणून मी निराश झाले. मग विचार केला, अरेच्चा! अाज अापल्याला सर्व सुविधा आहेत. चूक झाली तर सुधारण्याचा मार्ग आहे. पण पूर्वी शाई- टाकाने लिहिताना, काय उपाय होता? बहुदा, पूर्ण पान बदलायला लागत असेल! मग त्यांनी ग्रंथ लिहिलेच नसते तर??? आपल्याला ज्ञान कसे मिळाले असते? सोचो, सोचो.
हां. काल,मी लिहिले होते, या ग्रंथा सोबत, शंभुराजांनी, दोन ग्रंथ - नखशिख व सात शतक, हे ब्रिजभाषेत ग्रंथ लिहिले आहेत. ज्यांना, हे कसे शक्य आहे, असा प्रश्न पडला असेल, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र, नीटपणे, अभ्यासिलेच नाही, असे म्हणावे लागेल. गुस्ताखी माफ. पण अाग्राहून सुटका, या प्रसंगी, शिवबांनी, बाळराजेंना, मथुरेला, कृष्णाजी विसाजी, या विश्वासू ब्राह्मणाकडे ठेवले होते. ते तेथे दिर्घकाळ होते. सामान्य जनतेत, सामान्य होऊन राहिले होते. त्या ८.९ वर्षाच्या कुशाग्र बुध्दी बालकाने, त्या देशीची भाषा आत्मसात केली नाही तरच नवल म्हणावे लागेल. शिवाजी महाराज पेटार्यातून पसार झाले. बस. यापुढील कष्टप्रद प्रवास किती जण जाणतात. ही हकिकत उद्या सांगीन. आज बुधभुषणात,शंभुराजांनी वर्णिलेले, उत्तम राजकर्त्याचे वर्णन पाहू. बुधभुषणाच्या दुसर्या अध्यायात श्लोक २ ते १३ मध्ये ते योग्य व उत्कृष्ट राजकर्त्यात असावयास पाहिजे, असे गुण सांगत आहेत.
मेधावी, मतिमान, दीनवदनो,
दक्षः, क्षमावान्, ऋजुः।
धर्मात्मा, अपि अनसुचको, लघुकरः ।
षाङ गुण्यविद्, शक्तिमान् ।
उत्साही, पररंध्रविद्, कृतधृतिः।
वृध्दीक्षयस्थानविद्।
शुरो, न व्यसनी, स्मरति उपकृतं,
वृध्दोपसेवी च यः ॥२॥.
च यः म्हणजे असा असावा.
यातील काही महत्वाच्या शब्दांचा अर्थ सांगते. व बाकीचे उद्या बघू. I mean अभ्यासू या.
ऋजु = कोमल ह्रदयी व मधुरभाषी।
अनसूयको = कोणाचाही द्वेष न करणारा.
लघुकरः = कर अल्प प्रमाणातच आकारणारा.
पररंध्रविद् = दुसर्याचे इंगित जाणणारा. म्हणजेच
शत्रुचे गुण दोष जाणणारा.
सर्वात महत्वाचा गुण, राजकर्त्यात असावा, तो म्हणजे - वृध्दिक्षयस्थानविद्
धैर्यशीलतेने कोठे जोर मारावा, पुढे पाऊल टाकावे व कोठे व किती माघार घ्यावी, ही समज असणारा.
हा गुण तर आपल्या सर्वांच्यांत हवा, बरोबर नं? तसे पाहिले, तर आजच्या राजकारणी नेत्यातून हा गुण असतोच. फक्त ते ह्याचा उपयोग स्वार्थासाठीच करतात. देशासाठी करणारे विरळाच. पण नशिबाने, आपल्यात आहेत( पहचान कौन) त्यांना पाठिंबा देणे, हेच मोठ्ठे देशकार्य आहे. ते आपण करणार, ही शपथ घ्या बरे. मी आज, तुम्हाला, like& share सांगणार नाही. यावर अध्ययन व पूर्ण विचार करा. आपोआप आपण perfect action घ्याल. शंभुराजे, जे बोलले(I mean लिहिले) त्या प्रमाणे वागले .बोले तसा चाले, त्याची वंदावी पाऊले. पण आपल्या समग्र हिंदुच्या दुदैवाने, अल्प स्वार्थापायी, त्यांच्या, सख्या नातलगाने, त्यांना दगा दिला व औरंगजेबाच्या अधीन केले. हा दगा संपूर्ण मराठेशाहीशी झालाय. असो. माझ्या समवयीन मंडळींनी, "येथे ओशाळला मृत्यु", हे नाटक पाहिले असेल? जर नच पाहिले तर, ते कमनशिबीच होत.
Comments
Post a Comment