मंत्रपुष्पांजलि- मार्फत, सर्वोत्तम राजाची मागणी

 १४.१२ .२०२३ . मंत्रपुष्पांजलि- मार्फत, सर्वोत्तम राजाची मागणी

  सुजाण नागरिक व सप्रज्ञ वाचकहो, शंभुराजेंनी, बुधभुषण, या ग्रंथात राजकर्त्याचे गुण लिहिले आहेत' त्याची झलक पाहिली. तसे  तर आपण नेहमीच, या योग्यतेचा राजा, परमेश्वराकडे मागत असतो. 

     आपण मारे ऐटीत सर्व पूजे नंतर मंत्रपुष्पांजली खुल्या आवाजात म्हणतो.  खरे तर जोराने(  बोंबाबोंम करीत). पण काय बोलतो,  कोणास ठाऊक. हे नकळताच, लहान मुलांप्रमाणे पाठ केलेले बोलतो. Play school मधील मुले जशी बोलतात, तसेच 🤗.   rain rain go away ही कविता, कोठच्याही season मध्ये बोलतात, तसे.  या मंत्रपुष्पांजलीतून, आपण चांगला शासनकर्ता मागतो. पण  आज  आपल्याला लोकशाहीमुळे CHOICE अाहे, तर 

 VOICE उठवा नं.  या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.

सर्व जनता सदैव जागृत असावी. शासनकर्ताबाबत  अंधश्रध्दा न ठेवता, त्याच्या कर्तव्याबाबत सावध व तत्पर असावी. प्रजेच्या अपेक्षांचा राजांने आदर करावा. निस्वार्थ वृतीने राज्यकारभार करावा. त्यामुळे प्रजा सुख समाधान पावेल व राजकर्त्याचे अभिष्ट चिंतन करीन. तोही समाधान पावेल.  व सर्बश्रेष्ट ठरेल. 

  आमच्या राज्यात जनतेला अधिकार मिळावेत. न्याय मिळावा. आमच्या साम्राजात खूप अधिकारी असावेत. सर्व अधिकार एकाच ठिकाणी न राहाता, अनेकांच्या विचाराने कारभार चालावा.

    असे हे अ‍ामचे साम्राज्य चोहोकडे सातासमुद्रापर्यंत तसेच, त्याही पलिकडे, संपुर्ण खंडात  विस्तारावे.

    साम्राज्याचा राष्ट्रपती सर्व जगात सार्वभौम व्हावा.  त्याला दिर्घ आयुष्य व आरोग्य लाभावे. त्याच्या कर्तृवामुळे जगामध्ये आमच्या साम्राज्याची वाहवा व्हावी. आमच्या साम्राज्याची सतत प्रगती व्हावी, म्हणून तो झटत असताना, सर्व प्रजानन ही त्याच्या बरोबरीने कर्तृत्व तत्पर असणे, तितकेच गरजेचे आहे, ह्याची आम्हा सर्वांना जाणिव राहावी, ही देवाधिदेवा, तुझ्या चरणी विनंती. 

संदर्भासाठी, "पुढे, " मंत्रपुष्पांजलि" देत आहे.


काही मागून मिळत नसते. आपणच मिळवावे लागते. तेव्हा आपल्या जे हातात आहे, त्याचा उघड्या डोळ्याने व डोक्याने वापर करा. मत "दान" नसते. अधिकार असतो.

 आता माझी कळकळीची विनंती आहे,व तुम्हाला सावध रहा. Be active, be unite and do something. The positiveness is also the step towards success. Be succeed ..

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू