सुयोग्य राजकर्त्याची निवड

 १५.१२ .२०२३. माझ्या सुजाण वाचक हो, 

         काल मी लिहिले होते. आपल्याला मत- दान करायचे नाही. तर मताधिकार बजावयाचा आहे. अहो, हा  मतदान शब्द, कोणी प्रचलित केला असेल, त्याल लोकशाही कळलीच नाही. हो, मी स्पष्टच लिहीत आहे. पण मला सांगा, आपण दान कोणाला करतो. आपल्यापेक्षा, ज्याच्याकडे, " काही कमतरता आहे, त्याला नं, मग इथे उत्कृष्ट दर्जाचा  राजकर्ता निवडायचा आहे, तो आपल्या सर्वांच्यापेक्षा, उच्च विचाराने व उच्च आचाराने युक्त हवा असेल, तो दान देण्या योग्य व आपण दानशूर त्याची गरज पूरी करणारे, हे समीकरण बरोबर आहे का?

          आता मी तीच माझी आवडती, विष्णू शर्मांनी( चाणक्य), आळशी व  व्रात्य राजकुमारांना सागितलेली कथा, नाट्यरूपात खाली सांगत आहे. अहो, कावळ्याला कळते, ते आपणा  मानवांना का कळू नये बरे? 

          तर वाचा "पक्ष्यांचा राजा"

शासनकर्ता.  पक्षी वर्ग नवीन राजाच्या शोधात.

  सर्व पक्षी आपापला आवाज काढतात . तेथून घार उडत येते.

       घार:-  काय रे, काय कलकल चाललेय?                कोकिळा:-  आम्ही मोठ्या गंभीरपणे बोलत आहोत.     

                 कलकल काय म्हणतेस ग?

   पोपट  :- खरे आहे. आम्ही आपल्या पक्षी समाजाच्या

               संरक्षणाच्या बाबतीत . .चर्चा. .

     घार  :- ए बाबांनो, सरऴ सांगा की काय ते . .

  खंड्या :- आमचे म्हणणे आहे कि, आपले राजे गरूड  महाराज नेहमी स्वर्गात, भगवान विष्णूच्या  बरोबर असतात, तेव्हा . . 

  सारस:-- आपल्याला इथे जंगलात मार्गदर्शन  करण्यासाठी, आपले संरक्षण करण्यासाठी  कोण आहे का?

  बगळा :- हे एका अर्थी बरोबर आहे. आपल्याला राजा 

              गरजेला मदत करणारा हवा. अर्थात गरूड  महाराज दूर असले तरी सर्व समर्थ. . .

   पोपट:- जवळ नाहीत, आपल्यातले नाहीत, म्हणून तर आम्ही ठरवले आहे, आपण इथलाच नवा राजा 

             ठरवू.

चिमणा:- जो एका जागी बसेल अन् केव्हाही आपल्याला  ठरल्याजागी सापडेल, असा राजा हवाय् आम्हाला.

  घार:-  मग मी गोल गोल फिरून शोधून काढीन, असा 

           कोणीतरी. .                                          कोकिळा :- हो, तू बरोबर शोधून काढशील. . 

चिमण‍ा:-  पण बघ हं घारूताई,  ह्या कोकिळेसारखी  लपून बसणारा नको बाई, नाहीतर पानापानात  शोधण्यातच वेळ जायचा. . .

कोकिळा:-  अन्  ह्या चिमणीसारखा नाचरा ही नको . .

सुतार    :- बास आता. त्यापेक्षा मी सांगतो. वरच्या फांदीवर  बसलेले घुबड कसे वाटते?

 पोपट :- आहे खरा मुनींसारखा. 

              ( सगळे हो हो म्हणून ओरडतात.) 

     आता उद्या ह्या पक्षीराजा चा शोध योग्य रितीने झालाय का ते पाहू. 

  तर उद्या भेटू या. मला तुमच्या कुंटुंबियासह तसेच मित्रपरिवारासह भेटायला आवडेल. मग त्यासाठी like&share करा बरे !

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू