पक्ष्यांचा राजा भाग २. योग्य राजकर्त्याची निवड.
१६.१२.२०२३ . पक्ष्यांचा राजा भाग २. योग्य राजकर्त्याची निवड.
मत्प्रिय सजग वाचकवृंद हो,
बघा हा पक्षी,कावळा किती अक्कलहुशारीने, इतर पक्ष्यांना योग्य दिशा दाखवतो. उगीच नाही संस्कृतमध्ये त्याला, "वायस" असे संबोधन आहे. वायस म्हणजे योग्य अयोग्याची पारख असलेला. आपण मात्र त्याला, त्याच्या रंगावरून, तुच्छ लेखतो. खरे तर तो आपल्यासाठी,सफाई कामगाराची भुमिका वठवतो. म्हणून तर त्याला चाणक्यांनी गुरू मानले आहे. हंस- मराळास ," नीर क्षीर विवेक बुध्दी म्हणतात. हे जर खरे असेल, तर ह्या कथेप्रमाणे, तो दूध- पाणी एकत्र असल्यास, त्यातील - दूध फक्त पितो व पाणी खाली शिल्लक ठेवतो. पण या उलट, हा काक पक्षी सर्व ठिकाणची घाण आपण सेवतो. व स्वच्छता राखतो. असो. कालची कथा पुढे सांगते.
दुसरा भाग.
सुतार पक्षी बसायला लाकडाचा ओंडका आणतो.
पोपट पानांची शाल अाणतो.
खंड्या फुले आणतो.
चिमणी रिबिन आणते.
झाले सिहासन तयार.
सारस:- अरे बोलवा आता, आपल्या नव्या
महाराजांना.
तेवढ्यात समोरून कावळा येतो.
कावळा:- अरे , हा कसला समारंभ चालला आहे?
कोकिळ:-कावळेदादा, कसे अगदी वेळेवर आलात.
बगळा:- आपण आपला निर्णय, ह्यांना सांगू या.
हे सर्व जगात वावरत असतात.
चिमणी:- त्यामुळे त्यांच्यात विचारशक्ती व चातुर्य
नक्कीच जास्त आहे.
घार :- हां, त्यासाठीच तर कावळेकाकांचा सल्ला
घेतला तर,ते योग्यच होईल.
सुतार:- म्हटलेच अाहे, माणसात न्हावी , पक्ष्यात
कावळा व पशूच्यात कोल्हा हे धूर्त
असतात.
खंड्या:- अहो काका, आपले गरूड महाराज नेहमी,
आपल्यापेक्षा दूर असतात ना. .
चिमणी:- म्हणून ,आम्ही शांत व एका जागी सापडणार्या
घुबडाला, आपले नवे राजे करावयाचे
ठरवले आहे
सुतार:- मी अाता त्यांना बोलवायलाच. . . .
कावळा:- अरे कर्मा, काय म्हणावं या तुमच्या कल्पनेला.
अरे बाबानो, तुम्ही म्हणता कि, लांब असणार्या
गरूड दूर असल्या मुळे उपयोग नाही. पण तो
शक्तीशाली गरूड, त्याचे नाव घेतले तरी, शत्रु
आपल्या वाटेला जायला घाबरतील. जर बडी
बडी मंडळी आपल्याला जवळची आहेत , असे
कळले तर आपलाला ही आदर देतात, लोक.
बगळा:- बरोबर आहे, तुझे म्हणणे. या घुबडांचा कोणाला
धाक ही वाटणार नाही. शिवाय हसून बघत ही
नाही.
सुतार:- नशीब! मी बोलवायला गेलो नाही.
कावळा:- पटले ना, आणि बोलवून येणार व काम करणार
कसा तो, त्याला दिवसा दिसते का? अं.
बगळा:- त्यामुळे त्याची काही संकटात मदत होणारच
नाही. समर्थ गरूड महाराजांची सर कशी
येणार?य
कावळा:- पटले ना? नुसते समोर असून व
आपल्यातला असून काय फायदा?
योग्य तर्हेने शिकवू न शकणारा शिक्षक व
कुंटुंबाचे पालन न करणारा कुंटुंबप्रमुख काय
उपयोगाचा?
सर्वजण मान डोलावतात व म्हणतात,
" श्री विष्णू वाहन सर्व शक्तीमान आदरणीय
गरूड महाराजांचा विजय असो.
तर अश्या प्रकारे राजा कसा असावा, आपल्या
त्याच्या कडून अपेक्षा पूर्ण होत आहेत का? तसेच
जनतेच्या मागण्या वाजवी आहेत का ? हा धडा
नागरिकांसाठी आहेत की छोट्या मुलांच्या बाबतचा हा
विषय आहे. त्यांच्या कुवतीच्या बाहेरील हा आशय आहे? खरेच विचार करा. जागे व्हा. आजच्या परिस्थितीला सजगपणे सामोरे व्हा. एकदा हे "पंचतत्र" वाचून काढा. बिघडलेल्या राजकुमारांना वठणीवर आणण्यासाठी,
विष्णु शर्मा म्हणजेच चाणक्यानी लिहिलेय, ते लहानमुलांच्या आकलना बाहेर आहे. ते आपल्या साठी आहे. हे कावळ्याला कळले , ते Why not we can understand? actually speaking, The truth is that we don't want to & try to understand.
सर्व साधारण जनतेचे सुत्र आहे "मला काय करायचेय !
बस!
कावळ्याचे योग्य समजावणे, इतर पक्ष्यांना आकलन होते. व ते योग्य पावले उचलतात. पण आपल्यापैकी कित्येक, आपल्या, स्वार्थापायी, सामाजिक रचनेचा धुव्वा उडवितात. कसे ते उद्या बघू या. पण तुम्हाला नेमके आकलन झाले नं? तर मग, बस. तर उद्या या वायस पक्ष्याची योग्यता उद्या पाहू. तसे तर,पितृपक्षात, हे मी लिहिले होतेच. तर मग करणार ना, ह्याचा प्रसार व प्रचार. कसा कराल बरे!
Comments
Post a Comment