गुरू= " गु" कार-- अंधकार. व " रू" कार = तेज- होकार- स्विकार
१८ .१२.२०२३ . . गुरू= "गु"कार-- अंधकार व रूकार= तेज- होकार- स्विकार.
माझ्या सुजाण व सुज्ञ वाचक मंडळीनो, काल मी काल लिहिले होते,या वायस पक्ष्याची, कावळ्याची योग्यता पाहू. परंतु, त्या आधी, " गुरू" ची महती व आपल्या जीवनातील, महत्व पाहू. जसे इतर पक्ष्यांनी, त्या योग्य गुरूसमान, अशा त्यांच्याच, बरोबरीच्या, जाणकाराचे बोल, मान्य केले. तसे आपण ही, आपल्या "गुरू"विषयी ज्ञान घेऊ या.
गुरू ग्रह मालिकेतील पाचवा ग्रह. आकाराने सर्वात मोठा. लहानाला बोलतात, लघु व मोठ्याला बोलतात, गुरू म्हणजे समर्पक नाव.
गुरू म्हणजे शिक्षक अध्यापक , हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण हा शब्द कसा तयार झाला, ते पुढील श्लोकावरून समजते.
गुकारास्त्वन्धकारस्तु रुकार स्तेज उच्यते।
अन्धकार निरोधत्वात् गुरुरित्यभीधीयते। ।
अर्थ बघु या. "गु" कार म्हणजे अंधार.
" रु" कार म्हणजे तेज.
जो अज्ञानरूपी अंधाराचा निरोध करून, ज्ञानाचा प्रकाश-तेज देऊन आपल्याला, प्रज्ञावान बनवतो. तो गुरू होय. गुरू ग्रहाला इंग्रजीत Jupiter म्हणतात. त्याचा ही अर्थ तेजःपुंज असा आहे. मला सांगा, संस्कृत व ग्रीक जगाच्या पाठीवर, लांब वेगवेगळ्या ठिकाणी संवर्धन झाल्या, मग ह्या दोन्ही संस्कृतीच्या विचारात साम्य कसे? विचाराचे आदानप्रदान कशा प्रकारे घडले असेल? वारांची नावे नेमकी क्रमवारच कशी? आता हे बघा, गुरूवारला इंग्रजी शब्द आहे- THURSDAY. ही संज्ञा अालीय, एका जॅमनिक ( युरोपियन पुरातन संस्कृती) दंतकथेतून. थोअर या शब्दावरून - म्हणजे थोर😆 .ही कथा गुरू- शिक्षकांशी संबंधित आहे. पाहिलात चमत्कार. वरवर वेगळे शब्द दिसले तरी अर्थ एकच. म्हणजे गुरूवारचा बेत style मध्ये Thursday's programme म्हटले तरी मूळ तेच. कोणत्या ही भाषेत बोला, अर्थ एकच , "गुरू". तर या तमोहारी - अंधकार दूर करणार्याच, व्यक्ती- ग्रंथ- शिक्षक- ज्ञान- याचाच अवलंब करा, हीच विनंती करीत आहे. उद्या याच्या योग्य वा योग्य परिणामाची चर्चा करू या. त्यासाठी जास्तीजास्त मंडळी जमा करा बरे. यानी like & share to maximum people. yesses.
Comments
Post a Comment