तसे पाहता, ग्रंथ हे आपले खरे गुरू होय. सर्व ग्रंथांचे सार म्हणजे पूर्वापार प्रचलित असलेल्या म्हणी.

 २८.१२.२०२३. तसे पाहता, ग्रंथ हे आपले खरे गुरू होय. सर्व ग्रथांचे सार म्हणजे पूर्वापार प्रचलित असलेल्या म्हणी. 

  मत्प्रिय वाचक मित्रमैत्रिणींनो, हो खरे आहे कि, सच्चा मैत्रीला वयाचे बंधन नसते. तर समविचारी व सम अाचारी मंडळींच्यात, मैत्रीचे धागे, सहजी, बांधले जातात. हां, तर काय सांगत होते. खरे ज्ञान मिळवण्यासाठी, मोठ्ठे ग्रंथ वाचन न करता ही, आपल्याला सहजी ज्ञान मिळवता येईल. फक्त लहानपणी, ज्या म्हणींचा अभ्यास केला, त्या, परत एकदा समजून व त्यातील, आशय उमजून घ्यावयाचा. बस.

  

१.चोराच्या मनात चांदणे. जेव्हा एखादा चोर, रात्री चौरकर्मासाठी बाहेर पडतो, त्याला जणू, सर्वत्र उजेड- चांदण्याचा प्रकाश आहे असे वाटते व तो लपतछपत वावरतो. त्याचप्रमाणे, वाईट वर्तन करणाऱ्याला, आपले कृत्य, इतरांना कळेल की काय अशी भीती वाटत असते.

२.चोरावर मोर. एखादी व्यक्ति, कोणाची फसवणूक करणार असते व त्याबाबत बिनधास्त असते, तेव्हा तिचा इरादा नेमका ओळखून,  तिचा डाव तिच्यावरच उलटवणे.

 ३ आधी पोटोबा मग विठोबा – प्रथम पोटाची सोय पाहणे , नंतर देवधर्म करणे . अन्वयार्थ- आधी स्वतःची सोय वा फायदा करून घेऊनच, मग दुसर्‍याचे हित बघणे.

४. असतील शिते तर जमतील भुते – एखादा माणूस अचानक धनवान झाला तर, त्याचे नाते वा मैत्र सांगण्यासाठी, अनेक जण जमा होतात. पण फायदा होणार नसला, तर पसार  होतात. 

 ५. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ – वाईट लोकांची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो .( गेल्या महिन्यातील माझा एक ब्लॉग आठवा.)

६. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य, शहाणपणाच्या बाता करीत राहतो अन् शेतीच्या कामात मागे राहतो, त्याचे बैलही बिनकामाचे गोठ्यात बसतात.म्हणजेच त्याची सर्व कामे अर्धवटच राहतात. वा त्याचे मुळीच काम होत नाही .

७. अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी मातीमोलच होतो. म्हणजे कोठच्याही  मर्यादा ओलांडू नयेत.

८. गुडघ्याला बाशिंग बांधणे. अति उतावळे होणे. एखादी अपेक्षा, चिंता, याबाबत  घिसाडघाई योग्य नसते. संयम व सबुरी बाळगणे, विचारीपणाचा गुण होय.

९ .अडला हरी गाढवाचे पाय धरी – एखाद्या प्रज्ञावान व उच्चपदस्थ माणसालाही, अडचणीच्या वेळी कधी कधी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

१० .आपला हात जगन्नाथ –  ही म्हण सर्वांत श्रेष्ट होय. आपली प्रगति व विकास, आपल्या कर्तृत्वावरच विश्वास ठेवून, आत्मनिर्भर होऊन पार पाडावी.  आपल्या हातातच आपले यश असते.

११. आपलेच दात आपलेच ओठ . आपल्याच माणसाने चूक केल्यास, जेव्हा अडचणीची परिस्थिती निर्माण होते.तेव्हा असे बोलावे लागते. आपली होणारी हानी, जर आपल्याच विश्वासाच्या व्यक्तीकडून झाली, तर दोष कोणाला देऊ शकत नाही, ना नुकसान बोलून दाखवू शकत. 

१२.चोराच्या उलट्या बोंब. स्वतःच, चूक करून   वर त्याबाबतचा, आळ दुसऱ्यावर ढकलून,  दोष देणे.

            या म्हणी अगदी, जगाच्या व्यवहाराची तंतोतंत, ओळख करून देतात व त्याच्यातून सार काढून, शहाणपण मिळवता येते.  थोडक्यात काय, पुढच्यास ठेच मागचा शहाणा.  आपल्या पूर्वजांनी, या म्हणीतून आपल्या पुढिलांसाठी, मोठ्ठी शिकवण दिली आहे. बघा. यातून विनायास शिका. व इतरांना शिकवा. त्यासाठी सोप्पा मार्ग- - -like and share this blogs

==============================

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू