जसे आपण तशीच आसपासची दुनियासुध्दा आपल्याच मनासारखी असली पाहिजे,हा दृष्टीकोन चुकीचा होय.

 4.12.2023  जसे आपण तशीच आसपासची दुनियासुध्दा आपल्या मनासारखीच असली पाहिजे, हा चुकीचा दृष्टीकोन.

          माझ्या समानशील वाचक मंडळींनो, हां, वरच्या शिर्षकाला, धरून पाहता, मी हे गृहित धरत नाहीये कि, समस्त जनता,माझ्यासारखी असावी. पण संत तुकारामांनी लिहून ठेवलेय, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा." 

          म्हणजे लहानपण हा स्वतःला घडविण्याचा काळ. तो त्यांना मुक्तपणे जगून व भोगून द्या. कसा तर, जसे मुंगी एक एक कण वेचून, साखरेचा साठा ( त्यांच्या लेखी- महत्वाचा ठेवा) करते, तसेच सामान्यपणे, माणसांचा ,        " ठेवा" धनरूपी असतो. पण मुले निष्पाप व निर्दोष असतात. त्यांना तसेच ठेवणे, आपले पालकांचे व आजूबाजूच्या वयस्क मंडळींचे कर्तव्य असते. मुलांना  सामोरे जाताना  नेहमी आपले बालपण विसरू नये. ते अतिशिस्तबध्द असते तर~~ हा विचार करावा. जर आपल्यावर लहानपणी अन्याय झाला असेल, तर तेच दुष्कृत्य आपल्या हातून घडू नये, यासाठी दक्ष रहाणे, आवश्यक आहे. मोठी माणसे, त्यांच्या सायंसमयी, बागेत, सोसायटीच्या आवारात, संध्याकाळी निवांत बसायला आली असतील, तर त्यांनी, हे ही लक्षात ठेवावे कि, मुले ही याच वेळी, निख्खळ बालपण भोगावयास , एकत्र जमू शकतात. काहींची शाळा सकाळी तर काहींची दुपारी असते. त्यामुळे संध्याकाळीच सोसायटीतील, समस्त बालक मंडळी एकत्र येऊ शकतात. सर्व पालकांनी ही, हे लक्षात ठेवावे, मुलांना त्यावेळी मोकळीक द्यावी. नाहीतर, आपले मुल, इतरांपासून वेगळे व एकटे पडणार, हे लक्षात घ्यावे. मग आमच्या वेळी यँ व तँ -  अन् ही सोसायटीची संस्कृती! ह्यं! अशा बाता मारायच्या. झालं. हां कालच्या उदाहरणांवरून, माझे वाचक ह्या बाबतीत "जाणते" झालेच असतील. आज पुन्हा एक बातमी मटा. मध्ये वाचनात आली. 

          बोरिवलीच्या एका सोसायटीच्या आवारात, खेळणार्‍या, फक्त आठ वर्षाच्या मुलाला, एका जेष्ठ नागरिकाने ( ह्या वल्लीला श्रेष्ठ का म्हणावे?) दम मारून वर कानशिलात लगावली. हाताला धरून लिफ्टमध्ये ओढत नेले, ते मूल इतके घाबरले कि, त्याने तिथेच , शूशू केली.  हा अधिकार त्या ६० वर्षाच्या म्हातार्‍याला कोणी दिला.  ह्या वर्तनाला उद्दामपणा म्हणावे का? बरे हे प्रकरण इथेच थांबले नाही. तर त्या मुलावर इतका मानसिक आघात झाला कि, तो  घराबाहेर जाण्यास तयार नसे व झोपेत ही घाबरत होता. डॉक्टरांकडे न्यावयाची वेळ आली. पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली.  हे योग्यच झाले. पण जेव्हा, परवा मी जे लिहिले होते, ते आठवा, किंवा मागे जाऊन पुन्हा वाचा. इथे परक्याने मारले, म्हणून पालक, पोलिसांचा रस्ता धरू शकले. पण जेव्हा, या प्रकारची मारहाण घरातच होते. तेव्हा मुले, आतल्याआत कोंडतात, पण कधी तरी हा लाव्हा उसळून येतो. हा विचार, पालकांनी हात उगारण्या  आधी करावा. जर आपले मूल आदर्श असावे. अभ्यासात बाह्य वाचनात, खेळात - तर प्रथम, त्याला/ तिला मुक्त खेळू द्या -  हुंडदू द्या. स्वतः ला teamwork साठी तय्यार होऊ द्यात. नुसत्या छंदवर्गात वा एखाद्या खेळाच्या कोचिंगने काही होणार नाही. घरी अभ्यासाठी , "शिस्त" तेथेही, " शिस्तबध्दता.  म्हणजे, संत तुकारामाच्या शब्दात, त्यांच्या👫👬👭 मते, जी साखर, गोड आहे, तिचा, " ठेवा- साठवण" करून द्या, ही हात जोडून🙏🙏🙏 विनवणी. नाहीतर, मुले घरात तरी सुरक्षित आहेत का, असे म्हणावे लागेल. उद्या या समस्येवर बोलू. अगदी पेपरमधील लेखाच्या आधारे. काल लिहिले, त्या प्रमाणे, विचार विनियम करा. जमल्यास त्यासाठी whatsup group & facebook चा उपयोग करा. तेथे share करा please please& please.

       <> <> <> <> <> हे हवे.  >< >< >< >< हे नको.😉😊.

Comments

Popular posts from this blog

केव्हिन श्वान निष्ठा- एक उत्कट अनुभुती.

कृतज्ञता. एक अनोखा अनुभव

निरक्षर पण अध्ययनातील गुरू